Wednesday, June 5, 2013

खिंडीच्या पलीकडे

खिंडीच्या पलीकडे

    'आणि खिंडीच्या पलीकडे काय आहे? तू तिला शेवटची खिंड म्हणतोस पण खरं तर ती शेवटची असू शकत नाही.  कारण तूच म्हणालास की तिथे प्रवास संपत नाही. तू मला इतर खूप गोष्टी सांगायच कबूल केल आहेस ' माझ्या स्वरांतली निराशा मला लपवता येत नव्हती.
    'खर आहे. प्रवास संपत नाही. पण तुझ्या इतर प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मला अजून एक नाण लागेल'. म्हातारा बाबा त्याची उरलेली गोष्ट घेऊन निघून गेला.
    माझ्या आईने त्या दिवसासाठी मला तेवढ एकच नाणं दिलं होत!
---------------- --------------
    'माझ्या राजा, हा प्रवास खूप दीर्घ असू शकतो किंवा तो छोटासा पण असू शकतो. कधी हा प्रवास उंच उंच डोंगरांच्या खिंडीतून करायचा असतो तर कधी खोल खोल द-यांमधून करावा लागतो.  प्रवासासाठी कोणती दरी निवडायची आणि कुठे पोचण्याच ध्येय वाळगायच हा पर्याय आपल्या हातात नसतो.  इथे थोडया थोडया अंतरावर रस्त्याला फाटे फुटतात.  आपण त्यात एक फाटा निवडून पुढे जायच. थोडयांच वेळात आपण खूप फाटे ओलांडलेले असतात.  इतके की आल्या वाटेने परतणं शक्यच नसत.
    एकदा हा प्रवास सुरु केला की परजून मागे जाण्याचा पर्यायच आपल्या हातात उरत नाही.  मग आपण पुढे जात रहायच ते शेवटची खिंड संपेपर्यंत. अर्धात्‌ प्रवास तिथे संपत नाही.  हा प्रवास संपणारा आहे.

    'शेवटची खिंड ओलांडल्यावर तरी पुढचा रस्ता किंवा घ्येय निवडीच स्वातंत्र्य आपल्या हातात येत कां?' मी विचारल.
    'असेलही कदाचित'. आणि म्हाता-या बाबाने पुनः आपली नजर लांब कुठेवरी लावली.

----------------- ----------------
हा प्रवास सुरु झाला ती ढगांची दरी होती, आजूबाजूला ढगच ढग होते.  छोटे ढग, मोठे ढग! निराळया स्वभावांचे निराळया रंगाचे, निराळया आकारांचे, सतत बदलणारे आकार.  एखादा ढग गालाला लगडून जायचा आणि गाल ओला करुन टाकायचा. एखादा ढग नुसताच आपल्याला एका पोकळीत घेरुन टाकणार आपल्याला  आपण पुनः सुरवातीच्या जागी परत आलो की कांय? एखादा ढग उगीचच एखादी प्रकाशाची तिरीप दाखवणार, मग पुनः अंधारुन टाकणार.  तो अंधार तुम्हाला थंड, आश्र्वासक वाटू लागतो. तोच पुन्हा तुमच्यावर उजेड टाकणार.  सगळया ढगांना वाटत ते तुमच्याशी खेळत आहेत.  तुम्ही त्यांच्या खोडया सहन कराव्यात.  पण खरतर त्यातल्या ब-याच खोडया आपल्याला आणतात'.
    कांही ढग मात्र खरोखरच आपले सवंगडी होतात.  ते जवळ असले की आपल्याला वाटत त्यांनी जवळच रहाव.  पण तस नसत. ढग येतात आणि जातात. किंवा त्यांचे रंगरुप बदलते.  अगदी खेळाच्या मध्ये सुध्दा. तरीपण उगीचच भिजवणा-या किंवा उजेडाची तिरीप टाकणा-या ढगापेक्षा हे सवंगडी ढग आपल्या सोबत असण चांगलच.'
