Wednesday, June 5, 2013

खिंडीच्या पलीकडे बिल्ले

खिंडीच्या पलीकडे


आता माझ्या आईला खरच, माझी काळजी वाटायला लागली. ती मला म्हणायची - इतर मुल वघ. तुला कां नाही त्यांच्या सारख होता येत? ते खेळांच्या स्पर्धा संपवून आले की त्यांच्या हातात जिंकलेले कप असतात. आणि तुझ्याकडे? फक्त तुझ्या तोंडावरचे ते कायम कुठेतरी स्वतःला हरवल्याचे भाव असतात. तू स्पर्धेत भागही घेत नाहीस . भाग घेतलास तर कदाचित जिंकशीलही एखादा कप. पण जिंकण हरण महत्वाच आहे, खेळायला जाणं महत्वाचा आहे.
    खेळायला जण कां महत्वाच मानायच असा प्रश्न मी करु शकत नव्हतो. तिने मला एकदा सांगितल होत आणि मी ती उत्तर लक्षांत ठेवावी अशी तिची अपेक्षा होती. सांगितलेली उत्तरं लक्षात ठेव. प्रश्न विचार, प्रश्न विचारण चांगल पण संगितलेल्या उत्तरांवर कां हे प्रश्नचिन्ह लावण वाईट. जर मी तिच्या उत्तरांना प्रश्नचिन्ह लावू शकलो असतो, तर आमच संभाषण कदाचित याप्रमाणे झाल असत - उत्तर - तू खेळ खेळले पाहिजेस कारण इतर सर्व मुलं खेळातात. प्रश्न - पण प्रत्येक जण कपांचे भारे जिंकून येत नाही. उघडच आहे की फक्त काही जगांनाच कप मिळतील. तस नसत तर कप मिळवण हे कांही आपल्या कुवतीच प्रतीक राहिल नसत. याचाच अर्थ असा की कांही जण जे करतात हे तर सगळीच करु शकत नाहीत तसच मीही करुन शकत नाही उत्तर - हा मुर्खासारखी युक्तिवाद आहे.
    अलीकडेच माझ्या अस लक्षात आल होत की त्यांचा युक्तिवाद वापरुन उत्तर देता येत नसेल तेंव्हा माझ्या प्रश्नाला लोक मुर्खासारखा युक्तिवाद म्हणायचे. माझी प्रांजळ समजून अशी होती की युक्तिवादा मुळे, तर्क संगती
लावण्या मुळे तुम्हाला प्रश्नांची उत्तर समजू शकली तरच ती योग्य तर्कसंगती. पण प्रश्नाच उत्तर देता आल नाही की गैरसोय होते. म्हणून प्रश्न विचारणा-याने पण सोईचेच प्रश्न विचारावे, नाहीतर आपल्या प्रश्नांना 'मुर्खासारखा युक्तिवाद' हे विशेषण कबूल करावं.
    प्रश्न - असेल तो मर्खासारखा युक्तिवाद पण केला मी असला युक्तिवाद म्हणून काय बिघडत? मी मैदानात जाऊन चेंडूच्या मागेमागे पळण्यापेक्षा इथे बसून विचार केला म्हणून कांय बिघडल?
    उत्तर - खरच, तू मूर्खासारख कांही तरी केलस म्हणून कांय बिघडल? ठीक आहे. क्वचित्‌ केलस तर कांही नाही बिघडत. पण सारख सारख तसच करत राहिलास तर लोक तुला मूर्ख म्हणणार. त्यांनतर तू एखादी हुषारीची गोष्ट केलीस तरी त्याला कुणी महत्व देणार नाही कारण त्यांचा ठाम विश्र्वास असतो की तू
मूर्खच आहेस. तू तोंड उघडण्या - आधीच त्यांना कळत की तू मूर्खासारखा युक्तिवाद करणार आहेस. आणि तू नुसता बसून विचार करणंही चांगल नाही. जग हे कृतीवर चालत असत - कृतीमुळे टिकून असत. विचारांमुळे नाही हे तिने म्हटल की मला हटकून आढवायच - कितीदा ती मला रागावली होती - कांही काम करतांना ते विचारपूर्वक कधी नाहीच कां करता येणार ?
    प्रश्न - पण बसून विचार करण्याने कुणाला त्रास होत नाही. कृतीमुळे दुस'याला इजा होऊ शकते. माणसांना कृति करायला आवडली नसती तर युध्दच झाली नसती आणि कुणाला दुखापतही झाली नसती.
