Wednesday, June 5, 2013

खिंडीच्या पलीकडे शांतीची दरी

खिंडीच्या पलीकडे 
म्हाता-या बाबाने डोळे उघडले आणि मंदसा हसला. मी गोष्ट वाचून दाखवत असतानाही तो मिटल्या डोरपांनी हसतच होता. तुला सगळं पटकन - उमजत तो म्हणाला.
    आज मी तुला प्रवासातल्या अशा दरीबद्दल सांगणार आहे जिथे सगळे प्रवासी आनंदात असतात. आपण तिला शांतीची दरी म्हणू. इतर प्रत्येक दरीतून फार थोडया पाऊलवाटा या दरीत येतात. इथून मात्र सगळया पाऊलवाटा शेवटच्या खिंडीकडेच जाता. इथे आल्यावर तुम्हाला लगेच कळत की इथून दुसरीकडे कुठे जायच नाहीये. एकतर इथेच मनमुराद भटकायच किंवा शेवटच्या खिंडीकडे जायच.
    इथे इतर द-यांसारख कांहीच नाही. कुठलाही कर्मकांड नाही, खेळ नाहीत, बिल्ले नाहीत, सापळे नाहीत, आणि पंचही नाहीत. जे पंच या दरीत प्रवेश करतात, त्यांना पण आंनद असा व्यापून टाकतो की ते आपला पंचाचा पोषाख उतरवून टाकतात ते प्रवाशांना सांगतात - इथे येऊन आम्हाला कळल आम्ही केवढया चुक केल्या ते ! कर्मकांडाच्या खेळात आनंद कुठे आहे ? त्यांच्या शिवाय मी इथे किती आनंदी आणि शांत आहे. जे प्रवासाच्या सुरवातीलच इथे येऊन पोचले जे किती भाग्यवान ! इथे येऊन कांहीही मिळवायचे नाही. फक्त शेवटाच्या खिंडीपलीकडे जायचय्‌.
    या दरीत बसून शीण घालवण्याच्या कित्येक जागा आहेत. फुलाफळांचे बगीचे - आहेत. छोटे छोटे ओढे आहेत. तिथे बसल की सूचना फलक दितो इथे आंनदात असाल तर कुठेतरी आण्याची घाई करु नका थोडया वेळाने तुम्ही उठून चालु लागलात की फलकाची दुसरी बाजू दिसते त्यावर लिहिल असत - दुसरीकडे कुठेही जा - अशी विश्रांति - स्थळ जागोजागी मिळतील. अशा हा आनंदाचा प्रवास असतो.
    आता प्रवाशांना कर्मकांडाचा खेळ खेळावा लागत नाही, मग ते स्वतःचे कांही खेळ खेळतात कां ? मी विचारल.
    मला नाही तस वाटत. निदान मी तरी कुणाला खेळातांना पाहिल नाही. आणि जो कुणी इतका आनंदी असेल तो खेळायला जाईल कां?
    ' ते मी कस सांगू? मी पण खेळ खेळतच नाही. आई मला खूप रागावते. इतर मुळ कसं दोन्ही हातात मावत नाहीत इतके कप आणि बक्षिस जिंकून आणतात. ती म्हणजे तुम्ही खेळलात म्हणजे कुणीतरी जिंकणार ! पण मी म्हणतो, तुम्ही खेळलात म्हणजे कुणी तरी हरणार. ती म्हणजे खेळ खेळून तुम्ही हुषार आणि चलाख बनता, मग तुम्ही जास्त वेळ जिंकु शकता. मी म्हणतो - म्हणजेच कुणीतरी जास्त वेळ हरणार असत, मग त्या हुषार आणि चलाख बनण्याचा कांय फायदा ? मी एकदा तिला विचारल - असा कांही खेळ आहे का ज्याच्यात सगळी जण जिंकु शकतात्‌ ती खूप चिडली म्हणाली - तू महा आळशी आहेस. तुला मेहनत करायला नको, तू कधीच जिंकणर नाहीस, पण मला तिच्या म्हणण्याचा वाईट वाटल नाही कारण तिच्या म्हणण्याचा असा अर्थ होतो
की मी कुणला हरण्याच दुःख देणार नाही.