    ' ढगांच्या दरीत पाऊल असतात कां?' मी विचारल. त्याने तंद्रीतून बाहेर येऊन माझ्याकडे पाहिल. 'असतात, आणि आपण त्यांच्या वरुन चालतो सुध्दा. मी तर म्हणेन आपण त्यांच्या वरुन घरंगळत जातो.  गाडी रुळांवरुन जाते ना, तसच. जेव्हा रुळ दुभंगतो, तेंव्हा गाडीला निवड करायची नसते.  ट्रॅक बदलणा-या लाइनमॅन ने आधीपासूनच ठरवून ठेवलेल असत गाडीने कोणत्या वाटेने जायच ते. आपल्याला वाटत, शंभर फाटे फुटतात म्हणजे आपल्याला योग्य फाटा निवडून ठरवू तिथे जाता येईल, पण तस नसत.
    'पण मी तुला सांगत होतो सवंगडी ढगांबद्दल! ते नसले तर ढगांच्या दरीतला हा प्रवार अगदी कंटाळवाणा होऊन जाईल.  पण ते सोबत असले की वाटत या दरीतला प्रवास संपूच नये.  ते माझ्याशी एक मजेदार खेळ खेळत असत. 'ओळखा पाहू' चा खेळ, मी माझे डोळे मिटून घ्यायचे आणि माझ्या मिटल्या डोळयांना काय दिसतय ते ढगाने ओळखायच.  अशी गंमत यायची, ढग नेहमीच ओळखू शकत असे अर्थात्‌, आपण थोडीशी बेईमानी नाही केली तरच.'
    ' बेइमानी कशी करायची?' मी कान हवकारले मी डोळे उघडे टाकले, तर मला काय दिसतय हे ढगाला कळत नसे.  म्हणून मी कांय करायचो, डोळे अगदी उघडत असे, अगदी वारीक फट ठेऊन.  मग त्यातून येणा-या उजेडामुळे मला अंधारात दिसणा-या गोष्टी अस्पष्ट.  फट खूप मोठी केली तर इतका उजेड येथे की अंधारात दिसू शकणारं सगळच पुसून जात आणि ढगाला ते समजतं. पण मी अगदी बारीक फट उघडी ठेवायला शिकलो
होतो त्यामुळे ढगाची फजीती व्हायची.  ढग म्हणायचा सूर्य पण मला दिसत असायचा चंद्र. मग मी डोळे पुनः घट्ट मिटून घ्यायचा. मग ढगाला पण कळायच की मी तर मिटल्या डोडयांनी चंद्र पहातोय. ढग म्हणायचा, 'मी काय अलीकडे म्हातारा होत चाललोय की कांय?' मग त्याला बरं वाटाव म्हणून पुढचे दोन तीन डाव मी डोळयांची फट ठेवीत नसे.
    'आपल्याला सवंगडी ढग भेटत गेले तर ढगांच्या दरीतला प्रवास खूप पटकन्‌ संपून जातो. इतका की आपल्याला वाटत हा प्रवास थोडा अजून लांबला असता तर आपल्याला अजून खेळायला मिळाल असत. त्या उलट उगीचच भिजवणारे ढग भेटत गेले की आपल्याला वाटत कधी एकदा हा प्रवास संपेल. पण नेमक त्याच वेळी हा प्रवास संपता संपत नाही.'
    'मला नाही हे आवडल.' मी म्हाता-या बाबाला सांगितल 'तुझी ही ढगांची दरी म्हणजे अजबच म्हाणायची. जे आपल्याला हव असत ते होत नाही आणि नको असतं तेच नेमक होत.'
    'तसच कांही नाही, एक उपाय आपल्या हातात असतोच ना! कारण सवंगडी ढगांना आपल्या बरोबर कधीही रहाता येत आपण डोळे उघडले तरी आणि मिटले तरी. आपण डोळे मिटले की त्यांना आपल्या मनातल चित्र जास्तच स्पष्ट दिसू शकत.  इतर ढगांच मात्र तस नाही.  आपण डोळे उघडले तरच ते आपल्या जवळ येऊ शकतात. आपण डोळे गच्च मिटून घेतले तर ते आपल्याजवळ येत नाहीत. लांब कुढेतरी उजेडाच्या कोप-यांत निघून जातातः मग सवंगडी ढग पुनः आपल्या जवळ येऊ शकतात'.
