Wednesday, June 5, 2013

खिंडीच्या पलीकडे सुगंधाची दरी

त्याला भेटून आता जवळ जवळ वर्ष होत आल होत. कधी कधी मी माझी वही उघडून त्याची गोष्ट वाचत बसे . तो वहीच्या पानांतून सताना दिसायचा वाटायच, तो विचारतोय्‌ - बघ तू अजूनही गोष्ट तपासून बघतोयस, समजायचा प्रयत्न करतोयस मग मी पटकन डोळे मिटून घेई - मग आमच संभाषण जास्त चांगल होऊ शकत असे.
    आता तुला माहीत आहे की हे खर आहे. तू डोळे मिटलेस की मी तुझ्याशी जास्त चांगल्या त-हेने बोलू शकतो. डोळे उघडले बाहेरचा उजेड आपल्या डोक्यात शिरतो आणि विचारांना अडवतो. मग ते माझ्यापर्यंत नीट पोचत नाहीत. मला त्याचे शब्द स्पष्ट ऐकू येत होते, पण ते जवळून येत नव्हते.
    ' तुला आठवतय का की लहानपणी घाबरल्यावर तू डोळे मिटून घ्यायचास. लोक म्हणतात - लहान मुलांना अंधाराची भिती वाटते पण ते चूक आहे. अंधाराची भिती वाटते ते मूल डोळे मिटून घेऊन अंधाराला आमंत्रण देईल कां? लहान मुलांना अंधाराची भिती नाही वाटत. हां, मोठया माणसांना वाटते.'
    हे मला नविनच होत. 'मोठया माणसांना अंधाराची भिती का वाटावी?'
    मोठी माणसं श्रध्देवर जगतात त्यांनी उजेडांत जे कांही पाहिलेल असत त्यातून त्यांच्या श्रध्दा निर्माण झालेल्या असतात. खर तर या सर्व अनाच्या खोटया समजुती असतात. कधी कधी त्यांनाही हे कळत असत की या फक्त मनाच्या खोटया समजुतीच आहेत. पण त्यांची इतकी सवय झाली असते की त्याच व-या वाटतात ते मोठे होतात तो पर्यंत इतकी सवय होते की या खोटया समुजी असतात. कधीकधी त्यांनाही हे कळत असत की या फक्त
मनाच्या खोटया समजुतीच आहेत. पण त्यांची इतकी सवय झाली असते की त्याच व-या वाटतात मोठे होतात तो पर्यंत इतकी सवय होते की या खोटया समुजती नसण हे त्यांन भितीदायक वाटत. अंधारात खोटया समजुती म्हणून त्यांना अंधार नको वाटतो. त्यांना स्वनांत जरी अंधार दिसला तरी ते लगेच जागे होतात.
    त्याच सांगण मला कळत होत. मला नेहमीच कुतुहल वाटायच की मोठया माणसांना जागेपणी नेहमी उजेडच कां लागतो ! जर तुम्ही जागे असाल आणि अंधारात बसलात तर त्यांना तुमची काळजी वाटू लागते. आत्ता कुठे मला लक्षात आल की मोठी माणूस वाईट गोष्टींच वर्णन काळाकुट्ट, अंधारलेला, अस कां करतात! जर कोणी वाईट काम केल तर ते म्हणणार काळ काम केल जर कोणी हुषार नसल तर ते म्हणणार याच्या डोक्यांत अंधार दाटलाय कोणाचे वाईट दिवस चालू असतील तर हे म्हणणार त्याचे काळेकुटट दिवस आलेत. नेहमीच ते अंधाराला वाईटाच, दुःखाच आणि पराजयाचा प्रतीक मानणार !