    अशी प्रश्नोत्तरं चालू राहिली की थोडया वेळाने तिची उत्तरं बदलतात. आधीची उत्तरं विचारांनी प्रेरित असतात. मग ती कृतिने प्ररित होतात. ती कृती असत माझ्या पाठीत धपाटे घालण्याची.
------------------------------
    माझ्या मनांत बिल्लयांच्या दरीबद्दल खूप प्रश्न होते. सर्वांत पहिला प्रश्न होता की पंच प्रवाशांनच कस कांय एकमेकांना बिल्ले चिकटवायला रोजी करतात?
    'ओःत्यांची युक्ति अगदी डोकेवाज आणि सोप्पी आहे !सगळया बिल्लयांचे दोन प्रकार करतात. दरीत येणा-या प्रत्येक प्रवाशाला दोन्ही प्रकारचे खूपसे बिल्ले देतात. पण ते त्याला स्वतः साठी वापरता येत नाहीत. अगदी नावाचा बिल्ला असला तरी. तुम्ही वापरायचे बिल्ले तुम्ही नेहमी इतर प्रवाशांकडून मिळवले पाहिजेत.
    एखाद्या प्रवाशाच्या नांवाशी तुमची ओळख झाली की पहिल्या प्रकारचा बिल्ला तुम्ही त्याला अडकवायचा. प्रवासांत अस खूपदा होत की तुम्ही एखाद्या प्रवाशाबरोबर थोडा वेळ चालता आणि तुम्हाला त्याच्या नांवाची ओळख होते. ती झाली रे झाली की तुम्ही त्याला बिल्ला लावायचा. तो पण तुम्हाला बिल्ला लावू शकतो. पण नेहमी लावेलच असही नाही. त्याला तुमच्या नांवाची ओळख होईपर्यंत नाही लावणार.
    कांही प्रवासी नावांशी ओळख करुन घेण्याच्या बाबतीत बरेच गवाळे असतात. त्यांना नांवांशी पटकन ओळख करुन घेता येत नाही. तयांच्या कडे पहिल्या प्रकारचे बिल्ले शिल्लक राहू लागतात पंचांना हे आवडत नाही शेतवटची खिंड जवळ येऊ लागते तसे हे प्रवासी पण बेचैन होतात. त्यांना बिल्ले संपवण्याची घाई होते. ते दुस-या प्रवाशाबरोबर थोडस चालून झाल की स्वत-ला समजावतात की त्याच्या नावाची ओळख झाली आहे. पंचांनी सगळया प्रवाशांना सांगितलेल असत की ज्याला आपले सगळे बिल्ले संपवता येणार नाहीत त्याला शेवटची खिंड ओळांडता येणार नाही. मला माहीत आहे की ही पोकळ धमकी आहे, कारण आपण कुठे आणि कधी शेवटची खिंड आलोंडायची ते आपल्या हातात नसत, पंचांच्या हातात पण नसत,
    दुस-या प्रकारचे बिल्ले असतात ते मिळवायची पध्दत वरीच निराळी आहे. पंच पण प्रवास करतच असतात तेंव्हा त्यांना कांही अशा जागा सापडतात जिथे इतर प्रवासी कधी प्रमाणात येतात. कदाचित अस असेल की जिथे पाऊलवाटेला फाटे फटतात तिथे या जागेपर्यंत येणारा फाटा आकर्षक दिसत नसेल, आणि बहुतेक प्रवासी दुस-या फाटयाकडे वळत असतील ते मुद्दामही हे करत नसतील कारण इतक्या कमी कमी अंतरावर फाटे फुटतात की
आपण कुठे पोचू शकणार नाही हे प्रवाशांना कळतही नसतः
    असो पण पंचांना अशा कमी प्रवासी येणा-या जागा ओळखता येतात. म्हणून ते स्वतः जेंव्हा तिथे पोचतात तेंव्हा तिथे एक उंच झेंडा गाडतात. झेंडयाच्या अगदी वरच्या टोकालाएक खूण असते तिथे पोचण-या प्रवाशाला बिल्ला मिळेल असं सांगणारी खूण. जेंव्हा एखादा प्रवासी त्या जागी पोचतो तेंव्हा तो झेंडयाची काठी जोरजोरात हलवतो. काठी उंच असते ती हलली की लांबलांबच्या प्रवाशांना पण समजत की कुणी तरी प्रवासी बिल्ला जिंकायच्या भोज्यापर्यंत पोचला आहे. इकडे तो बिल्ला जिंकणारा प्रवासी पण गर्जत निघतो - 'मी जिकंलो, मी जिकंलो' ज्या क्षणी त्याची दुस-या प्रवाशा - बरोबर गांठ पडत, त्या क्षणीच दुसरा प्रवासी त्याला बिल्ला चिकटवतो.