    ती मला म्हणाली की निदान व्यायामासाठी आणि आरोग्यासाठी तरी मी खेळल पाहिजे. पण पक्षी कसे खेळताच कितीतरी व्यायाम घेत असतात ते कसे निरोगी असतात. ते कधीच दमत नाहीत. मी बघतो ना त्यांना ते इकडून तिकडे घिरटया घालतात, उडया मारतात, फांदीवर बसून गाणी म्हणतात. त्यांना कुठे एकमेकांना हरवाश्च असतं? मी पण लांब फिरायला जातो, त्यात मला मजा वाटते. मला स्वर हवे असले की मी गातो, बोलतो. मला शांतता हवी असली की मी चुप होतो. मला हव तस हळूहळू किंवा भरभर चालतो बसावत वाटल तर बसतो. कितीतरी पर्याय असतात. खेळात तुम्हाला पर्याय नसतात. खेळाच्या नियमाप्रमाणेच खेळवं लागत. आणि खेळात हमखास कुणी तरी हरणारच असत.
    एकदम माझ्या लक्षात आल की आज आमच्या भूमिका बदलून गेल्या आहेत. मीच बोलतोय आणि त्याने श्रोत्याची भूमिका घेतली आहे. आणि मी त्याच्याकडून गोष्ट ऐकण्यासाठी त्याला नाण पण दिलेल आहे. पण मी अस मोकळेपणी कधीच कुणाशी बोललो नव्हतो. मी एकदा असतांना स्वतशी बोलतो तितकच मोकळेपणी त्याच्याशी बोलत होतो. आपण दुस-या कुणा - बरोबर असूनही स्वतः बरोबरच असल्यासारख काय वागतो ?मी स्वतःलाच पण मोठया आवाजात प्रश्न विचारला.
    म्हातारा जोराने हसला. मी तुला प्रश्न विचारुन सुरवात केली आणि तुही उत्तराचा शेवट प्रश्नानेच केलास! मी त्याला इतक हसतांना कधीच पहिल नव्हत. मी तस म्हणालो . ' तस कांही नाही. मी एकटा असलो की खूप हसतो. इतर माणसं समोर असतांना आपण हसल की त्यांना वाटत आपण कुठलातरी खेळ खेळतोय्‌. अशी माणसं आनंदी नसतात. त्यांना आनंद मिळवण्यासाठी कांही तरी खेळ खेळावे लागतात.
    सगळे खेळ हे आपल्या मनाला समजावण्यासाठी असतात. तुम्ही दुस-यांच्या बद्दल जशी समजूत करुन घेता, तसे ते प्रत्यक्षांत नसतात. तुम्ही स्वतःबद्दलही अशी समजूत करुन देता, जसे तुम्ही नसता ! तुम्ही एकटे नसता, तेव्हा अशा भ्रमाक्या जगात वावरता. पण एकटे असतांना तुम्ही काय आहात ते तुम्हाला जाणवलेल असत. तेंव्हा तुम्ही भ्रमान रहात नसता.

    म्हणून बघ, आपण ज्यांना पूर्णपणे जाणतो, अशांच्या सोबतीत असलो की आपण एकटेपणी वावरतो - तेवढयाच मोकळेपणने वावरु शकतो.'तो कांय म्हणत होता ते कळून माझा चेहरा एकदम उजळला.
    'होय माझ्या सवंगडया !' अस म्हणत तो उठला आणि चालू लागला!
                 -----------------------------------  
    तो दुस-या दिवशीच परत आला. आणि मी नाणं द्यायच्या आतच त्याने गोष्ट सुरु केली.
