Wednesday, June 5, 2013

खिंडीच्या पलीकडे बाळाची गोष्ट

खिंडीच्या पलीकडे

बाळ जन्माला आल तेंव्हापासून मी त्याला बघत होतो. मला आठवत मी आईबरोबर त्याला पाहयला गेलो होतो. सगळी म्हणत होती - बाळ किती सुंदर आहे मला ते जरा जास्तच गुटगुटीत आणि खेळकर वाटल. थोडस
वेगळ पण ते कारणाशि वाय हसायच मिटल्या डोळयंानी पण हसायच मी तेंव्हा पाच वर्षांचा होतो. मी आनंदात असलो किंवा कांही गंमत झाली की हसायचो. बाळ पण आनंदात होत कां.?
    त्याला पाहून मला ढगांची दरी आठवली ते डोळे मिटून हसतस्‌. आता आपणही डोळे मिटले तर त्याला कांय दिसतय हे आपल्याला जागवल कां? प्रयत्न करायला कांय हरकत आहे ?
    मी डोळे मिटले आणि बाळाचा आवाज ऐकू आला - कांय गडया, मी कधीपासून वाट पहातोय की तू ते जग ओलांडून या मिटल्या डोळयांच्या जागांत येथील म्हणून ! मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. पण मी किंवा तू डोळे उघडले तर गोष्ट हरवून जाईल म्हणून आताच ऐक. कुणास ठाऊक कदाचित ही तुझीच गोष्ट असेल.
    अनंत काळासारख्या वाटणा-या कांही दिवसांपूर्वी सगळी कडे कसा काळाशार ऊबदार अंधार होता. ऊबेचा आणि सुरक्षित वाटल होत की तो शाश्र्वत होता. अशी प्राण घटट रावून ठेवायची सुरक्षित जागा सुटते तेंव्हाच तिच महत्व कळत. त्या जागेसारख जगात दुसर कांही नाही. ती जागा आपली म्हणायला मोह होतो. ती जागा चिरंतन राहील असं मानायला मोह होतो.
    आंधारही किती आरामदायी असतो, एखाद्या जवळच्या मित्रासारखा इतका जवळचा आणि इतका परिचित ! जणू कांही आपल अंतर्मनच असावं इतका गडद अंधार ! आपल्या अंतर्यना इतका आसामदायी दुसर कांहीच नसत. मी त्या अंधारात स्वतःच्या अंतर्मनासोबत होते. तो काळ फार आरामाचा होता.
    मला उजेड नांवाची एक वस्तुपण आठवते. मी प्राण घटट रोवले त्याच्या आधी मला ती वस्तु दिसली होती. मला आठवत की ही वस्तु आंधाराचा नाश् करने. त्याच बरोबर अंतर्मन नांवाच्या आपल्या मित्राचा पण नाश करते. ही वस्तु तुम्हाला खाजगीतुन बाहेर आणते आणि इतरांचाच एक भाग बनवून टाकते. आंधरात तुम्ही स्वतःसाठी एक छानस जाळ, छानसा कोष विणता पण उजेड ते सगळ मिटवून टाकतो, आणि तुमची जागा इतरांच्या समोर आणतो. तुमच्या विचारांच्या जागेत उजेड शिरला की तो त्यांना देखील जगासमोर उघड करतो मग तुमच्या विचारांना एकट बसून चिंतन करायला कुठलाच अंधारा कोपरा शिल्लक रहात नाही.
    मला आठवत की लोकं हा उजेड पसरवण्यासाठी सत्य नांवाची एक दुसरी वस्तु वापरतात. ते सत्या बद्दल लिहितत, सत्याबद्दल बोलतात. सत्याचे शब्द हत्यारासारखे वापरून ते इतरांचा आवश्यक अंधार, त्यांनी स्वतःचे विचार जपण्यासाठी विणलेले जाळी आणि कोव, त्यांचा त्यांच्या अंतर्मनाशी होणारा संवाद, सगळ कांही तोडून टाकतात. हे सत्याचे शब्द प्रत्येक जाळीत आणि कोषांत उजेड टाकतात. मला एक म्हातारा प्रवासी आठवतो त्याच्या भोवती एक रहस्यमय अंधार होता. तो सांगायचा की खरं सत्य हे देखील अंधारासारखाच असत - आपल्या अंततर्मनासारखच नसच अद्दश्य.