    'हे ऐकायला जरा बरं वाटतय. आणखीन कांय कांय असत ढगांच्या दरीत?' मी विचारल!
    'खूप गोष्टी असतात आपल्याला प्रवासात जे जे लागेल ते इथे दिलेलच असत.  इतक की कधी कधी आपल्याला लागणार नसत ते पण दिलेल असत. मात्र इथे निवडीच स्वातंत्र्य नसत. जे दिल असेल तेच घ्याव लागत आणि जे दिल नसेल त्याची तुम्ही गरज ठेवायची नसते.  'या प्रवासात आपल्याला जेवण मिळत, साफसफाई, आंघोळ-पांघोळ करुन मिळते. यातल्या कित्येक गोष्टींची गरज नसते. पण ही सर्व कर्मकांड असतात. त्यांना या प्रवासात खूप महत्व असत.
    'कर्मकांड' हा शब्द मी आज नविन शिकत होतो. ' अशी कोणती कर्मकांड असतात जी एवढी महत्वाची असतात?'
    'ही कर्मकांड फक्त ढगांच्या दरीतच नाही, तर संपूर्ण प्रवासभर महत्वाची असतात. प्रत्येक दरीत, प्रत्येक खिंड ओलांडतांना! कदाचित शेतवटच्या  शिंडीनंतर नसतील - निघल मला नक्की माहित नाही. हे कर्मकांड म्हणजे चैतन्य नसलेला नुसता सांगाडा! कर्मकांडात विचार नसतात त्या ऐवजी काम करायची असतात. पण म्हणजे ती अविचारी काम नसतात.
    अविचारी कामांबद्दल तू खूपंदा रागावून घेतल असशील. कर्मकांड म्हणजे अविचारी काम नव्हे. कर्मकांड म्हणजे विचारशून्य कामं! विचारांचा आधार नसलेली कामं!
    मला कळत अविचारी कामं म्हणजे कांय ते ! त्याबद्दल मी खरच खूपदा रागावून घेतल होत. ती विचारशूल्न्य कामं नव्हती. फक्त त्या कामाबाबतचे माझे विचार इतरांना वेगळे वाटायचे अशा या वेगळया विचारांनी केलेल्या कामांना मोठी माणसं अविचारी कामं म्हणायची आणी मला रागवायची.
    खर तर, त्यांच्या या रागावण्याला मी पण 'अविचारी' म्हणू शकलो असतो की ! कारण माझ्या विचारांपेक्षा त्यांचे विचार वेगळे होते.
    पण मी माझ्या विचारात भरकटत गेलो तर गोष्ट राहून जाईल. या गोष्टीसाठी तर आज मी माझे सगळे पैसे जपून ठेवले होते. मी डोळे चोकले आणी कान देऊन पुढची गोष्ट ऐकू लागलो.

    'अस जागून घे की विचार म्हणजे जीवन - विचार म्हणजे चेतन्य कर्मकांड म्हणजे सांगाडा कर्मकांड म्हणजे चाकोरी. कर्मकांडा मुळे आपल जीवन चाको-या बनत जात. जर आपण निवडलेल्या पाऊलवाटा कर्मकांडांनी भरलेल्या असतील तर आपल बहुतेक जीवन चाको-याच बनून जाईल. शेवटी आपणही चैतन्य नसलेला एक सांगाडाच बनू. मग आपण खूप कांम करु - पण त्यांच्या मागे कसलाही विचार नसेल. असला विचारशून्य आयुष्य खूप सोईच असू शकत. पण त्यामुळे क्वचित्‌ एखादी व्यक्ति वेचैन होते.