    शांतीच्या दरीत प्रवासी खेळ नाही खेळत. पण ते खेळतच नाहीत अस नाही. ते खूप खेळतात आपण कुणाशीही खेळू शकतो - स्वतःशी देखील. किंवा आपल्या सोबत्याबरोबर. शांतीच्या दरीत कुणी पाण्याशी खेळत, कुणी वा-याशी, कुणी इंद्रधनुष्याशी. कुणी पक्षां बरोबर तर कुणी कुणीही नाही बरोबर 'कुणीही नाही' बरोबर? कुणीही नाही बरोबर कसं खेळता येईल ? ही कांय गोष्ट असते ? कुणीही नाही ही एकमेत गोष्ट आहे जी सागळीकडे आहे. पण तुला ती उमजायला अजून वेळ लागेल. असो प्रवासी खेळत असतात ते इतरांना दिसत नाही. त्यांना प्रेक्षक नकोच असतात. म्हणून त्यांचे खळ निदान डोळयांना तरी दिसत नाहीत, एखादा प्रवासी विश्रामथांब्यावर बसलेला दिसेल, दोन प्रवासी हातातहात घालून चालत असतील, किवा ब-यांच प्रवाशांचा घोकका दिसेल - पण कोण जाणे, ते कुटल्या तरी खेळांत असतील. इथल्या खेळांना बियम नसतात खेळात भिडू असतील किंवा नसतील कधी क्षणभरासाठी भिडू असेल तर कधी खूप काळासाठी इथले प्रवासी कधी पाण्याचे तुषार बनतील, कधी हवेची झुळुक ! कधी धूलीकरण बनतील तर कधी पक्ष्यांचे गाण! कुणी विचार बनून जाईल. कुणी
कुणीही नाही.
    हे कुणीही नाही जरा रहस्यमाय बनत चालल होत. म्हातारा बाबाच्या मते ही अशी गोष्ट होती जी अजून कांही काळानंतर माझी जाणीव वाटली की मग मला उमजणार होती. माझी आईसुध्दा हे वर्णन वापरायची - पण तिटकारा दाखवण्यासाठी. ती म्हणायची तू त्या अंधाच्या कोप-यांत बसून कांही तरी विचार करत असतोस. हीच त-हा दिलीतर मोठा झाल्यावर तु कांय होशील - कुणीही नाही ! तुझ्या वयाच्या इतर मुलांकडे वघ ! ती एव्हापासूनच कुणी ना कुणीतरी होण्याच्या मार्गावर आहेत.'
    म्हाता-या बाबने आजची गोष्ट पुढे चालवली. 'कुठल्याही दरीतले प्रवासी शांतीच्या दरीत येऊ शकतात. कुणी सरळ ढगांच्या दरीतून इथे येतो, कुणी बंदिस्त सुटांच्या दरीतून, कुणी बिल्लयांच्या दरीतून, कुणी सुगंधाच्या दरीतून तर कुणी गोल रस्त्यांच्या दरीतून इथे आलेले असतात. इथून सगळयांना शेवटच्या खिंडीकडेच जायच असत.
    पण सगळे प्रवासी कांही शांतीच्या दरीत सेत नाहीत. मी तुला आधी पण सांगितल हात की खरं तर फार थोडेच प्रवासी इथे येतात. जे इथे येत नाहीत त्यांना दुस-या एक कठिण दरीतून जाव लागात. मी तिला काटयांची दरीच म्हणतो. या दरीतला प्रवास सगळयंत दुःखाचा आणि कष्टाचा. इथले अगदी थोड फाटे शंतीच्या दरीकडे जातात. इतर सर्व शेवटच्या खिंडीकडे - पण तेही खूप खूप प्रवासानंतर !
