Wednesday, June 5, 2013

खिंडीच्या पलीकडे फुलपाखराची गोष्ट

खिंडीच्या पलीकडे

----- फुल पाखराची गोष्ट -----
    एक होतं फुलपाखरू कुणी म्हणेल, काय हा सोस त्याच्या गोष्टीचा ! इतर हजारो फुलपाखरांसारखंच तेही एक निव्वळ एक फुलपाखरुच. पण सगळीच फुलपाखरं कांही सारखी नसतात. ठीक आहे - सगळयांनाच त्यांच्या आयुष्यांत ठराविक बदलांना सामोर जाव लागत तरी पण प्रत्येक फुलपाखरु वेगळ वागत. कांहींना फक्त सरपटणच आवडत. सरपटण आणि बकाबका खात रहाण पानं, देठ, कांय हिरव मिळेल ते चॉम्प, चॉम्प ! ते अळीचच आयुष्य
त्यांना आवडत. फुलपाखरु व्हायची आठवणच नसते. आणि त्यांचा शेवटची तसाच होतो - चिरडून किंवा एखद्या चिमणीच्या किंवा बेडकाच्या पोटात कांही फुलपाखर अगदी घाईत असतात. अंडयातून अळी, अळीनंतर सुरवंट आणि कोष आणि कोषातून कुलपाखरु असं झपायाने मोठी होतात त्यांना विचारत कसे होते बालपणाचे दिवस तर म्हणतील कांही आठवत नाही ना आम्ही मोठ होण्याच्या इतक्या घाईल होतो.
    पण मी ज्या फुलपाखराची गोष्ट सागतोय ते तसं नव्हत. ते सुखंट हात तेंव्हा त्यांच्या ही आयुष्यांत फक्त सरपटण आणि खांण एवढच मर्यादित ध्येय होत. तो एक गुबगुबीत सुरवंट होता. कधी या भिंतीवर वर कधी त्या फांदीवर. कधी इकडे घसर, कधी तिकडे पड ! पण अजून वाट पहाण्याचे दिवस आलेले नव्हते. ते दिवस नंतर येतील सध्या तरी आपल्याच तो-यात सरपटत उडया मारायचे दिवस होते. बाकी कांही नव्हत. मग एक दिवस अचानक सुखयला आपल्या शरीरात फरक जाणवू लागला त्याने आपल्या भोवती एक पारदर्शी कोष विणला आणि त्यात स्वतःभोवती गुंडाली करुन बसला ही स्वप्नळू अवस्था होती जगातले सगळे जमकदार रंग त्याच्या स्वप्नात असायचे आपल्या अद्दश्य कोषाच्या आडूनच तो जगाकडे बघत होता. आणि जग पण आश्चर्याने त्याच्याकडे पठात होत इतके रंगबेरगी सुंदर फुलपाखरु कोषातून बाहेर कां नाही येत ? आपले चमकदार पंख पसरुन आजूबाजूच्या फुलांवर का नाही बसत? कांही फुलपण या वेगळया फुलपाखराच्या आशेने स्वतःच आयुष्य थोडस वाढवून घेत होती - हे फुलपाखरु येईल आणि आपल्या पाकळयांवर बसेल - निदान पाकळयांना लगडून तरी जाईल.
    तिकडे फुलपाखरु पण कुठल्या तरी फुलाच्या आशेवर थांबल होत. स्वप्न पहात होत. अशी स्वप्न की वाटे हे स्वप्नांचच फुलपाखरु आहे की कांय ! त्याच फूल साधरण फुल असणार नव्हत त्या फुलाचे रंग रुप किंवा सुवास सर्वश्रेष्ठ नसेल पण त्याच्या भावना मात्र अनोख्या असतील. फुलपाखरु त्या फुलाबद्दलच्या स्वप्नांत दंग असासच तया फुलावर बसल की मी स्वतःला अस ळरवून बसेन की मला माझी खरी ओळख पटेल. माझ फुल म्हणजे जणू कांही माझ्या झगमगाटी रंगांसाठी मला मिळालेला आरसाच असेल.
    आणि फुलपाखरु आपल्या अनोख्या फुलाची वाट पहात आपल्या पारदर्शी - कोषात तसच गुरुफटून राहिल. आणि एकदा त्याला अस फूल दिसल. फुलपाखरु सैरभैर होऊन गेल त्याला फुलांची अजिबात माहिती नव्हती. मी तर फक्त स्वप्नात माझ्या फुलाचा विचार केला आहे. मी इतका काळ ज्याची वाट पहिली ते हेच फूल आहे का, मला हवी ती अनुभूती यांच्या कडून मिळेल कां? मला कस कळणार? मी त्याला जवळ येऊ दिल पाहीजे. फुलपाखरु आता स्वप्नातून बाहेर पडल आणि आपल्या कल्पने च्या दुनियेत वावरु लागल.