    पण लोकं त्याची हर उडवायचे ते कायमपणे सत्याबद्दल लिहायचे आणि बोलायचे प्रत्येकाजवळच्या आश्र्वासक अंधाराचा नाश करु बघायचे तो अंधारच सत्याच खरं स्वरुप आहे असं सांगणाच्या म्हाताराची टर उडवायचे. या लोकांच सत्य फार चमत्कारिक होत. प्रत्येकाच सव्य रेगवेगळ होतं, त्यांची एकमेकमांशी सुसंगीत किंवा मैत्री नसायची. लोकं स्वतच सत्य इतरांवर लादण्यासाठी लढाया लढायची, इतरांना ठारही मायायची. म्हणूनच ज्यांची अंधाराशी मैत्री असते त्यांना या सत्याच्या पुजा-यांच कांही समजत नाही. ते त्यांना घाबरतात आणि लपून बसतात. सत्याच्या पुजा-यांनी त्यांचे अंधरमय कोष तोडू नसे म्हणून काळजी करतात.
    सत्याचे पुजारी त्यांच्या सत्याला देव असही म्हणतात. प्रत्येकाच सत्य वेगळ तस प्रत्येकाचा देव निराळा हे देव पण विचित्र असतात. त्यांना एकमेकांशी लढायला आवडत असावं कारण त्यांच्या पुजा-यांना ते लढायला लावतात. इतर सगळयांची सत्य आणि सगळयांचे देव संपेपर्यंत या लढाया चालू राहू शकतात. पण या लढायांच्या धुळीतूनच नवे देव, नवे सत्य, आण नवे पुजारी निर्माण होतात आणि लढया चालूच रहातात.
    म्हातारा प्रवासी विचारयचा - हे असे कसे देव ? ते पण धुळीला मिळतात ? सगळे देव, त्यांचे सत्य,
त्यांचे पुजारी धुळीत परत येतात? बहुतेक धूळच या सगळयांच्या सत्यापेक्षा जास्त शक्तिमान असावी.
    तो विचारायचा - आणि हा तुमचा देव लढयांशिवाय अजून कांय कांय करतो? 'तुला माहित नाही ? देवानेच हे जग निर्माण केल आहे.''आणि जग निर्णय करण्या-या देवाला कुणी निर्माण केल ?किंवा त्याने तरी जग कां निर्माण केल?'म्हाता-या प्रवाशाचे प्रश्न संपत नसत पण तुम्ही जेव्हा उजेडाच्या सत्याचे पुजारी असता तेंव्हा तुम्हाला कांही गोष्टींवर प्रश्नचिन्ह लावलेलं चालत नाही. कुणी तुमच्या सत्यावर किंवा देवावर प्रश्नचिन्ह लावल की तुमचा देव तुम्हाला सांगतो की हा नक्की दुस-या देवाचा अनुयायी असणार - याच्याशी लढाई करा, याला ठार मारा.
    म्हणून म्हाता-या प्रवाशाने प्रश्न विचारले की हे लोक त्याला ठार मारु बघ्ज्ञत त्यांना कळलेल नव्हत की म्हाता-या प्रवाशची अंधाराबरोबर पक्की मैत्री होती. अंधार त्याला नेहमी घेऊन सुरक्षित ठेवायचा. सगळया लोकांना फक्त उजेडात पहायची सवय होती. अंधाराच संरक्षण मिळालेल्या म्हाता-याला ते पाहू शकत नव्हते आणि ठार करु शकत नव्हते.
    आपल सत्य आणि आपला देव यांच वर्चज्ञस्त टिकवून ठेवण्यासाठी लोकांनी आणखीन एक वस्तु शोधन काढली होती - तिच नांव तार्किकता ही तार्किकता म्हणज लोकांचा श्र्वासच जणू. या तार्किकतेच्या जोरावर ते आपल सत्य, आपला देव, आपल्या स्वतःच अस्तित्व पटवून देऊ पहायचे. म्हाता-या प्रवाशाचे प्रश्न सोडले तर जवळपवळ प्रत्येक गोष्टीला ते तार्किकतेच्या जोरावर उत्तरं देऊ शकत म्हाता-या प्रवाशाने तेच प्रश्न इतरांच्या सल्याबद्दल आणि देवाबद्दल उपस्थित केले की त्यांची तार्किकता आनंदायची. इतरांची तार्किकता आणि इरतांच्या देशंची ताकत संपवण हीच त्यांची जबाबदारी होती. म्हाता-या प्रवशाच्या प्रश्नांमुळे तस होत असेल तर वरच!