    इथले रस्ते पण दगडगोटयांनी भरलेले आहेत. तुला वाटेल इथे इतके प्रवासी येतात तर सतत चालल्या मुळे तरी रस्ते गुळगुळीत होतील, पण दगड ओबडधोबड आणि तीक्ष्णच असतात. प्रवाशांचे पाय रक्तबंबाळ होतात, त्यांच्या वेग मंदावतो. आपल्याला भरभर चालता यावा, प्रवास लौकर संपवता यावा अशी त्यांची इच्छा असते. त्यांच्या खूप इच्छज्ञ असतात - पण त्यातली एकच पूर्ण होण्यासारखी असते - शेवटच्या खिंडीपर्यंत पोचण्याची.
    इथे त्रास देण्या-याच गोष्टी आहेत. उस्त्यावरचे तीक्षण दगड हे एक कांटेरी झुडप दुसर दगड बोचतात म्हणून प्रवासी गवतावरुन चालायचा प्रयत्न करातात, आणि पायाला शेकडो कांटे घायळ करतात. डोक्यावरच्या झाडाच पिकलेले फळ काढायला जातात तर संपूर्ण हातच काटयांनी जरवडून निघतो. प्रवासी मदतीसाठी ओरडतात. तस इतर प्रवासी मदतीसाठी ओरडतात. तस इतर प्रवासी मदत करतातही. कुणीतरी येऊन त्याचा हात कांटेरी फांद्यापासून सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण त्यात त्याचाच हात अडकतो. अस बराच वेळ चालू रहात.
    मला अक्ष्चर्य वाटायच की प्रवासी झाडांवरची फळ काढायला का जातात? खर तर चांगली टपोरी पिकलेली फळ वाटेवर पडलेली असतात, पण बहुतेक प्रवासी ती फळ खात नाहीत.कदाचित इथेही कर्मकांडाने त्यांची पाठ सोडलेली नसेल कदाचित पंचांनी त्यांना सांगितलेले असेल की झाडावरुन तोडूनच फळ खायची त्याशिवाय ते असा वेडेपणा का करतील.
    इथल्या प्रवाशांना सोबत चालणा-या प्राणी आणि पक्ष्यांचा पण राग येतो. त्यांना वाटत हे आपण खाण हिसकावून घेण्यासाठीच आपल्या सोबत येताहेत. मग ते दगड उचलून त्याच्यावर भिरकावतात मला वाटत म्हणूनच इथले रस्ते असे दगडधोंडयांनी भरलेले आहेत.
    मी विचारल - ते पक्षी आणि प्राणी खरच कां त्रास देतील ?मला नाही पटत. मी कधीच त्यांनी माणसाला त्रास दिलेला पाहिल नाही. उलट माणसाकडेच त्यांना त्रास देण्यासाठी जाळी आहेत, सापळे आहेत, पिंजरे आहेत, साखळया आहेत!
    खरं आहे. म्हातारा बाबा म्हणाला या प्राण्यांनी प्रवाशांना कधीच त्रास दिलेला नसतो. उलट ढगांच्या आणि शांतीच्या दरीत तर ते आपल प्रवाशांची मनस्थिती इथले प्रवासी स्वतःवरच चिडलेले असतात आणि इतरांवरही ! म्हणूनच एखाद्या पक्षाने त्याच्यासाठी गाण गायला सुरुवात केली की तो चिडून म्हणतो - 'गाऊ नकोस, चालता हो! या वैतागाच्या दरीत गाण्यासारख कांय झालय तुला?' बिचारा पक्षी संकोचून जातो. त्याने प्रवाशाचे लक्ष
दुसरीकडे जाऊन दुःख कमी व्हाव म्हणून गाण सुरु केलेल असत. तो एक वेगळ गाण सुरु करतो. प्रवासी आता खूपच रागावतो. तो पक्ष्याकडे दगड भिरकावतो 'तू मला चिडवायला हे गाण म्हणतोस. तुला उडता येतय म्हणून. तुला देखील या दगडांवर चालाव लागल असत तर तू गाण - बिण विसरला असतास !'