    मग अंधाराशी निगडित होणारी प्रत्येक गोष्ट वाईट ठरते रात्रीचच बघा ना - खर तर रात्र ही किती मुलायम असते, किती तणाव संपवते, कशी शांतता देते, पण तिला वाईटाची सखी, मानतात रात्रीच्या वेगळया यांची सगळी काल्पनिक, भितीदायक भुत - पिशाच्च बाहेर येतात - आणि म्हणे सगळयांना त्रास देतात चांगले आत्मे त्यांच्या घराच्या उजेडया सुरक्षित वातावणांतच म्हणे रहातात अगदी ढगांचच पहा ना ! लहान मुलांना
ढग किती आवडतात - त्यांचे ते बदलणारे आकार, त्यांच ते विनासायास इकडून तिकडे भरकण ! पण नाही. ते सूर्याच्या उजेडाला झाकतात ना ! म्हणून कोणावर संकट आल की मोठी माणस म्हणणार त्याच्यावर संकटाचे ढग आले कोणावर संशाय असला की म्हणणार संशयाचे ढग आले.  मोठी माणसं त्यांना समजूनच घेत नाहीत.
    मला अचानक प्रश्न पडला मी स्वतःशीच बोलतोय की म्हाताच्या बाबशी ? दोन्हीं गोष्टी एकच वाटतात
डोळयांसमोर एक विस्तीर्ण अंधारी जागा आहे आणि त्यांत विचार असे विहरताहेत जसे कांही आनंदी ढगच. त्यांनी कुठे जायच ते त्यांना कुणी सांगू शकत नाही. ते मुक्त आहेत. त्यांना कर्मबंधन नाही. या जागेत विचारशून्य कामांना मज्जाव आहे. तसल्या कामांसाठी तुम्ही पुनः डोळे उघडून प्रखर उजेडाच्या जगांत गेल पाहिजे.
--------------------ज््र--------------------

    तो परत आला तेंव्हा खूप रंगलेला होता तो नक्की खूप आजारी असावा पण त्याबददल तो मला बोलू देत नसे. मला हाताने अडवून म्हणायचा ते महत्वाचा नाही !
    माझ्या मनात वर्षभर पंचांच्या बेईमानीबद्दलचे विचार घोळत होते, तेच मी विचारल. 'मी इतर प्रवाशांना त्यांची चलाखी सांगायचा प्रयत्न केला होता. पण ते खूप उशीरा ही विल्लयांची दरी इतकी मोठी आहे की प्रवासातला बहुतेक वेळ इथेच जातो. या दरीत कांही छोटया छोटया खिंडी आहेत, पण तिथून बाहेर आल तरी आपण ही दरी ओलांडलेली नसते, त्या छोटया द-या आणि खिंडींबद्दल तुला नंतर सांगेन.
    इथे अजून एका प्रकारचे बिल्ले आहेत त्यांना टप्प्यांचे बिल्ले म्हणतात. पंच सांगतात की या प्रवासाची एक सरासरीची लांबी आहे. मला हा पण पोरकटपणाच वाटतो. सरासराची लांबी म्हणजे काय अािण ती कशी काढतात तेच कोणाला समजलेल नाही. शिवाय ही लांबी ते लांबीच्या मापाने नाही मोजत - काळाच्या हिशोबाने मोजतात कारण त्यांना काळाचा खूप दारा आणि आदर असतो काळ हा सगळयांना बदलून टाकू शकतो. अगदी स्थळांच्या परिमाणाला सुध्दा - फक्त विचारांना नाही घडबू किंवा बदलू शकत. पंचांना विचार करायचा नसतो. म्हणून त्यांना काळ हा सर्वश्रेष्ठ वाटतो.
    प्रवासाचा हा सरासर लांबीचा काळ खूप मोठा असतो. कुण्याही शहाण्या माणसाला इतका वेळ प्रवासात घालवण पटणार नाही. पण प्रवाशांना प्रत्येक योजना पटवून द्यायची चलाखी पंचांकडे आहे. त्यांनी असा समज पसरवला आहे की जास्त काळ प्रवास करण हा एक मोठाच पराक्रम आहे जर तुम्ही सरासरी वेळेआधीच शेवटची
खिंड ओलांडलीत तर तुम्ही उपयशी, शिवाय त्यांनी असाही समज पसरवला असतो की शेवटची खिंड कधी ओलांडायची ते जस काही प्रवाशांच्या हातातच आहे. जर तुम्ही सरासरी वेळानंतर खिंड आलांडली तरच तुम्ही यशस्वी पंच अस पण भासवतात की कर्मकांडांचा खेळ जो नियमाने आणि श्रध्देने खेळेल त्याला प्रवासात जास्त काळ रहायला मिळेल.