    कधी कधी कामातून विचार उत्पन्न होतात. पण मग इतर कर्मकांड लगेच त्या विचारांवर झडप घालून ताबा मिळवत, आणि त्या विचारांच कर्मकांडात रुपान्तर होऊन जात.
    जर आपल्या डोक्यांत खूप विचार येत असतील आणि आपल्या पाऊलवाटा कर्मकांडांनीच भरलेल्या असतील तर आपल्याला त्रास होतो.
    सगळया कर्मकांडाच्या चाको-या आहेत - चेंतन्य नसलेल्या चाको-या चाको-यांना बाहेरुन कवच असत पण आंत जीव नसतो. पण कवच मात्र खूप मजबूत, टणक असत. तू त्यांला भोक पाडायला गेलास तर कवचाचा आकार बदलेल, पण त्याला सहजासहजी तडा जागणार नाही. तडा गेला आणि कवच फुटल तरी आतल्या भकास, जीवशुन्य पोकळीला तडा जाईलच असही नाही. ती रिकामी पोकळी तशीच रहाते - दुस-या कर्मकांडाच कवच तिला झाडून घेईपर्यंत.
    कर्मकांडामुळे आपण 'विचारशुन्य काम' हा खेळ खेळू शकतो. या खेळात आपण एकमेकांना हरवायच असत. खेळतांना कर्मकांड इकडून तिकडे भिरकावल जात. त्याच्यात बदल होतात प्रत्येक खेळागाणिक कर्मकांडात बदल होतात. कधी कधी हे बदल खूप मोठे असतात मात्र खेळ चालूच रहातो.
    कर्मकांडांची जपणूक करण्यासाठी पंच मंडळी असतात. कुणी किती खेळायच ते पंच ठरवतात. कुणी किती खेळायत ते पंच ठरवतात. कर्मकांडात मोठा बदल झाला की पंच मंडळी त्यांना तपासून पहातात, आणि त्याप्रमाणे खेळाच्या नियमात बदल करतात. पंचाना विचार उत्पन्न होऊ देणारी कर्मकांड मुळीच आवडत नाहीत. त्यांना ते लगेच बदलून टाकतात. पंच मंडळींना सगळी जणं घाबरतात. ते कर्मकांड थोपवून खेळ थांबवू शकतात मग सर्व प्रवशांची गैरसाय होते. त्यांच्या आयुष्यांत विचारशुन्य कामाच्या खेळाला खूप महत्व असत. ते पंच मंडळींना खूष ठेवायला बघतात - म्हणजे खेळ चालू राहू शकतो.
    पंच आपल्याला असं भासवतात की आपल्या प्रवासाशी निगडित असलेल्या काही अदृश्य 'मोठया पंचांचे' ते प्रतिनिधी आहेत. मला खात्री आहे की असे 'मोठे पंच' असते तर माझ्या गच्च मिटल्या डोळयांना ते दिसले असते. निदान ढगांच्या दरीतल्या प्रवासात तरी. मग एखाद्या सवंगडी ढगाने मला त्यांच्याबद्दल सांगितले असते. अर्थात्‌ पंच हे नाकवून करतात. ते सांगतात की मोठे पंच कोणत्याही उपायाने दिसू शकत नाहीत. पण ते खोट बोलतात. मला नक्की माहित आहे की मिटलेल्या डोळयांना जगातली कोणतीही गोष्ठ 'अदृश्य' नसते.
----------ज््र----------
    म्हातारा बाबा बरेच दिवस दिसला नव्हता. मी वाट बघत होतो की तो येऊन मला पुढची गोष्ट सांगेल. माझ्या शाळेच्या वहीत मी माझ्या गोल गोल, मोठया अक्षरात त्याने आतापर्यंत सांगितलेली गोष्ट लिहून ठेवली होती. एव्हाना मी तिची इतकी पारायणं केली होती की मला वाढू लागल की आपणचत्या ढगांच्या दरीतून प्रवास करुन आलोय्‌ . मी डोळे मिटून घेई आणि एखादा सवंगाडी ढग येऊन मला कांय दिसतय ते ओळखील याची वाट पहात बसे आणि शप्पथ, एखाद्या वेळी माझे डोळे गच्च मिळलले असतांना कुणीतरी जवळ आल्यासारख वाटायचा त्याचा खळखळून हसण्याचा पण आवाज यायचा तो बोतल असेल तर त्याची भाषा मात्र समजत नये, किंवा प्रवासानंतर मी ती भाषा आता विसरलो असेन. ते आवाज, ती भाषा भूतकाळातल्या कुढल्याशा जमान्याची वाटत असे तिच्यावर माझ्या आताच्या भाषेची पुटं चढलेली आहेत, आणि मला फक्त कांही अस्फुर स्वरच समजू शकतात.
