तू ही गोष्ट कल्पनेने लिहिली आहेस ! होय ना? नाही तर कुणी फुलपाखराशी अस वागेल कां? 'पुढल्या वेळी तो आला तेंव्हा मी म्हटल - त्याचे पिवळे पडलेले कागद मी त्याच्या हातात दिले. त्याने कांहीशास अनिच्छेनेच ते परत घेतले, कदाचित माझ्याकडे दिल्यावर त्याला ओझ उतरवल्याने बर वाटल असाव. मला अधी वाटायच तो जवळ कांहीच वाळगत नाही. पण नाही, हे कागद सुगंधाच्या दरीत त्याच्याजवळ होते.
सुगंधाच्या दरीत मी पण कल्पनेच्या राज्यांत वावरत होतो. मला आशा होती, विश्र्वास वाटला होता की प्रवासी त्यांच्या आनंदी अवस्थेत कायमपणे रहातील. पण ही गोष्ट मात्र कल्पित नाही. हे जस घडल तसच लिहिलय. प्रत्येक प्रवाशाची जवळपास हीच गोष्ट आहे. फक्त गोष्टीचा शेवट मी बदलला - मला स्वतःला बरं वाटाव म्हणून एखी सगळीकडे कांय दिसत होत? पंख तूटून पुनः जमीनीवर पडलेले खाचा खळयांनी भरलेल्या पाऊलवाटेने जाणारे प्रवासी. तरंगाय-या दिवशांची आठवण काढून ते दुःखी होत. आता त्यांच्या जवळ सापळा होता. त्यांत त्यांनी सुगंधाला कैद करुन ठेवल होत.
हा सुगंध पकडायचा सापळा खूप जड होता. तो एका प्रवाशाला उचलता येत नसे. दोघांनी मिळून उचलावा लागत असे. कुणी तयार केला होता कुणास ठाऊक ? मला वाटत पंचांनी मुद्दामच तो जड करायला सांगितला असावा. एकटया प्रवाशाला सुगंधाचा गडा सापडू शकत असे पण त्याला सापळयात घालून स्वतःबरोबर न्यायचे तर दुस-या प्रवाशाची मदत लागत असे, आणि तरी तो सापळा दोघांना जडच जात असे पण त्याला धरायला घेनच कडया होत्या त्यामुळे तिस-या प्रवाशाची मदत घेता येत नये.
सुगंध कैद करीपर्यंत प्रत्येक प्रवासी दमून गेलेला असायचा. ज्याचा सुगंधाचा गडडा सापडत असे त्याला निदान पंचाकडून एखादा बिल्ला तरी मिळायचा, पण दुस-याला तोही मिळत नसे् सापळयाच ओझं खूप वाटायच पण पुढच्या प्रवासभर हे ओझ घेऊनच चालाव लागणार होता कारण पंचांनी तसाच नियम सांगितला होता. आता प्रवाशांना पंचांचा राग येऊ लागला होता. पण त्याच्याबद्दलची भिती कांही जात नव्हती. ते एकमेकांना समजवायचे -
सुगंधाच्या दरीत आपल्याला थोडा काळ पंचांचा विसर पडला होता ना - त्याचीच शिक्षा आपण भोगतोय तेंवहा त्यांची आठवण ठेऊन नीट वागलो असतो तर त्यांनी आपल्याला हलका सापळा दिला असता. मग आल्याला हा सुगंध स्वतःजवळ बाळगायला एवढा त्रास झाला नसता.
मग ते सुगंधाच्या स्त्रोताकडे बघत. एव्हाना तो सुकून गेलेला असे. त्यांचा सुगंध संपलेला असे. तो एखाद्या चैतन्य नसलेल्या रिकाम्या आकारासारखाच दिसायचा. तो सुगंध म्हणजेच चैतन्य होत. सुगंधाअभावी प्रवासी पण चैतन्यहीन वाटायचे. ते म्हणायचे - एवढा त्रास घेऊन शेवटी कांय मिळवल? ही नक्कीच शापित दरी आहे. भविष्यातील प्रवाशांनां,
सावध रहा. ही दरी सुगंधाची नाही. ही फसवणुकीची, मायावी दरी आहे. इथे कोणताही सुगंध नाही की सुगंधाचा गडडा नाही. सगळा तुमच्या कल्पनेचा खेळ आहे. त्याला सापळयात अडकवायचा प्रयत्न करु नका. अशाने तुम्हीच अडकाल. तुम्हाला देखील आपल्या जोडीदाराबरोबर असा जड सापळा घेऊनच जन्मभर चाळाव लागेल.