    त्याने फुलाला हळूहळू जवळ येऊ दिल इतक की फुलाने हलकेच त्याला स्पर्श केला हा स्पर्शाचा अनुभव इतका नवीन होता की खूप काळ फुलपाखरु त्या स्पर्शाच्या सुखतच दंग झाल. पण अजून त्याने आपला कोष सोडला नव्हता. फूल दररोज हळूहळू त्याच्याजवळ सरकत होत. आणि एक दिवस अचानक फुलपाखराला घक्का बसला त्या फुलाला अनुभूति नव्हती त्याने आपल्याभोवती एक मुखवटा चढवला होता आणि एक मायाजाल निर्माण केल होत जसजसा मुखवटा जुना होऊ लागला तसतस मायाजाल विरुन जाऊ लागल फुलपाखराने स्वत : ला सोडवून घेण्याचा प्रयत्न केला पण ते फुलात गुरफटून गेल होत. फुलाने त्याचा कोष बाजूला सारायचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी कोषासेबत फुलपाखराच्या भवनांची खपली निघायची. दोघ आपापल्या प्रयत्नात हरली आणि एकत्र राहूनही एकमेकांपासून हजारो मॅल लांब गेली.
    किती तरी काळ गेला. फूल आणि फुलपाखरु दोघांना आता एकमेकांत गुरफटून पण मनाने खूप लांब रहायची सवय झाली होती. फुलपाखराजवळ अजूनही कांही स्वप्न शिल्लक होती विशेषतः अशा फुलाच स्वप्न ज्याच्या अनोख्या भावनांमुळे फुलपाखराचा कोष आपोआप गळून पडेल आणि या स्वतःच विणलेल्या कोषाच्या कैदेतून मुक्तता मिळेल पण हळूहळू फुलपाखराची स्वप्न पण विरायला लागली. त्याने स्वतःला बजावल की स्वप्न ही स्वप्नच असतात ती असली कांय आणि नसली कांय ! इतके दिवस फुलपाखरु स्वप्नांच्या जगात होत. स्वप्न
हेच त्याच जीवन होत. स्वप्नांना नाकारुन फुलपाखरु स्वतःलाच नाकारच होत. हताश होऊन एखाद्या चिमणी किंवा बेडकाने झडप घालायची वाट पहात होत.
    पण एक दिवस कांही तरी घडल जवळच एक नविन फुल उगवल. त्याने खूप वायदे केले. त्यांच रंगरुप कांही उद्भत नव्हंत, त्याचा वासही उद्भत नव्हता. पण ते फूल वायदे मात्र खूप करत होत. आपल्याजवळ वेगळया, अनोखी भावना आहेत अस पण सांगत होत आणि हे फूल बरच धीट पण होत. फुलपाखराचा कोष उघडण्यासाठी ते पुढे सरसावळ संमित फुलपाखराला कांही कळायच्या आतच त्याचा कोष गळून पडला होता. फुलपाखाला रडू कोसळल. पण फुल त्याच्याशी खूप प्रेमाने बोलत होत. बघ तरी, मी फक्त एक फूलच आहे. माझ्याजवळ ये तुला हवी तशी अनोखी अनुभूति तुला येईल.
    फुलपाखराने हळूच आपले पंख उघडले. आज ते पहिल्याप्रथमच कोरा बाहेर पडल होत. ही वेगळीच अनुभूति आहे - फुलपाखरु पुनः एकदा कल्पनेत दंग झाल स्वप्नांचा आणि विचारांचा बिसर पडला. ते वा-याच्या लहरीबरोबर वर गेल तर त्याला वाटल हा फुलाचाच श्र्वास आहे. वरचं निळ निळं आभाळ जणू कांही फुलाचच प्रतिबिंब आहे, कल्पनेच्या सुखात दंग फुलपाखराने आपल्या स्वप्नांना झोपी जायला सांगितल.
    स्वप्नांची झोप हळूवार असते ती मधेच जागी होत आणि फुलपाखराला कल्पनेच्या जगांतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत. फुलपाखरु आता नव्या फुलाच्या कल्पनेत गुंगल होत. स्वप्नांनी त्याला सावध करायचा प्रयत्न केला. वेडेपणा करु नकोस तुला अजून या फुलाची अनुभूति कळलेलीच नाही. तू फक्त कल्पना केली आहेस की तुला ठवी ती अनोखी अनुभूति या फुलाजवळ असेल. आम्हाला त्याचा अंदाज घेऊ दे. आम्ही तुला त्याच्या अनुभूतिंबद्दल खात्रीलायक सांगू. पण फुलपाखराला स्वप्नांच ऐकायच नव्हत. त्याने त्यांना दरावून गप्प बसवल. तुम्ही नुसती स्वप्नच आहात, तुम्ही प्रत्यक्ष जीवन कधीच जगलेल नसत. जा दूर जाऊन पडा ! मला जस वाटतय तस जीवन आताच जगायच आहे. इतकी वर्ष ज्याची वाट पाहिली ते फूल आता मला भेटणार आहे. स्वप्नांना खूप वाईट वाटल. त्यांनी स्वतःला झाकून घेतल आणि गाढ झोपेत निघून गेली. फुलपाखराला वाईट वाटल. इतकी वर्ष सोबत करणा-या स्वप्नांना त्याला असं दुखवायच नव्हत. पण त्याला फुलाबद्दल आशा वाटत होती. आशा वाटण्यासारखं कांय आहे ते कळूनही.