    माझ्या भोवती चाललेले कित्येक व्यवहारही मला म्हाता-या बाबाच्या गोष्टीतल्या कर्मकांडासारखे वाटू लागले. मला त्यांची ओळख पटायची. मला चैतन्य नसलेल्या चाकरेच्या दिसायच्या, विचारशून्य कामं ओळखू यायची. मला आजूबाजूला पंच दिसायचे आणि त्यांचे अदृश्य मोठे पंच कोण असतील ते पण कळायचे पण हे सगळ माझ्या आताच्या काळात कस असेल? त्याला तर हे सर्व ढगांच्या दरीच्या प्रवासात दिसल होत. तो चुकत होता कां? की म्हातारपणामुळे विसंगत बोलत होता ? पण माझ्या मनाला त्याच्यावर लावलेले हे आक्षेप पटले नाहीत. मी ठरवल की तो आल्यावर त्याला विचारायच. कधीही आला तरी, लक्षांत ठेऊन विचारायच.
----------ज््र----------
    रोज आगदी सकाळी उढल्यापासूनच मी म्हाता-या बाबाची वाट पाहू लागतो होतो. खडीच्या रस्त्यावरुन त्याच्या काठीची ठक्‌ - ठक्‌ ऐकण्यासाठी मी कान टवकारत होतो. त्याच्या लाकडी खडावा आणि त्याची काठी ! चार आवाज खडावांचे, एक काठीचा ठक्‌ - खट् - खट् - खट् - ठक्‌ - खट् - खट् - खट् - खट् - ठक्‌. तो वळणावर दिसण्याच्या आधिच हा संथ लयीचा आवाज माझ्या कानावर पडतो. आधी अगदी मंद, हलकेच येणारा आवाज, हळू हळू मोठा होत होत अचानक ठक्‌ - आणि वळणावर त्याची काठी दिसते. एका क्षणापूर्वी ते ठक्‌ - खट् - खट् आवाज म्हणजेच म्हातार बाबा होत आता त्याच्या काठींच खालच टोक - आता त्याच्या डाव्या पायाचा कांही भाग - आणि मग एकदम त्याचा उजवा पाय, काठी धरलेला डावा हात, आणि थोडीसी पुढे झुकलेली मान, जणूकांही शरीराच्या इतर अवयवांआधीच कुठेतरी पोचायला उतावीळ झालेली ! त्याचे डोळे जरी थेट समोर बघत असले तरी त्याच्या नजरेतून काही सुटत नव्हत. संथ लयीत त्याची पावल तशीच हळू - हळू पडत होती. त्याला जर कुठे थांबयची नसत, तर तो अनंत काळ चाललाच होता - त्याच्या शेवटच्या खिंडीच्या प्रवासात ! तो कधी दमला नाही कां?