    प्रवाशांना या सगहया पेारकट कल्पना पटवण्यासाठी त्यांनी टप्प्यांचे बिल्ले बनवले आहेत एखाद्या प्रवाशाने सरासरीच्या निम्मा काळ संपवला की तो ओरडतो मी टिकलो, मी टिकलो त्याच्याजवळचा प्रवासी त्याला एक लांब फीत चिकटवतो. प्रवाशांना या फितीची इतकी ओढ असते की ते सारखं आपली घडयाळ आणि कॅलेंडर बघत असतात सरासरीच्या निम्म्या प्रवासाचा क्षण त्यांना चुकवायचा नसतो. तयांना ती फीत मिळवण्यात क्षणाचाही उशीर असहय वाटतो. निम्म्या टप्प्याची फीत फार महत्वाची आहे याशिवाय इतरही टप्प्यांसाठी वेगवेगळया फिती आहेत उदाहरणार्थ एक दशांश, दो सातमांश, तीन आष्टमांश, चार पंचमांश इत्यादि हे टप्पे पंचांनी कसे ठरवले ते मला माहीत नाहीऋ माझ्या मते त्या फिती निरर्थक आहेत. पण प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला फीत मिळते हे मात्र नक्की.
    जेंव्हा खूपशा फिती मिळवलेला एखादा प्रवासी दिसतो तेंव्हा पंच लगेच त्याचं जाहिर कौतुक करतात इतर प्रवासी त्याच्याकडे पाहून टाळया वाजतात पण त्यांच्या नजरेत असूया असते. खूप काळ पर्यंत प्रवासी या विजयी बीराचे गोडवे गातात. आपणही कर्मकांडाचा खेळ अत्यंत नियमपूर्वक आणि ईमाने - इतबारे खळायचा अस ते ठरवतात मग पंच येऊन आपल जाहीर कौतुक करतील. त्याही पेक्षा महत्वाच म्हणजे इतर प्रवासी असूया भरल्या नजरेने आपल्याकडे पहातील. ती नजर मिळण सगळयांत महत्वाच.
    अचानक म्हातारा बाब उठला आज माझ्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या आंत त्याची वेळ संपून गेली होती. त्यांने पंचांची चालाखी उघडकीला आणायचा प्रयत्न केला होता कां? त्याला इतक ज्ञान होत. काळ वेळ म्हणजे कांय ते समजून घेण्याची त्याला गरज उनली नव्हती समजून घेता सुध्दा निघायची वेळ कधी झाली ते त्याला बरोबर माहित असासच. पक्ष्यांसारखच त्यांच्याकडे कुठे असतात घडयाळ किंवा कॅलेंडर्स पण कधी निघायच ते त्यांना बरोबर माहीत असत.
    पुढल्या वेळी म्हातारा बाबा आला तेंव्हा त्याला माझा प्रश्न आठवत होता. 'मी पंचांची चलाखी उघडकीला आणायचा प्रयत्न केला होता. प्रवासाच्या अगदी सुरवातीलाच. पण इतर प्रवाशांनी ते हसण्यावारी नेल आधी कांही टप्प्यांच्या किती मिळवून दाखव, तोपर्यंत अस कुणाही विषयी कांहीतरी बोलू नकोस. सध्या तरी तुझ्या प्रवास चालू  ठेव आणि पंच आणि इतर जिकलेले प्रवासी कांय सांगतात ते नीट लक्ष देऊन ऐक आधी नीट शिकून आणि समजून घे तुला जर समजतच नाही तर इतर प्रवाशांनी तुढ कां ऐकांव? तू म्हणतोस की तुला सगळ माहीत आहे, हे माहीत असण म्हणजे कांय ते आम्हाला समजत नाही. पंचही कधी माहीत असण्या बद्दल बोललेले नाहीत. ते महत्वाच असतं तर पंच त्याबद्दल बोलले असते ते कितीतरी हुषार आहेत. तयांना सगळ समजत.