    मला माहित आहे हा खेळ पंचांनी मुद्दाम अशा ते-हने ठरवला आहे की आगदी थोडयाच प्रवाशांना हा दुस-या त-हेचा बिल्ला मिळू शकतो. यामुळे इतर प्रवाशांना कमी प्रतीचं ठरवता येत. इतर प्रवाशांना यातली खरी योम कळलेली नसते. त्यांना वाटत हा खास बिल्ला जिंकणा-या प्रवाशाने खरच कांहीतरी खास कामगिरी बजावली असणार म्हणूनच तो झेंडयापर्यंत पोचू शकला. पण खरी गोष्ट अशी आहे की तयाने खास अस कांहीच केलेल नसत. निबळ योगायोगाने तो या झेंडयाच्या जागी पोचलेला असतो. फार तर तू म्हण की त्याच्या मूर्खपणाने कारण एक आकर्षक पाऊलवाट सोडून तो अनाकर्षक पाऊलवाटेकडे वळलेला असतो.
    पण जिंकणारे प्रवासी मात्र जिंकल्याच्या नादांत असतात. ते आपल्या विजयाच्या कहाण्या रंगवून - रंगवून सांगतात त्या अनाकर्षक पाऊलवाटांवर किती त्रास झाला. त्यांनी आपल्या हुषारीने प्रत्येक काटयावर योग्य तीच पाऊलवाट कशी निवडली. कशी त्यांना विजयाच्या नेमक्या जागी पोचण्याची खात्री होती. कसा त्यांनी कित्येक पाऊलवाटा आणि फाटयांचा नीट अभ्यास केला होता आणि निश्च्िापणे विजयाच्या दिशेनेच पावल टाकली होती. सगळया बनावट गोष्टी कारण या असंख्य पाऊलवाटांच्या प्रवासात तुम्हाला एका निश्च्िात जागेच घ्येय ठरवून जाताच येत नाही. तुम्ही फक्त जात असता.
    पण पुष्कळ प्रवासी या विजयी प्रवाशांच्या गोष्टी ऐकून प्रभावित होतात त्यांना वाटप आपल्यातही योग्य वाट निवडून विजयाच्या जागी पोचण्याची क्षमता आहे. तिथे जाऊन विजयाचा बिल्ला मिळवण्यासाठी ते आपला वेग वाढवतात. अनाकर्षक दिसणा-या पाऊलवाटा निवडायच ठरवतात. पण बहुधा सगळयाचा पाऊलवाटा सारख्याच दिसतात. क्वचितच एखादी पाऊलवाट इतरांपेक्षा जास्त आकर्षक असते. त्यामुळे तुम्ही जाणूनबूजून अनाकर्षक वाट निवडायची म्हटली तरी तुम्ही विजयाच्या भोज्याला पोचालच अस कांही नाही. पण या प्रवाशांना इतका पक्का विश्र्वास असतो की ते प्रयत्न सोडत नाहीत ते विचार करणार, सर्व शक्यता तपासणार, चर्चा करणार, आणि आपल्या गणितात सुधारणा करणार. यामुळे ते प्रवासाच्या आनंदाला मुकणार,आणि कठिण पाऊलवाटेतून जाणार, हे सगळ कशासाठी? तर त्या उंच झेंडयावरुन सुणावणा-या बिल्लयासाठी.
    मला उचानक आठवल. 'आणि पदकं कशी मिळतात? निदान त्यांच्या साठी तरी कांही खास कराव लागत असेल !
    तुला अजूनही वाटत की हे प्रवासी कांही ठरवून करु शकतात मी तुला सांगितल ना की या प्रवासात कांहीही करण्याचा पर्याय आपल्या हातात नसले - फक्त विचारांचा पर्याय असतो आणि बहुतेक प्रवाशांनी तो पर्याय सोडून दिलेला असतो. त्यांचे विचार कर्मकांडांनी काबीज करुन कृतीत बदलून टाकलेले असतात. त्यांना कांहीही खास करता येणार नसत. घटना घडत जातात. पण पंचांनी सांगितल्यामुळे प्रवाशांना असा विश्र्वास वाटतो की त्यांनी कांही तरी खास केल आहे आणि कांही खास मिळवल आहे.