    'हो, कधी कधी दमत होतो ना, प्रत्येक जण दमत - कधीमधी कारण हा खूप दीर्घ प्रवास आहे. पण ढगांच्या दरीत मात्र नाही हं ! ढगांच्या दरीतून जातांना आपल्या लक्षांत येत की ही दरी वाढतच चालल्येय्‌. अगदी लांब नजर जाईल नतथपर्यंत ढगच ढगच दिसतात. काही ढग आपल्या बरोबत येत असतात, कांही मात्र थांवून राहिलेले असतात - कदाचित त्यांना दुसरे प्रवासी भेटलेले असतील खरच, तू दमल्याबद्दल विचारत होतास नाही कां? या प्रवासात आपण दमलो की आपल्याला वाटत ती शेवटची खिंड लौकर यावी. आपण उडी मारुनच ती ओलांडावी आणि हा प्रवास एकदाचा संपवावा आपल शरीर पुढे चालायला नकार देत, उत्साह तर पार कुठेतरी पडून गेलेला असतो प्राणही जणू निघून जायच्या बेतात असतात, डोक्यांत फक्त एकच विचार असतो, शेवटची खिंड ओलांडावी आणि प्रवास संपवावा.'
    'पण शेवटच्या खिंडीपर्यंत पोचायला खूप प्रवास करावा लागतो ना? तूच तर सांगितलस की खूप द-या आणि खूप खिंडी ओलॉडाव्या लागतात !'
    'मी तस सांगितल कां? तर मग तसच असेल कारण तुला सांगतांना मला जसं दिसल होत तसच मी सांगत गेलो त्यातल सगळच मला समजल होत अस नाही. आपण असं खूपसं बघतो जे आपल्याला समजत नाही. पण आपल्याला ते जाणवलेल असत. आपल्याला खूपशा गोष्टी समजत नाहीत पण जाणवतात, आणि माहित असतात.
    'अगदी खरच्‌ जसं मला त्या झाडावर-या पक्षाच गाणं समजत नाही, पण ते मला माहित असत. ' मी म्हणालो.
    'तुला छान उदाहरण सुचल' म्हातारा म्हणाला. ' तसच मला समजल नसल तरी माहीत आहे की खूप खूपशा द-या आणि खिंडी ओलांडल्यावर मगच शेवटची खिंड येते. मात्र मला हे ही माहित आहे की कांही प्रवासी ढगांच्या दरीमधूनच शेवटच्या खिंडीत पोचतात, किंवा प्रवासातल्या मधल्याच कोणत्या तरी दरीतूनही तिथे पोचू
शकतात आता आठवल. मला प्रवासात एक झाली माणूस भेटला होता. त्याला या प्रवासाबद्दल सगळ सगळ कांही माहित होत. त्याच कारण बहुतेक हेच असाव तो कोणतीही गोष्ट समजाण्याचा किंवा तिचा तार्किक कीस काढायचा प्रयत्त्न करत नसे. तो एकटयानेच प्रवास करायचा आणि सहसा कुणाशी बोलत नसे. तो बोलू लागला तर लगेच इतर प्रवासी त्याच्या भोवती गोळा होऊन त्याला प्रश्न विचारायचे. त्यांना नुसती माहिती नको होती. त्यांना समजून घ्यायच असे. तसळे प्रश्न ते विचारु लागले म्हणजे ज्ञानी माणसाला ते आवडत नसे. तो पुनः गप्प होऊन चालू लागायचा.
    पण एक दिवस तो माझ्याशी खूप बोलला. त्यानेच मला सगळी माहिती सांगितली प्रत्येक दरीला एकूण तीन खिंडी असतात. एका खिंडीतून आपण दरीत प्रवेश करतो. मग दरीतल्या पाऊलवाटा सुरु होतात - दर थोडया थोडया अंतराने खूपसे फाटे फटणा-या पाऊलवाटा त्यांच्या - वरुन तुम्ही जात रहायच, एकेका फाटयाची निवड करत. यातल्या कांही वाटा तुम्हाला दुस-या खिंडीशी आणतात - ती ओलांडली की तुम्ही एका वेगळया दरीत जाता आणि मग त्या दरीतल्या प्रवासाला सुरवात होते. पण कांही वाटा तुम्हाला शेवटच्या खिंडीशी आणून सोडतात. तिथे पोचल्याबरोबर आपल्याला कळतं ही शेवटची खिंड आहे म्हणून. थोडक्यात तुम्ही कोणत्याही दरीतून शेवटच्या खिंडीत पोचू शकता. पण त्या वाटांची निवड करणं आपल्या हाती नसत. तुम्ही खूप दमला असाल आणि शेवटची खिंड ओलांडून प्रवास संपवावा म्हटलत तरी नाही.
