Wednesday, June 5, 2013

खिंडीच्या पलीकडे बाळ आणि घड्याळ

खिंडीच्या पलीकडे

मी म्हाता-या बाबाच्या प्रवासाची गोष्ट लिहून ठेवत होतो ती वही आता फुगत चालती हाती. त्यामुळे माझी कल्पनाशक्ति देखील चाळवली गेली होती. एखाद लहान बाळ दिसल की मला वाटयच हे त्या ढगांच्या दरीतल्या प्रवाशासारख आहे. याला पण चालण्याचे श्रम कराव लागत नाहीत. याच्या सगळया गरजा भागवस्था जातात. मी
त्याच्याशी बोललो तर ते बाळ सुध्दा असे कांही आवाज काढी की त्याला कांय वाटतय्‌ ते मला समजताच कळत असे. एक शब्दही बोलता लहान बाळ आपल्या भावना व्यक्त करुन शकत होत आणि भावनांशिवाय इतर कांहीच त्याला व्यक्त करायच नसत. त्याला खोट बोलायच नसत म्हातारा बाब सांगतो ते मुक्त, स्वच्छंदी स्वर असेच असतात कां?
    बाळाला प्रश्न विचारता येत नव्हते. मला ते आवडल की नाही हा प्रश्न बाळ विचारु शकत नव्हत.
    पण मला बाळ आवडल्य्‌ हे त्या बाळाला प्रश्न विचारताच लळू शकायच. आणि मग तेही आपल्या भावना व्यक्त करायच आमच्याकडे संभाषणासाठी शब्द नसूनही छान संभाषण व्हायच. आमच्या कडे फक्त स्वर होते आणि तेच मला ओळखीच होते. मी डोळे मिटून ढगांच्या दरीतल्या प्रवासाची कल्पना करत असे तेव्हा सवंगडी ढगांच्या खळखळून हसण्याचा आवाजही असाच ओळखीचा असायचा हा सगळा प्रवास म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीचा प्रवास असतो कां? आपण फक्त डोळे मिळायचे की कल्पनेने आपण हव्या त्या दीरत, हव्या त्या खिंडीपलिकडे पोचू शकतो, कदाचित शेवटच्या खिंडीपलीकडे पण पोचू, या कल्पनेपेक्षा वेगळा खराखुरा असा खरच कांही प्रवास असतो कां? मी ठरवल, या वेळी म्हातारा बाबा आल्या आल्याच त्याला हे सगळ विचारायच. त्याने पुढची गोष्ट सुरु करण्या आधीच. एकदा का त्याला वाटेल तेवढी गोष्ट सांगून तो उठला की त्याला कोणत्याही उपायाने थांबबता येत नाही.
----------------------------------------
    'कल्पनेचा खेळ'! म्हाता-या बाबाला माझ्या प्रश्नाचा कौतुक वाटल. ' कोणतीही गोष्ट कल्पित कां असते? कारण तू तिची कल्पना केलेली असतेस तू कल्पना कां करतोस ? कारण तुला वाटप की हे बहुधा खरखुरं नसाव तुझा विचार, तुझा विश्र्वास यावरुनवच तुझे निष्कार्स ठरतात. तुझा निश्र्वास असेल की असा खराखुरा प्रवास नसतो, तर मग हा प्रवास काल्पनिक आहे, तुझा विश्र्वास असेल की असा प्रवास आहे पण तुला माहीत नाही, तर तू तेही स्वीकार करतोस. याला तू श्रध्दा म्हणू शकतोस. श्रध्दा हा देखील विचारशून्य कामासारखाच खेळ आहे.
    'विचारशून्य कामासारखा खेळ? पण मला तर सगळी नेहमी सांगतात श्रध्दा ढेव !देवावर, मोठया माणसीवर, स्वतःवर ! म्हणजे काय मोठी माणस मला दर वेळी तो थेडपट ' विचारशून्य कामांचा खेळ ' खेळायला सांगत असतात?'
    'अगदी तसच कांही नाही त्यांच्या मते तो येडपट खेळ नाही तर अगदी गंभीर बाब असते. पुष्कळांना तर अस वाटत असत की आपल्या जगण्या आणि मरणाचा उद्देशही तोच आहे. श्रध्देसाठी ते जगतील आणि श्रध्देसाठी प्राणही देतील. पण ते जाऊ दे, ते महत्वाच नाही. मी तुला सांगत होतो की जर आपल्याला एखाद्या गोष्टीच्या असण्यावर विश्र्वास नसेल तर आपण तिला काल्पनिक म्हणतो. तिच्या असण्यावर विश्र्वास असेल, तर आपण तिला श्रध्दा म्हणतो. दोन्ही बाबतील आपल्याला माहितत नसलेल्या गोष्टीबद्दल आपण स्वतःची कांहीतरी समजून करुन  घेतलेली असते. पण आपलयाला नेमक माहीत असेल तेंव्हा कांय होत? मग आपल्याला श्रध्देचीही गरज उरत नाही आणि कल्पनेचीही !