    फुलपाखराने आपले पंख पसरले आणि हवेत एक भरारी घेऊन ते वेगाने फुलावर येऊन बसल आणि हाय्‌ त्याच्या तोंडून चीत्कार बाहेर पडला हे फूल पहिल्या फुलासारखं अनूभूतिशून्य नव्हत. पण त्याच्या अनुभूति वेगळया होत्या. ते निवडूंगाच फूल होत. फुलामागे दडलेल्या काटयांनी फुलपाखराला रक्तबंबाळ केल. त्याचे पंख पार फाटून गेले. छिन्नविच्छिन्न होऊन फुलपाखरु जमीनीवर पडल आणि विळू लागल कां? कां अस केल त्या फुलाने ? पण फुलपाखराला उत्तर मिळाल नाही. त्याने ओरडून विचारल, हळू आवाजात विचारल, पण उत्तर नव्हत. वेदनेच्या अयांग समुद्राच्या तळातून कांही प्रतिध्वनि सेतो का ते पहिल, पण तिथेही उत्तर नव्हत. फुलपाखरू आपल्या दुःखाचा डोंगर ओलांडून जायचा प्रयत्न केला पण त्याच्या पंखातल त्राण संपून गेल होत. डोंगराच्या पलीकडून स्वतःच्या कण्हत असलेल्या स्वप्नांचा आवाज ऐकू येत होता, पण आता ते स्वप्नांपर्यंत जाऊ शकत नव्हत.
    निवडुंगच फूल कुठेच दिसत नव्हत. ते इतर फुलपाखरांना आकर्षून घ्यायच्या प्रयत्नांत होत पण इतर फुलपाखरु त्यांच्या कोषातून बाहेर पडली होती आणि त्यांना निवडूंगाच्या फुलांचे स्वभाव माहित होते ते फूल कितीही विनवव्या करुन शेवटी धुळीत जाऊन पडल तरी कोणतीही फुलपाखरु त्याच्या जवळ जाणार नव्हत.
    शेवटी फुलपाखराने धीराने आपल दुःख आवरले पुन्हा आपले पंख सावरायचा प्रयत्न केला पण त्याचा कां हा प्रश्न संपणरा नव्हता. त्याला उत्तर मिळत नव्हत. दुःखाच्या डोंगरापलीकडे गेलेल्या स्वप्नांना उत्तर माहित होत पण फुलपाखरु त्यांच्या पर्यंत पोचू शकत नव्हत.
    खूप दिवस गेले आणि एक दिवस फुलपाखराला जाणवल की त्याच्या पंखांखाळची जमीन हमत होती.
आता हे कांय अख्स विचारायच्या आतच एक ज्वालामुखी उघडली आणि लाव्हारस वाहू लागला. कांय आश्र्वर्य सगळीकडे राख पसरली पण लाव्हा किंवा राखेमुळे फुलपाखराला इजा होत नव्हती. बघता बघता राखेचे भर वाढत गेले आणि त्यांनी दुःखाच्या डोंगराच्या भिंती बुजवून टाकल्या. आता पुनः एकदा फुलपाखरुची स्वप्न त्याच्या जवळ पोचू शकत होती. ती धावत आली आणि त्यांनी फुलपाखराला कवेत घेतल. फुलपाखराच्या डोळयांतून आसव ओधळली, त्यांनी राख भिजवून टाकली.
    हळूहळू राखेतून एक रोपटं उगवल. फुलपाखरु आर्श्च्याने बघत राहिल. रोपटयाला लौकरच एक फूल उगवणार होत.
    आता फुलपाखरु सुध्दा बदलल होत. ज्वालामुखीमुळे त्याच्या ह्दयांत पण ऊब निर्माण झाली होती. त्याचे जुने पंख जळून गेले, पण त्या जागी नवे पंख उगवत होते. त्याला हलक हलक वाटू लागल. वातावरण वसंत ऋतूने भारत होत. फुलपाखराच्या स्वप्नांना सुध्दा हे बदल जाणवत होते ते हळूच बाहेर डोकावायचे - फुलपाखराच्या पंखांना, गलांना हात लावायचे आणी हळू आवाजात म्हणायचे - 'आनंदी रहाव्‌' आनंदी कस असतात? फुलपाखराला या खोडकर स्वप्नांच हसू यायच मग ते म्हणायच - हे अस हसू येण म्हणजेच कदाचित आनंद असेल.
    हिवाळी आला. दिवस छोटे होऊ लागले तसे फुलपाखराच्या दु-ख स्मृति पुसट होऊ लागल्या. नव्या फुलाने त्याला कधीच निमंत्रण दिल नाही पण एक गंमतच झाली. एक दिवस फुलालाच पंख फुटले आणि दोघ जण उंच उंच आभाळांत उडून गेले.

------------------- -----------------------पुढील ब्लॉग पान पहा

No comments:

Post a Comment