पण त्यांचे शब्द ऐकायला भविष्यातले प्रवासी तिथे कुठे असतात? ते सुगंधाच्या दरीत तरंगत असतात. सुगंधाचा स्त्रोत शोधून सापळयांत अडकवायच्या योजना करण्यांत मश्गूल असतात. त्यातल बहुतेक स्वतःच सापळयांत अडकणार असतात. बहुतेक प्रवाशांसाठी कांही आशा उरलेली नसते.
'बहुतेक प्रवाशांसाठी नाही. म्हणजे कांही प्रवाशांसाठी आहे.'मी म्हणालो. मला त्या प्रवाशांची काळजी वाटायला लागती होती. ढगांची दरी सोडल्यापासून त्यांच्या वाटयाला त्रासच होता. सुगंधाच्या दरीत त्याचा त्रास संपला तर त्यांनी तो पुनः ओढवून घेतला. मी या प्रवासावर जाईन तेंव्हा या भानगडी दुरुस्त करण्याच ठरवल.
'हो कांही प्रवाशांसाठी आशा बाळगता येईल. ते भाग्यवान आहेत कारण ते सुगंधाच्या दरीत गेलेच नाहीत. मी सांगितल नाही कां की ही छोटी दरी बिल्लयांच्या दरीताच एक भाग आहे. काही प्रवासी या दरीत शिकलेच नहीत ते बाजूने निघून गेले. त्यांना सुगंधाच्या दरीतले आनंदाचे क्षण मिळाले नाहीत पण पुढली दुर्दशाही भोगावी लागली नाही.
मात्र सुगंधाच्या दरीतही कांही प्रवाशांना वेगळा उपाय सापडतो. त्या अवजड सापळयशच ओझ सहाण्यापेक्षा पंचांना काय शिक्षा धायची ती देऊ देत अस त्यांना पटत. कारण प्रश्न फक्त ओझ्याचत नसतो. दोद्या जणांना शेवटच्या खिंडी पर्यंत एकमेकांपासून सुटका नाही हे त्यांना जाणवत पूर्वी प्रत्येक फाटयावर कुठली पाऊलवाट निवडायची ते त्यांना ठरवतात येत असे. आता हे पर्याय निवडण्याच स्वातंत्र्यही शिल्लक उरलेक नसत. सापळा टाकून दिला तर तो पर्यायही परत मिळेल आणि ओझ्यातूनही सुटका होईल.
मग दोघे पण दीर्घ श्र्वास घेऊन जोर लावतात आणि जी कजराकुंडी समोर येईल त्यात हा ओझ्याचा सापळा फेकून देतात. पुढच्याच फाटयावर दोघं वेगळया वाटांनीच जायच असा त्यांचा निश्चय झालेला असतो. कधी एकत्र भेटले तर एकमेकांना नांवांचे बिल्ले चिकटवतील पण एकत्र चालणार नाहीत. पंचांना हे सगळ आवडत नाही. ते या प्रवाशांना कर्मकांडाचा खेळ खेळू देत नाहीत. पण प्रवाशांचा इतर वागण नियमाप्रमाणे असल तर कांही काळानंतर त्यांना पुनःखेळात घेतात.कांही प्रवासी थोडी वेगळया पध्दतीने सुटका करुन घेतात. रात्री जेंव्हा सगळीजण झोपेत असतात तेंव्हा एक जण उठून निधून जातो. अशा त-हेने त्याची सुटका होते सकाळी त्याचा जोडीदार उठतो तेंव्हा पहिला त्याला कुठेच सापडत नाही. थोडा वेळ शोधून तो पंचाकडे जातो. म्हणतो - वघ, माझी कांहीच तक्रार नव्हती उलट मला मजाच वाटायची, पण आता मी एकटयाने हा सापळा नेऊ शकत नाही. पंच त्याला समजावतो - ठीक आहे तो सापडत नाही तो पर्यंत तू एकटाच प्रवास कर पण अजूनही तुझ्या सारखाच एखादा एकटा पडलेला जोडीदार असेल तर तुम्ही दोघं मिळून पुनःसुगंधाचा सापळा घेऊन शकता.' तुला खोट वाटेल, पण मला असेही प्रवासी दिसले ज्यांचे पहिले जोडीदार पळून गेल्यानंतर त्यांनी पुनःदुसरे जोडीदार गाठून पुनःसापळयांची हमाली सुरु केली.