    'मग दमल की आपण काय करायच?
    ते मला नाही सांगला येणार आणि तस कांही करण आपल्या हातात नसत मला एवढच माहित आहे की कांही तरी होत. तुमच्या प्रत्येक फाटयागणिक जर तुम्ही शेवटच्या खिंडीच्या जवळ- जात नसाल तर तुम्ही स्वतःला
    'पण तूच तर सांगितलस की एकदा हा प्रवास सुरु झाला की आपल्या हाती कांहीच पर्याय उरत नाही, आणि आपण थांबूही शकत नाही.
    ते ही खरच आहे. आपल्याला कृती काय करायची हा पर्याय आपल्या हाती नसतो. पण विचार काय करायचा ती निवड तर असते म्हणून तर ते सगळे पंच तुमच्यावर लक्ष ठेऊन असतात. ते लगेच तुम्हाला कर्मकांडांची सूचना करतात, ज्यामुळे तुमचे विचार थांबावे आणि कृती सुरु व्हावी. विचार थांबले की आपली निवड करण्याची शक्ति सुध्दा संपून जाते. अर्थात्‌ कृतीतून देखील विचार निर्माण होतात. पण ते अल्पजीवी असतात ते निर्माण झाले की पंच लोक लगेच त्यांचा ताबा घेऊन त्यांना दुस-या कर्मकांडात आडकवून टाकू शकतात. पण एखादा विचार मात्र मनाच्या अंधा-या कोप-यांत दडून राहू शकतो. तो असला की तेवढा पर्याय तुमच्या हातात असतो - विचार - करण्याचा पर्याय.' त्याचा आवाज आता खूप दमल्यासारखा झाला होता. 'तुझ्या प्रश्नांमुळे मला समजून घ्यांव लागतं असो'.
    तर तुम्ही स्वतःला सांगायच की तुम्ही प्रवास थांबवलाय्‌. म्हणजे तुम्ही प्रवास थांबवल्या सारखच होत. एकदा कां मानलं की कृती थांबली आहे, म्हणजे विचार येऊन गर्दी करुन लागतात. मग एखादा प्रवासी किंवा पंच तुमच्याकडे एखांद कर्मकांड भिरकावतो. तुमचे कांही विचार नष्ट होतात आणि कृति सुरु होते. अस झाल की पुनःप्रवास सुरु होतो. तोपर्यंत कदाचित शेवटच्या खिंडीबद्दलचे विचारही विरुन गेलेले असतात. तुला हे रहस्य सांगतो खूप प्रवाशांना हा कर्मकांडाचा खेळ खुप आवडतो. त्यांना प्रत्येक दरीत खूप वेळ भटकायला मिळावस वाटत. त्यांना शेवटची खिंड ओलांडायची नसते त्या विचारानेच ते दुःखी होतात. कदाचित त्या खिंडीपलीकडे जे अज्ञात आहे त्याला ते भीत असतील. पण मी तुला सांगितल ना की त्यांच्या हातात कांही नसत कदाचित्‌ त्या क्षणी ते शेवटच्या खिंडीच्या जवळ येऊन ठेपलेले असतील. काही पाऊलवाटा इतक्या चकवा देण्या-या असतात की त्यांच्या वळणापलीकडे काय आहे याचा अंदाजच लागत नाही. पण कांही पाऊलवाटा थेटपर्यंत नजरेच्या टप्प्यांत रहातात. अशा वेळी तुम्हाला कळत असत की हळूहळू आपण कुठे पोचणार आहोत. आवडो अगर आवडो !
    आणि तरी एखाद आश्चर्य घडू शकत. अगदी शेवटाजवळ येऊन तुम्हाला दिसत की तुमच्या पाऊलवाटेवर फाटे फुटलेले आहेत आणि तुम्ही निवडलेला फाटा तुम्हाला पुनः खिंडीपासून लांब घेऊन चाललाय्‌ पण इतक्या वळगानंतर तुम्ही मागे तरी कसे येणार ? तुम्ही पुनः कुठल्यातरी वेगळयाच ठिकाणी जाऊन पोचता.'