    त्यांनतर मी प्रवाशांना कधीही काही सांगयचा प्रयत्न केला नाही. ते पंचांनी त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या दुनियेत वावरत होते तर मी माझ्या जगात त्यांची दुनिया मला समजत नव्हती. माझ जग त्यांना माहित नव्हत.
    बिल्लयांच्या दरीबद्दल मी तुला खूप सांगितल. पण या दरीत कांही छोटया छोटया खिंडी आहेत आणि त्यांच्या पलीकडे छोटया छोटया द-या आहेत ज्या बिल्लयांच्या दरीचाच भाग आहेत पण तरीही या द-या एवढया वेगळया आहेत की त्यांना वेगळी नावं पण आहेत. त्यांत एक सुगंधाची दरी पण आहे. मी तर हिला दिवास्वन्नांची दरीच म्हणतो.
    या दरीत शिरल्याबरोबर इथली हवा वेगळीच आहे हे जाणवत सगळीकडे मंद सुगंध भरलेला असतो, जणू कांही जवळपास खूप फुल असावीत तुम्हाला हक्क हलक वाटू लागत - हवेत तरंगत असल्यासारख इतर कशाचच
महत्व किंवा काळजी वाटत नाही तुम्ही बंदिस्त स्वर, बिल्ले, पंच, सगळ कांही विसरत एखादा पक्षी जवळपास गात असला तर तुम्हीं पण त्याच्या बरोबर गाऊ लागता. तुम्हाला वाटत पक्षी तुमचच गाण गातोय्‌. इथपर्यंतचा प्रवास जणू याच दरीसाठी होता तुम्हाला विश्र्वास वाटू लागतो की इथून पुढे प्रवासाची गरज नाही, हाच शेवटचा टप्पा आहे, याचसाठी इथवरचा प्रवास केला होता. कुठली कर्मकांड नसतात डोक्यांत वेगवेग विचार भन्नाट चालू असतात आणि शरीराच्या रोमारोपासून चैतन्य फुळून  आलेल असत. तुम्ही गर्जता, मी आहे, मी आहे आणि कुठल्या तरी अदृश्य भिंतीवर आढळून त्या आवाजांचे प्रतिध्वनि परत येऊन सांगतात, मी आहे, मी आहे तुमचाच आवाज ऐकायला किती गोड वाटतो जया अहश्य भिंतीतून प्रतिध्वनी गर्जत परतला त्या दिसत नाहीत.
    पण मी त्या प्रतिध्वनीने वेचैन झालो मला जाणवल की जवळपास कुठेतरी भिंती आहेत या दरीतला मुक्तपणा पण भासच आहे, सापळा आहे भिंतींचा अर्थ एकच - एखाद्या अगम्य रितीने तुमच स्वातंत्र्य हरवणार पण मी ठरवल की आपले विचार कुणाला सांगायचे नाहीत. पंचांबद्दल मला जाणवलेल जर त्यांना जाणवल आणि पटल नव्हत, तर या अद्दश्य भिंतीबद्दल त्यांना काही जाणवण शक्यच नव्हत.
    या दरीत प्रवासी आनंदात होते ते गुबगुबीत आणि ताजेतवाने दिसत होते - नुकताच प्रवास सुरु केल्या सारखे - आकाशांत विहरत असल्यासारखा डौल त्यांच्या चालीत होता. मला जाणवल की कांही तरी माझ्या नजरेतून सुटल होतं. मी डोळे मिटले, तो कांय? प्रवाशांना छोटे छोटे पंख फुटलेले दिसत होते - पातळ, पारदर्शी पंख थोडेसे धूसर आणि अस्पष्ट दिसत होते पण ! त्यांच्यावर हिरे - माणक चमचमत होती छेः मी त्या हश्याच वर्णन तुला नाही सांगू शकणार.