    या प्रवाशांना गाण चालत नाही. कुणी आनंदात असलेल चालत नाही. कारण त्यांना मदत हवी असेत. ती मदत प्राणी किंवा पक्षी देऊ शकत नाहीत.गाण्यामुळे विचारा झालेल्या जखमा बुजल्या जातात पण हाता पायाच्या जखमा बुजत नाहीत.
    पण प्रवासी एकमेकांना मदत करु शकतात आणि करतात. एखादा प्रवासी दमून बसला असेल तर दुसरा तयाच्याजवळ जाऊन त्याला कांहीतरी दाखवतो - हे बघ, तुझ्या जखमा ब-या करण्यासाठी मी कांही तरी शोधून आणलय, तोही एक खोटा दिलासाच असतो. पण पहिल्या प्रवाशाला बर वाटत - कुणीतरी समदुःखी माणूस दुःख वाटून घ्यायला प्रयत्न करतय म्हणून.
    या दरीतही पंच असतातच. प्रवासी त्यांना मदतीची विनंती करतात. शांतीच्या दरीचा किंवा शेवटच्या खिंडीचा रस्ता दाखवण्याची विनंती करण्यात. पंच गंभीरपणे मान डोलावतात - तुमची वेळ आली की सगळ सापडेल तोपर्यंत तुम्हाला दिलेल्या सल्लयाप्रमाणे वागा ! बिचारे प्रवासी पुनः जाऊन झाडांची फळ तोडून लागता - की कदाचित या कर्मकांडामुळे त्यांना शेवटची खिंड लौकर सापडेल त्यांना कळत नाही की पंचांना स्वतःला तरी कुठे माहित असत की ते कधी या दरीतून बाहेर निघू शकणार आहेत म्हणून ! त्यांचा प्रवास सुध्दा कष्टाचा, वेदनांचा आणि जखमांचाच असतो. पण ते आस कबूल करत नाहीत. आपल्या जखमा लपवून ठेवतात तरी ते दमून बसले की इतर प्रवासी त्यांना मदत करतात. अशा भावनेने की पुढे हे पण आपल्याला शेवटच्या खिंडी पलीकडे जायला मदत करतील.
    काटयांच्या दरीत एक छोटी दरी आहे - दुक्याची दरी. इथे येणा-या प्रवाशाला आजूबाजूच कांहीच दिसत नाही - फक्त एक पांदुरका उजेड दिसत रहातो. इथला प्रवास जास्तच त्रासाच असतो. तुम्हीं दगडांवर किंवा गवतातल्या काटयांवर जास्त आदळता. इतर प्रवासी आणि पशु पक्ष्यांशी तुमची सारखी टक्कर होते. सगळे तुम्हाला त्रास देण्यासाठीच इथे आलेत अस वाटत. हे धुक कधी संपणारच नाही अशी भिती वाटते. पाऊलवाटा आणि त्यांचे फाटे पण दिसत नाहीत त्यामुळे निवडीचा पर्याय पण संपून गेलेला असतो.
    मग एखाद्या दिवशी प्रवासी म्हणतो - या धुक्यामुळे मला कांहीच दिसत नाही तरी मी डोके फाडून कांही तरी बघण्याचा प्रयत्न कां करतोय्‌? कां माझ्या डोळयांना दमवतोय ?त्यापेक्षा डोळे मिटले तर त्यांना विश्रांति तरी मिळेल आणि रस्ता चुकण्याची भिती तर नाहीच, उलट मला आठवतय ढगांच्या दरीत डोळे मिटले की विचार स्पष्ट दिसू लागायचे जाणो इथेही डोळे मिटून रस्ता दिसेल !मग प्रवासी डोळे मिटून घेतो. त्याला लगेच बंर वाटू लागत. थकवा जाऊ लागतो त्याचा प्रवास भराभर संपतो. लॉकरच तो धुक्याच्या आणि काटयांच्या दरीतून बाहेर पडलेला असतो.