    'तुझ्या वर्णनावरुन वाटतय्‌ की या द-या खूप मोठाल्या असाव्यात. तिथे गर्दी नसेल. नाही कां?' मी विचारल.
    'मला नाही वाटत गर्दी असते म्हणून' तो म्हाणाला.'काही पंच म्हणतात की आताशा गर्दी वाटव चाललीय दररोज वाढत्या क्रमाने ढगांच्या दरीत प्रवासी येऊ लागले आहेत पंचांना वाटत की लोकंानी शेवटची खिंड ओळखायचा आणि तिकडे जाणारे फाटे चुकवायचा कांहीतरी उपाय शोधून काढला आहे पण त्यामुळे गर्दी वाढयला नको कारण लोकांनी शेवटची खिंउ नाही ओलांडली आणि ती तिसरी खिंड ओलांडली तरी गर्दी कमी होईल. पण पंचांना शंका आहे की जस लोकांनी शेवटच्या खिंडीकडे जाणारे फाटे चुकवायच शिकून घेतल, तसच जर तिस-या खिंडीकडे जाणारे फाटे पण ते चुकवत असतील, तर दरीत येणा-यांची संख्या वाढेल आणि बाहेर जाणा-यांची कमी होईल. म्हणूनच कदाचित गर्दी वाढत्येय्‌.
    पंचांची काळजी अशी की प्रवाशांना एकदा का पाऊलवाटेचा योग्य पर्याय शोधून कोणती खिंड कधी ओलांडायची हे ठरवता यायला लागल की ते दरी बाहेर जाणार नाहीत आणि दरीतली गर्दी - वाढली की कर्मकांडाच्या खेळाच महत्व संपेल मग पंचांची गरजच उरणार नाही. त्यांची नोकरी जाईल हीच त्यांना खरी काळजी आहे.
    ' तुला त्यांची काळजी रास्त वाटतेकां? मला पण वाटत की मला जर कधी या द-यातून प्रवास करायचा असेल तर तेंव्हा तिथे गर्दी नसावी' मी म्हटले.
    ' बध, तू त्यांच्यासारख बोलू लागलास असे, जर तुला गर्दी नसावी अस वाटत तर तूच तिथे जावसच कशाला? इतरांना तुझ्यामुळे गर्दी कां कराचीच? हे कांही योग्य नाही आणि तस पाहिल तर, नुसत गर्दी असण्यामुळे कांही बिघडत नाही फक्त कर्मकांडांच खेळ थोडा विस्कळीत होतो एवढच, पण त्याची काळजी पंचांना - कारण त्यांचा मान कमी होईल प्रवाशांपुरत म्हणशील, तर प्रत्येक दरीत, प्रत्येक पाऊलवाटेला इतके असंख्य फाटे आहेत की कुणालाही गर्दीच्या त्रास होऊ शकत नाही.
    'कळल एकूण हेच की माझ्याकडे एक पर्याय आहे. मी दमलो की स्वतःला सांगेन की प्रवास थांबला आहे. अजूनही एखादा पर्याय आहे कां? मी विचारल.
    ' हो, आहे का। दुसरा पर्याय म्हणजे चालत रहाणे पण तो काही खरा पर्याय नाही' म्हतारा बाबा हळूहळू उठला, काठीवर भार देत लांबवर आपली दृष्टि भिडवली आणि चालू लागला - ठक्‌-खट्-खट्-ठक्‌-खट्-खट्-खट्-खट्------ आमच्या जुन्या गांवाच्या वेशी पलीकडे कांय- बाय आहे कुणास ठाऊक - तिकडेच तो निधून गेला.
---------------------------------------पुढील ब्लॉग पान पहा 














No comments:

Post a Comment