    'पण मला कळलय्‌ कोळयाच्या जाळयावर सकाळचे दवबिंदु कसे चमचमतात, तसेच हे तुझ्या प्रवाशांचे पंख चमचमत असणार !' मी म्हणालो.
    खरच, तुला छान छान उदाहरण  खूप चटकन सुचतात. म्हातारा बाबा म्हणाला तसेच चमचमत होते त्यांचे पंख. प्रवासी मंदगतिने उडत होते, गुणगुणत होते. मला पण वाढू लागलं की यांना सतत असच मुक्तपणे अडता यावा. त्यांना अडवायला कोणत्याही अदृश्य भिंती नसाव्या. पण मला जाणवत होत की हे पंखधारी प्रवासी भिंतीला अडतील आणि क्षणांत त्यांचे पंख फाटून जातील. आयुष्यांत पहिल्यांदाच मला तीब्रतेने वाटल की आपल्याला जे जाणवताय ते खोट ठराव.
    मी जे जाणत होतो त्याबद्दल मला शंका वाटू लागली. या क्षणी तरी ते डॉलाने उडणारे प्रवासी हेच सत्य होत. नाही तर माझ्या मिटव्या डोळयांनी मला ते कस पहाता आल असत? हे सत्य नाकारुन मी अद्दयश् भिंतीबाबतच्या माझ्या जाणीवेला स्वीकाराव कांय? असू देत भिंती असल्या तर! कदाचित त्यांना खिडक्या असतील तुम्हाला मर्जीप्रमाणे त्यांतुन आत बाहेर जाता येन असेल तर भिंतींची काय तमा? असेना का प्रतिध्वनी. मी माझे डोळे पुनः मिटून मला सुध्दा पंख फुटलेत का ते पहायचा प्रयत्न करु लागलो.
    त्याच वेळी मला ज्ञानी माणूस दिसला. मी त्याला म्हटलं - कृपा करुन् तू डोळे मीट आणि माझ्या खांद्यावर पंख आहेत की नाही ते पाहून मला सांग! पण तो म्हणाला - तुला पंख नाहीत, आणि इतर प्रवाशांना पण नाहीत. मला ते पटेना - 'मी स्वतः माझ्या मिटल्या डोळयांनी पंख बधितले आहेत !' त्यावर तो म्हणाला - तर मग तू फसवत असशील, आणि पाऊलवाटेच्या एका फाटयावरुन तो पुढे निघून गेला. 'मी फसवल? मी कसा फसवेन?' म्हातारा बाबा व्याकुल होऊन स्वतःशीच बोलत होता.
    'मी सांगतो, तू तुझे डोळे गच्च मिटले नसशील.' मी त्याचा ढगांच्या दरीतला सवंगडी ढगांबरोबरचा खेळ आठवून त्याला सुचवल.
    तू म्हणतोस तसच असेल. त्यांना पंखप असावेत अशी सुप्त इच्छा माझ्या मनांत असेल आणि मी डोळे किलकिले करुन बारीक फट ठेवली असेल त्यातून थोडासा उजेड आत आला असेल आणि दृष्टिभ्रम निर्माण केला
असेल. म्हणूनच ते पंख धुसर असल्यासारखे दिसले मी डोळे गच्च मिटले असते तर ते मला स्पष्ट दिसले असते.
    असो पण त्यावेळी मात्र ज्ञानी माणूस जे म्हणाला ते मला पटल नाही. मला पंख नाहीत हे त्याच सांगण बरोबर असेल कदाचित पण प्रवाशांना पंख आहेत हे मी स्वतः पाहिल आहे. याबाबतीत ज्ञानी माणसाच ऐकण्याची गरज नाही, अस मी स्वतःला समजावळ.