    पदकं सुध्दा खास आणि मिळवायला कठिण वाटावीत अशी पंचांची इच्छा असते म्हणून त्यांनी असे हुषारीने नियम केले आहेत की कांही थोडया प्रवाशांना ही पदकं नक्की मिळावीत. ते ही पदकं प्रवाशांकडे ठेरत
नाहीत, स्वतःकडेच ठेवतात.
    पदकं जिंकायची पध्दतही दुस-या प्रकारचे बिल्ले जिंकण्यासारखीच असते प्रवासी विजयध्दजापर्यंत पोचतात, तिथली झेंडयाची काठी जोरजोरात हलवतात, त्यामुळे लांबपर्यंत प्रवाशांना कळत की हा कुणीतरी विजय मिळवलेला आहे. ते प्रवासीही ओरडतात - मी जिंकलो, मी जिंकलो अधी पुढची वाट चालू लागतात. अशा वेळी त्यांना पहिल्याप्रथम भेटणारा एखादा प्रवासी असेल तर तो त्यांना दुस-या प्रकारचा बिल्ला देईल मात्र जर तो पंचांपैकी असेल तर तो पदक देईल. म्हणजेच जिंकणा-या बहुतेक प्रवाशांना बिल्ला मिळेल पण त्यातल्या अगदी मोजक्या प्रवाशांना पदक मिळेल. जिंकणा-याने कांही खास केल अस नाही. काही करु शकण्याचा पर्याय त्याच्याकडे नसतोच. फरक एवढाच असतो की योगायोगाने त्याला योग्य क्षणी एखादा पंच भेटतो.
    'पंचांना सुध्दा बिल्ले आणि पदकं - मिळतात कां? इतके बिल्ले आणि पदकं वाटल्यानंतर त्यांना तर ती निरुपयोगीच वाटत असणार.'
    ' चुकतोस तू ते प्रवाशांना पटवत असतात की हे बिल्ले आणि पदक म्हणजे कांहीतरी श्रेष्ठ मिळवलयाचे प्रतीक आहे. मग त्यांनी इतरांपेक्षा जास्त बिल्ले आणि पदकं मिळवायला नकोस कां? त्या शिवाय इतरांना त्यांचा दरारा करता वाटणार?
    त्यांना पहिल्या प्रकारचे बिल्ले मिळण्यांत कांहीच अडचण नसते. त्यांनी पंचांचे कपडे चढवले असल्यामुळे त्यांना ओळखायला त्रास पडत नाही.
    एखादा प्रवासी पंचाला भेटला की त्याला पंचाच्या नांवाची ओळख लगेच पटते आणि तो चटकन बिल्ला काढून लावतो. त्यामुळे उपसले बिल्ले पंचांना पायापासून डोक्यापर्यंत लावलेले दिसतील.
    कधी कधी अस वाटत की पंचांना एवढया बिल्लयांचा कंटाळा येऊन ते म्हणतील थांबवू या आता हा मूर्खपणा ! पण तस म्हण म्हणजे हा मूर्खपणा हाता हे कबूल केल पाहिजे. म्हणून ते कांही आपला कंटाळा दिसू देत नाहीत. आणि प्रवाशांना वाटत की पंचाला बिल्ला चिकटवण म्हणजे कांहीतरी मोठा पराक्रम ! मग ते सगळयांना कैतुकाने आपल्या पराक्रमाच वर्णन सांगतात. इतक्यांदा सांगतात की त्यामुळे इतर प्रवासी त्यांना ओळखू लागतात आणि लगेच त्यांना बिल्ले चिकटवतात.
    पंच स्वतः मात्र कोणत्याच प्रवाशाला पहिल्या प्रकारचा बिल्ला चिकटवत नाहीत. कारण त्यांना कोणालाच ओळख घायची नसते - ते फक्त इतर पंचांनाच पहिल्या प्रकारचे बिल्ले चिकटवतात तरीही नुसत्या पहिल्या बिल्लयांमुळे त्यांचा रुबाब वाढत नाही. त्यासाठी दुस-या प्रकारचे बिल्ले आणि पदक पाहिजेत, पण ते तर फक्त योगायोगाने मिळणार याबाबतीत त्यांना मिळण्याची शक्यता इतर प्रवाशांएवढीच असणार. म्हणून हे पंच बेईमानी करतात.