    पण त्याने तुमच्या देवांबाबत प्रश्न उपस्थित केले तर कस चालेल? तुमच्या देवाबाबत म्हाता-या प्रवाशने विचारलेल्या प्रश्नांना तुमची तार्किकता उत्तर देऊ शकत नाही म्हणून कांय झाल? तुमच्या प्रश्न करणारा दुस-या देवाचा अनुयायी असतो, त्याला ठार करायच असत सत्याच्या पुजा-यांना बहुतेक गोष्टी त्यांच्या तार्किकतेच्या निकषावर तपासून पहाता येत होती. फक्त कोणी त्यांच्या देवा - बद्दल प्रश्न केला किंवा त्यांचा देव कल्पनेतून निर्माण झालाय्‌ अस म्हटल तर पुजा-यांकडे त्याच उत्तर नसायच.
    सत्याच्या पुजा-यांनी उजेड, सत्य, देव, तार्किकता या नंतरचा शोधलेला टप्पा होता ज्ञान!  त्यांनी जाहीर केल की ज्ञान मिळवण हेच जीवनाच ध्येय. या ज्ञानाच त्यांनी शस्त्र वनवलं ज्ञानाच्या शोधात ते स्वतःला आणि इतरांनाही दुखवू लागले. त्यासाठी ते आपला उजेड तास्तीत जास्त झ्गझगीत करु लागले. त्यांना वाटायच की अंधार ज्ञानाला लपवून ठेवतो. म्हणून ते अंधाराचा तिरस्कार करत आणि त्यांच्या सत्यामार्फत अंधाराचा नाश करु बघत.
    या सत्याच्या पुजा-यांच्या जगात म्हातारा प्रवासी वावरु शकत हाता कारण तो अंधार वापरुन आपल्या भोवती एक विणून ठेवायचा, ज्याला तो शहाणपण म्हणयच. पण शहाणपण हे शस्त्र नव्हतं! जे अंधारांशी मैत्री करुन रहातात त्यांना शस्त्रांचा उपयोग नसतो. तुम्ही शस्त्राचा विचार जरी मनात आणला तरी मित्र अंधार निघून जाईल आणि तुम्हाला उजेडाच्या, देवांच्या , तार्किकतेच्या आणि ज्ञानाच्या जगात ढकलून देईल. तिथे तुमच्याजवळ शस्त्र असतील. ती बनवण्याचा ज्ञान असेल आणि ती इतर देवांच्या अनुयायां विरुध्द वापरा असं आग्रहपूर्वक सांगणारे देव असतील.पण म्हाता-या प्रवाशाकडे असणार शहाणपण हे शस्त्र नव्हत. ती एक बचावाची वस्तु होती, जशी ढाल, जसे पायातले बूट ते घालून तुम्ही उजेडाचे कांटे भरल्या रस्त्याने बिनदिक्कत चालू शकता. मग तुम्हाला बचावासाठी लढाई लढावी लागत नाही तुम्ही या उजेडाच्या जगात चालू शकता आणि तरी उजेड तुमच्या जगात प्रवेश करु शकत नाही. उलट लढाई केली तर तुमचा अंधर तुम्हाला सोडून जाईल आणि तुम्हाला उजेडाच्या जगात रहावं लागेल.
असा तो म्हातारा प्रवासी शहाणपण सोबतीला घेऊन वावरत हाता. तो एखांद लहान बाळ पहायचा, ज्याला अजून सत्य, उजेड, देव, ज्ञान आणि या सर्वांसाठी लढल्या जाणा-या लढाया माहित नसायचे. मग म्हातारा प्रवासी आपण शहाणपण त्याच्यावर पसरायचा त्या अंधारात लहान बाळाला सुरक्षित वाटायच. अस त्या बाळांला पण थोडं थोंड शहाणपण येऊ लागायच. ते उजेडाच्या जगातही भिता वावरु शकायच. ते म्हाता-या प्रवाशाच्या जास्त जवळ येत. त्यांच शहाणपण हळूहळू वाढल की तेही म्हाता-या प्रवासारखं जास्त सुरक्षितपणे उजेडांत वावरायच. त्याला दुसरं एखादं उजेडाला आणि तार्किकतेला भ्यायलेल बाळ दिसल की त्याच्यावर अंधाराने विणलेल शहाणपण पसरायच.
अशा त-हेने मी म्हाता-या प्रवाशाला भेटलो. आता या गोष्टीला खूप काळ लोटला मी इथे यायच्या आधी सुरक्षित, ऊबदार अंधारात पाय रोवलेना, त्याच्याही आधीची ही गोष्ट आहे.

-----------------------------------------पुढील ब्लॉग पान पहा

No comments:

Post a Comment