    त्यांच्या उडाणांत प्रवासी एकमेकांजवळून जातांना हमत होते आणि हात हलवून निरोप देत होते. आता त्यांना पण असंख्य फाटे असलेल्या पाऊलवारांचा, विजयी झेंडयांचा आणि बिल्लयांचा विसर पडलेला दिसत होता आता त्यांना कळत होत फक्त अनंत, काळातील उडडाण - विनासायास, डौलदार आणि सहजगत्या होणांर उडडाण त्यांना कळत होता सुगंध आणि जीवनावर अलोट प्रम ! कधीकधी दोन प्रवासी हवेवर तरंगत यांयचे आणि वाटायच आता यांची डोकी एकमेकांवर आपटणार. पण तोच दोघांचे हात पुढे यायचे, एकमेकांत गुंफले जायचे, एक जण हळूच म्हणायचा - हा सुगंध किती छान आहे. इतका हज्ञळू की जणू मोठया आवाजाने पंख फाटायची भिती वाटत असावी. दुसरा म्हणायच - खरच हा इतका मधुर आहे - आपल्या हातात हात गुंफण्यासारखाच. मग ते तरंगत आपापलया दिशेने निघून जायचे पण त्यांच्या मनांत सुगंधाची आणि स्वर्शाची जाणीव भरलेली असायची या प्रवासात त्यांना जाणीव हवी होती - समजून घेण्याबद्दल आग्रह नव्हता.
    पण प्रवाशांची ही आनंदी आवस्था थोडा काळ टिकायची, मग ते मूळपदावर यायचे. कोणीतरी म्हणायचा - आपण असे निरुद्देश्य किती काळ भटकत रहाणार ? हा सुगंध किती छान आहे. याच्याशिवाय प्रवास करण्याची मी कल्पनाही करुन शकत नाही. पण तरंगत - तरंगत मी कुठेतरी भरकटलो तर? तिथे हा सुगंध नसेल कदाचित माझ तरंगणं पण थांबले कारण मा सुगंधी दरीत येण्याआधी कुठे ती तरंगत होतो? इथून भरकटून कुठेतरी गेलो की मला पुनःत्याच पाऊलवाटांवरुन चालत जाव लागेल. पण जर का कांहीही करुन मला या सुगंधाचा उगम शोधून स्वतःबरोबर नेता आला तर मला सर्व प्रवास तरंगून जाता येईल - चालाव लागणार नाही.
    यावेळ पर्यंत सगळे पंच अगदी गप्प बसून आपलया संधीची वाट पहात होते कधीकाळी त्यांचे अंकित झालेले प्रवासी या सुगंधामुळे त्यांना ऐकणाच्या मनास्थितीत नव्हते. पण प्रवाशाच्या मनात सुगंधाचा स्त्रोत शोधून ताब्यात घेण्याचा विचार आल्याबरोबर पंच ओरडले - 'वीर प्रवाशांनो ऐका हा नवा खेळ. याचा बक्षीस आयुष्यभर पुरेल. जा आणि सुगंधाचा हा स्त्रोत शोधा आणि ताब्यांत घ्या.'
    आणि शोध सुरु होतो. प्रत्येकाला इतरांच्या आधी तो सुगंधाचा ठेवा शोधून स्वतःसाठी काबीज करायचा असतो तू म्हणशील प्रवासी तो ठेवा आहे तसाच का राहू देत नाहीत? म्हणजे त्यांना मिळाला तस आनंद सगळयांना मिळू शकेल ! त्या दरीत वर्षानुवर्ष येत रहाणा-या सर्व प्रवाशांना अखंडितपणे मिळत राहील ! असा तो सुगंधाचा ठेवा काबीज का करायचा अस प्रवाशांना कां नाही वाटत ? पण तुझ्या प्रश्नाला उत्तर नाही. प्रवासी तसा विचार करत नाहीत. त्यांना तो सुगंधाचा स्त्रोत हवा असतो, काबीज करायचा असतो. तो शोधल्यावर पुनःमी जिंकलो अस गर्जायच असत आणि इतर प्रवासांच्या नजरेतली असूया पुनः पुनः उपभोगायची असते.
    'हे वाच' अस म्हणत त्याने कांही चुरगकलेले कागद काढून माझ्या पुढे धरले आणि तो जाण्यासाठी उठला. 'मी सुगंधाच्या दरीतल्या प्रवासात हे लिहिले आहे.

--------------------ज््र-------------------

No comments:

Post a Comment