पण तिसरी एक युक्ती मला आवडली कांही जोडीदारच असे वागले. त्यांनी सापळा अगदी उंच उचलला आणि भेटणा-या पहिल्या पंचाचा डोक्यावर आदळला. मग ते पुनः एकत्र प्रवास करु लागले तसा कांही नियम नवूनही पाऊलवाटेला फाटे फुटले की दोघांना आपापला फाटा निवडण्याच स्वातंत्र्य होते. पण त्यांनी दरवेळी सारखाच पर्याय निवडला, आणि अशी एकमेकांना सोबत केली.'
-------------------- ---------------------
मी मोठा होत होतो. म्हातारा बाबा मला पहिल्यांदा भेटला त्याला आता दोन वर्ष झाली. तो मला शेवटी भेटला त्यालाही तीन महिने होत आले. प्रत्येक भेटीनंतर मी बदलत चाललो होतो. कुणी इतरांना कस जगाव, कस वागाव याबद्दल उपदेश देऊ लागल की पूर्वी मला त्यांचा तिटकारा यायचा. पण आता मला त्यांचा चक्क राग येऊ लागला त्यांना कसही करुन यांबाबत पहिजे अस वादू लागल. म्हातारा बाबा आपल म्हणण प्रवाशांना पटवू शकला नव्ता. कदाचित पंचांना कांही समजावता येईल. पण म्हातारा बाबा म्हणतो तसे जर ते धूर्त असले तर ? त्यालाच विचारल पाहिजे.
पण आधी माझ्या रोजच्या पंचाच्या बाबतीत कांही तरी करायला हवं हा पंच म्हणजे माझी आई. तिने माझ्यासाठी एक काटेकोर दिनक्रम आसून दिला होता. तिच्या मते मी कांही काम करत नव्हतो म्हणून असा वागत होतो. जर मला रिकामं बसून विचार करायला संधी दिली नाही तर मी रिकामं बसून विचार करणार नाही अस तिच सोप गणित होत. याला दुसर कारण किंवा दुसरा उपाय असेल अस तिला पटत नव्हत. माझ्या मागे भरपूर उद्योग लावून दिले की त्या उद्योगातच माझा वेळ संपेल आणि विचार करत बसण्याला वेळ उरणार नाही.
'तुम्हा मुलांचा दुसरा प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला भरपूर पर्याय मिळालेले आहेत. तुमच्या अनुभवहीन वयातच तुम्हाला इतक्या निवडी दिलेल्या असतात की योग्य निर्णय घेता येत नाही आणि गोंधळ होतात. पण माझ्या मुलाच्या बाबीत मी तस होऊ देणार नाही. शेवटी तुझी जबाबदारी माझ्यावर आहे. तू सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे नाही निघालास तर मला दोष देतील. ते कांही नाही आतापासून मी ठरवून दिलेल्या दिनक्रमाप्रमाणे वागायच म्हणजे तू मोठा झाल्यावर सगळयांना तुझ्या अभिमान वाटेल.
सगळयांना वाटेल पण माझ्या स्वतःच्या अपेक्षेच कांय ? जर मला विचारी माणूस व्हायचच आणि त्या ऐवजी मी विचारशून्य काम करणारा माणूस झालो तर मला स्वतःचा अभिमान वाटेल कां ? पण मोठया माणसांना प्रश्न मांडलेले आवडत नाही. त्यांच्या उत्तरांवर तर नाहीच नाही ! म्हाता-या बाबाच्या गोष्टीतून मी एक चांगल शिकलो होतो. प्रत्येक पाऊलवाटेवर फाटे असतात. आईने केलेलया दिनक्रमातही फाटे होतेच - मला थोडेसे पर्याय म्ळिणार होते. म्हणून नतला जेंव्हा वाटयच किंवा दिसायच की मी लांब डोंगरावर फिरायला गेलोय तेंव्हा मी ख्ररा इंद्रधनुष्याचा अभ्यास करतोय तेंव्हा मी खरा ओळींच्या कचाटयांत अडकलेल्या शब्दांना मोकळ करीत होतो. खेळांत आपण इतरांना चकवतो - गंमत म्हणून, पण आयुष्यांतही आपल्याला पंचाना चकवांत लागत - जगता याव म्हणून !
-------------------------------- ---पुढील ब्लॉग पान पहा
No comments:
Post a Comment