    त्यांनी दुस-या प्रकारचे कांही बिल्ले आपल्या पोषाखांत लपवून ठेवलेले असतात. जेव्हा दोन पंच आपसांत भेटतात तेंव्हा त्यातील एक गर्जत सुटतो - मी जिंकलो, मी जिंकलो मग दुसरा पंच इतर कुणी प्रवासी तिथे पांचण्याच्या आत पटकन त्याला दुस-या प्रकारचा बिल्ला चिकटवून टाकतो. प्रवाशांनी विजय - गर्जना ऐकलेली असते जेंव्हा ते पंचाकडला बिल्ला बघतात तेंव्हा त्यांना वाटत की हा एखाद्या प्रवाशानेच चिकटवला आहे. त्यांची अशी समजूत असते की पंचाकडे दुस-या प्रकारचा बिल्ले नसतातच, कारण नियमाप्रमाणे त्यांनी फक्त पदक लावायची असतात.
    अर्थात्‌ प्रवाशांनी विजयाचा कांठी हललेली बाघितली नसते पण त्यांना वाटत की ही आपलीच चूक. आपण दूर्लक्ष केल्यामुळेच एवढी महत्वाची घटना बघायला मुकलो पंचानी विजय - झेंडा हलवण ही तर जास्तच महत्वाची घटना !
    'पण पंचांना जास्त पदक कशी काय मिळू शकतात? प्रवाशांना माहत असत की ती फक्त पंचाकडेच आहेत
म्हणून त्याबाबतीत ते बेईमानी करुन शकणार नाही.' मी आपल्या मेघावीपणावर खूप होत विचारल.
    'पुनः चुकलास बघ ! अरे, या पंचांच्या हुषारिला अंत नाही आणि फसवणूकीला पण !ते काय करतात सांगतो जेव्हा लांब कुठे एखादी झेंडयाची कांठी हलते आणि विजय गर्जनेचा आवाज आपल्यापर्यंत पोचणर नसतो तेंव्हा दोन पंच पटकन भेटतात आणि त्यातला एक मी जिंकलो मी जिंकलो अस म्हणत थोडीशी पळापळी करतो - मग पहिला पंच त्याला इतर प्रवाशांच्या साक्षीने पदक चिकटवतो. कांठी हलवणारा खरा प्रवासी लांब कुठेतरी असतो आणि त्याला वाटेल भेटणा-या दुस-या कुणा प्रवाशाने बिल्ला पण चिकटवलेला असतो. तरीही इकडे या पंचाला खोटेपणाने एक पदक मिळून जाते या घटनेचे साक्षीदार पण इतरांना वर्णन करत सुटतात - त्यामुळे लौकरच ते इतरांच्या ओळखीचे होतात आणि त्यांना पण इतरांकडून पहिल्या प्रकारचे खूप बिल्ले मिळतात.
    आम्ही दोघ बराच वेळ गप्प बसलो. ती शांतता पण मला आवडली मला वाटल की म्हातारा बाब दमला आहे आणि त्याला आता गोष्ट थांबवावीस वाटतय्‌. मला पण थोड थंबावस वाटत होत. त्या पंचांच्या बेईमान वागणूकीची मला चीड येत होती. मी जेंव्हा या प्रवासावर जाईन तेंव्हा नक्कीच या पंचांना उघड पाडणार आहे. मी विचार करु लागलो म्हाता-या बाबाने कधी त्यांना उघडं पाडायचा प्रयत्न केला कां? कधीतरी
योगायोगाने तो विजयी झेंडयाजवळ पोचला कां? बर ते जाऊ दे पण त्याचा पोषारव, त्याच वागण, त्याचा स्वभाव हा देखील इतरांपेक्षा इतका वेगळा होता की कुणालही त्याची ओळख चटकन पटू शकली असती. मग निदान पहिल्या प्रकारचे तरी खूपसे बिल्ले त्याला मिळाले असतील.
    मी त्याच्याकडे पहिल तर त्याचे डोळे मिटलेले होते त्याला झोप लागली की कांय ? आतापर्यंत अस कधीच झाल नव्हत. त्याला नजर रोखून बघायची सवय होती. त्याच्या पापण्या सुध्दा लवतांना मी पाहिल नव्हत. मी खूपदा विचार करायचो की हा कधी झोपतो तरी कां ! मी त्याच्या दंडाला हात लावला तर त्याच आंग गरम लागल घरात जेवायची वेळ झाली होती आणि मला हाका मारण्याचा सपाटा सुरु होता. मी पळत घरातून एक कांबळ आणून त्याच्या अंगावर पसरल पण मी जेऊन परत आलो तो पर्यंत तो गेलेला होता. कांबळ तिथेच पडल होत - तसच, कुणावर तरी पांघरलेल्या आकारात - जणू कांय तो कापूर होऊन कांबळयातून उडून गेला होता.


------------------------------------------------

No comments:

Post a Comment