    माझ्या राजा, मी कांही या प्रवासाची गोष्ट कल्पनेतून सांगत नाहीये किंवा श्रध्देतूनही नाही. मला ती नाहीत आहे - समजत नसली तरी माहीत आहे !
    मी तुझ्यासाठी एक गंमत आणिलीय्‌ अस म्हणत त्याने खिखातून एक खेळण्यातन घडयाळ काढल. घडयाळाच्या दोन्ही बाजूंनी तबकडीवर एक ते बारा आकडे लिहिले होते घ्ज्ञडाळयाचा म्ध्यभाग पारदर्शी होता आणि तास मिनिट काटयाची एकच जोडी दोन्ही कडून वेळ दाखवत होती. म्हणून एका बाजूने तीन वाजलेले दिसत होते तेंव्हा दुस-या बाजूने नऊ वाजलेले दिसायचे. फक्त सहा किंवा बारा वाजले असले तसच
दोन्ही बाजूंना सारखी वेळ दिसायची. मला खेळायला म्हणून ते घडयाळ मुळीच आवडल नाही.
    ' किती वाजतेत?' त्याने घडयाळाची एक बाजू माझ्या समोर घरली.
    'चार'
    'आणि आता?' म्हणत त्याने घडयाळाची उलटी बाजू माझ्याकडे केली.
    'आठ '
    'दोघांपैकी कोण बरोबर आहे?'
    त्याच्यां डोळयांत खटयाळपणा भरलेला हातो.
    घडयाळ चालत नव्हत. त्याचे कांटे फिरले असते तर त्यांचय दिशेवरुन मी सांगू शकलो असतो कोणती बाजू बरोबर आहे ते तुम्हाला वैळ कळण्यासाठी घडयाळ हव असेल तर एकच बाजू असलेल घडयाळ बनवा. जर दोन बाजू असलेल घडयाळ असेल तर त्यापैकी एका बाजूवर उलटया दिशेने वेळ घावत असेल. अशा वेळी तुम्ही एका बाजूवर कांही तरी खूण करुन आपल्या मनाला बजावू शकता की खूण असलेली बाजूच बरोबर आहे. दुसरी बाजू चूकच आहे असच तुम्हाला म्हणावं लागेल मला पटतय्‌ की अस म्ळणणं योग्य नाही, पण अस नाही म्हटल तर दिवसातली सगळी वेळापत्रकं चुकणार, तुमच्या गाडया किंवा बसेस निघून जाणार आणि गोंधळ होणार !
    मी नुसता विचार करत नव्हतो. मी बोलत होतो आणि म्हातारा - बाबा माझ्याकडे बघून स्मित करत होता. ' बघ कळल, आयुष्यांत श्रध्दा आणि कल्पना कशासाठी असतात?'
    त्यांच्यामुळे जीवन सोईचं होत. जरी त्यांच्यामुळे अगदी स्पष्ट गोष्टी नाकाराव्या लागत असल्या तरी सोय होतेच. म्हातारा बाब म्हणाला
    'पण त्यांच्या भानगडीत पडता या घ्ज्ञडयाकांत वेळ कशी वाचायची ?' मी त्याच्या खोडकरपणार मात करत कसाबसा प्रश्न विचारु शकलो.
    ' मला नाही माहित. वेळ वाजता येत नाही. त्यासाठी तुझ्याकडे कल्पना तरी हवी किंवा श्रध्दा तरी. माझ्याकडे दोन्ही नाहीत. मला वेळ फक्त आहे हे कळतं एखाद्या मुक्त पाखरा - सारखी. घडयाकांत अडकवलेली नव्हे, त्यांच्या आंकडयांत किंवा, कायांत बांधून ठेवलेली नव्हे, उलट किंवा सुलट दिशेच्या व्याख्येत बसणारी पण नव्हे. घ्ज्ञडयाकांत आपण पहातो ती वेळ नसते, वेळेचा निर्जीव आकार पकडून ठेवलेला असतो, त्यांने आपण खेळू शकतो, पण त्यात आपण जगू शकत नाही.
    म्हातारा बाबा निघून गेल्यानंतर मी खूप वेळ त्या घडयाकाकडे बघत बसलो होतो. कदाचित एखद्या दिवशी मला हे सगळ रहस्य उलगडल. तोपर्यंत म्हाता-या बाबाने सांगितलेल्या गोष्टी मी श्रध्देने अगर कल्पनेने स्वीकारु शकत नव्हतो. वाट पहाण एवढच माझ्या हातात होत. ते मला भागच होत.

--------------------------------------------पुढील ब्लॉग पान पहा

No comments:

Post a Comment