    धुक्याच्या दरीत इतर प्रवासी दिसत नाहीत पण काटयांच्या दरीच्या इतर भागात मात्र तस नाही. तुम्हाला थकले भागलेले प्रवासी दिसतात - त्यांचे रक्तकलेले हातपाय त्यांचे सुकलेले चेहरे, झुकलेली पाठ दिसतात. तरीही एक आश्चर्य दिसत. त्यांचे जड बिल्ले अजूनही अंगा - खांद्यावर तसेच असतात. स्वरांचा सापळा पण असतो. ज्या प्रवाशांनी जास्तीत जास्त बिल्ले गोळा केले असतात त्यांना जांस्त त्रास होत असतो. त्यांना एकेक पाऊल टाकण जड जात असत. ते इतर प्रवाशांना मदतीची विनंती करतात. इतर प्रवासी त्यांना खांद्यावर वाहून नेतांना दिसतात. पण अशा स्थितीतही त्यांनी त्यांचे अवजड, बोजड बिल्ले काढून फेकलेले नसतात!
    मी पण एकदा या दरीत शिरलो होतो म्हणून मी हे सगळ पाहिल सुदैवाने मी लौकरच शींतीच्या दरीत शिरलो.
    आज त्याने माझ्या कडून नाण मागितल नव्हत. माझ्या भुठीत ते घटट धरुन मी इतका वेळ गोष्ट ऐकत होत. माझ्या तळव्याच्या धामाने ते ओल झाल होत. आमच ठरलेल होत की त्याची गोष्ट ऐकण्यासाठी मी आधी त्याला नाण घायच मी हात पुढे करुन नांण त्याच्या समोर धरल त्याने नाण घेतल. त्याच्या डोळयांत एक खोडकर हसूं होत तो एखाद्या खटटाळ मुलासारखा दिसत होता - माझ्याहूनही लहान वाटत होता. मला अचानक जाणवल की ब-याच दिवसांनंतर मी असा निरागस चेहरा बघत होतो. माझ्या वयाची मुल कशी हुषार, चलाख आणि सतर्क दिसायची. अगदी लहान बाळ त्यांच्या विचारांच्या वेगळया जगात वावरायचीम्हातारा बाबा अजून हसतच होता. हसतच म्हणाला - मी नाणं घेतल नाही तर मी पकडलो जाईन.बराय्‌ तर मग. बरीचशी गोष्ट संपलेली आहे - ढगांच्या दरीत सुरुवात करुन शांतीच्या किंवा काटयांच्या दरीत आलेल्या सगळया प्रवाशांना फक्त शेवटच्या खिंडीकडेच जायच असतं. अस म्हणत म्हातारा बाबा उठला.
    मी एकदम सावध झालो. तो पुनःकधीच येणार नाहीस दिसत होत. आमच ठरल होत की तो उठून उभा राहिलयावर त्याला प्रश्न विचारायचे नाहीत. पण तो करार मी मोडला. कुठल्याही करारापेक्षा हे जास्त महत्वाच होत. तो मला गोष्टीतला सगळयांत महत्वाचा भाग सांगितल्या - शिवाय निघून चालला होता. मी त्याची घोंगडी घट्ट पकडली.आणि खिंडीच्या पलीकडे काय आहे ? तू तिला शेवटची खिंउ म्हणतोस पण ती खरीखरी शेवटची असू शकत नाही कारण तूच म्हणालास की प्रवास तिथे संपत नाही तू मला इतर खूप गोष्टी सांगायच कडून केल आहेस . माझ्या स्वरातली निराशा मला लपवता येत नव्हती.
    खर आहे प्रवास संपत नाही. पण तुझ्या इतर प्रश्नांचा उत्तर देण्यासाठी मला अजून एक नाण लागेल. म्हातारा बाबा त्याची उरलेली गोष्ट घेऊन निघून गेला. माझ्या आईने त्या दिवसासाठी - मला एकच नाणं दिल होत.

----------------------------------------------------

No comments:

Post a Comment