' एकदा मी इतर प्रवाशांना पंचांच्या खरं स्वरुप कांयते सांगायचा प्रयला केला होता. पण पुढे मला वेगळी जाणीव झाली. मला वाटायच माझ बरोबर आहे. पंचांना वाटे त्यांच बरोबर आहे. मला वाटायच की कोण बरोबर आहे ते ठरवायचा हक्क माझा आहे. त्यांना वाटे त्यांचा आहे. या सगळयांतून आपण कुठे पोचतो ते तुला कळल कां? मी पण पंचांसारखाच वागत होतो. हे लक्षांत आल तेंव्हा मला स्वत-च वागण आवडल नाही तेंव्हापासून मी त्यांच्या बद्दल विचार करण सोडून दिल तू पंचांना नियम घालण्याचा, त्यांना अडवण्याचा विचार करतोयस्. म्हणजे तू पण पंच होऊ पहातोयस. तुला आवडे का ते? त्याने या पध्दतीने मांडलयावर मला कळत की ते मला आवडल नव्हत, आणि हे मी प्रांजळपणे कबूल केल. 'पण मग प्रवाशांना मदत करायची कशी ?'
'या प्रवासात आपण स्वतःलाच फारशी मदत करु शकत नाही हां, जेंव्हा तुम्ही बंदिस्त स्वरांच्या दरीत असता पण तुम्हाला स्वरांना कैद करायच नसतं तेंव्हा तुम्ही तुमच्यासारख्याच दुस-या प्रवाशाचा शोध घेऊ शकता. पण इथेही थोडा सावधपणा हवाच. कारण इथे कांही फसवे प्रवासी पण असतात. त्यांना जर कळल की तुम्हाला स्वरांना बंदी बनवायच नाहीये, तर ते स्वत-कडला सापळा लपवून ठेवतात. तुम्ही फसता अशा एखाद्या प्रवाशा - बरोबर प्रवास करु लागता प्रत्येक फाटयावर तो ही स्वतंत्रपणे त्याची पाऊलवाट निवडतो, पण ती नेमकी तुमचीच पाऊलवाट असते तुम्हाला वाटत आपली मनं जुळली आहेत. तुम्हाला कांहीतरी दिव्य वाटू लागत.
पण सुगंधाच्या दरीत आल की ही फसवणूक उघड होते. इथे तुमचा जोडीदार हिरीरीने सुगंधाचा गडा शोधून सापळयात अडकवायची मोहिम हाती घेतो आणि अनिच्छेने का होईना, तुम्ही त्याची साथ देता, त्याच्याप्रमाणेच निवड करता. मग तुम्ही प्रवासभर त्या ओझ्यात आणि त्या निरर्थक सहवासात सापडता कारण तुम्हाला इतक्या वर्षाची सवय मोडता येत नाही.
तस होउ द्यायच नसेल तर बंदिस्त स्वरांच्या दरीतच काळजी घ्यायाची एखाद्या प्रवाशाजवळ सापळा दिसत नाही म्हणून भागत नाही. तो पारधी नाही याची खरी खूण म्हणजे त्याच्याजवळपास खूपसे मुक्त स्वर वावरतांना दिसतील. म्हणूनच जोडीदार प्रवाशाचा निर्णय घ्यायची घाई करायची नाही. मात्र सुगंधाच्या दरीत येण्याआधीच निर्णय करायचा नाहीतर सुगंधी दरीत तुम्हाला त्याच्या मनाप्रमाणे निर्णय घ्यावा लागतो.
बिल्लयांच्या दरीत अजून दरीत अजून एक दरी आहे - गोल गोल रस्त्यांची दरी सुगंधी दरीतले बहुतेक प्रवासी इथे येतात. जे सुगंधी दरीत जात नाहीत ते शक्यतो इथे येत नाहीत. ते सरळ शांतीच्या दरीत जातात. त्याबद्दल तुला नंतर सांगेन.
गोल रस्त्यांच्या दरीत आपल्याला खूप चालाव लागत पण आपण प्रवास पुढे सरकत नाही, कारण बहुतेक वेळी आपली पाऊल वाट गोल गोल फिरुन परत त्याच ठिकाणी परत येते. इतरत्र जाण्या-या पाऊलवाटा गवत किंवा वळू खाली दडल्या असतात आणि पटकन सापडत नाहीत. तुम्हाला वाटप या दरीत निवडीचा पर्याय पण तुमच्या हातात नाही. तसा तो असतो, पण तुम्हाला ओळखता येत नाही.
मग प्रवासी म्हणू लागतात की ही गोल रस्त्यांची दरी म्हणजेचे सापळाच आहे. ते एकमेकांना सांगतात - 'मी जेंवहा त्या गोल रस्त्यांच्या सापळयांत अडकलो ना, तेंव्हा मी आशाच सोडून दिली होती. किंवा जे त्या रस्त्यांवर असतात ते पंचांना विनंती करतात - अहो, आम्हाला या सापळयातून सोडवा. मी किती मन लावून तुमचे सगळे खेळ खेळलो आहे, पुढे पण खेळणार आहे. पंच फक्त स्मित करुन निधून जातात. प्रवाशांना वाटंत ते आपल्यावर झाले आहेत. पुढे जेव्हा त्याला गोल रत्स्त्यांच्या बाहेर जाणारी पाऊलवाट सापडते तेंवहा तो त्या पंचाची आठवण ठेऊन कृतज्ञता व्यक्त करतो. मात्र कधी कधी अशी पाऊलवाट त्याला दुस-या गोलाकार - रस्त्यावर नेऊन सोडते. मग तो पुनः पंच दिसले की त्यांची विनवणी करु लागतो.
मी विचारल - पण पंचांच कांय ? ते पण या रस्त्यांवर अडकलेलेच नसतात कां? हो ना! अडकलेलेच असतात. पण त्यांच्या हुषारीची दाद द्यावी लागेल. इथेही ते आपली अवस्था इतरांना जाणवू नये म्हणून काळजी घेतात् ते स्वतःला समजावतात की ते आपणहून या रस्त्यांवर आले आहेत, कारण हा पण कर्मकांडाचाच एक भाग आहे. इथला खेळ म्हणजे त्याच रस्त्यावर परत परत फिरण्याचा इथे सुध्दा ते बिल्ले वाटतात. शंभर वेळा फिरणा-याला तो बिल्ला. कांही पंच तर हे बिल्ले मिळवण्यासाठी एवढे आयुसलेले असतात की ते इतर फाटे शोधायचा जराही प्रयत्न करत नाहीत. त्याऐवजी ते म्हणतात, अजून बारा चकरा पूर्ण केल्या की एक बिल्ला मिळेल. तो घेऊन मगच दुसरे फाटे शोधायचे.
ज्या प्रवाशांनी बंदिस्त स्तरांच्या दरीत स्वर कैद केलेले नसतात, त्यांना एकमेकांच्या साथीने प्रवास
करायला आवडतो. किंवा कांही प्रवासी सुगंधी सापळा कैद केल्यानंतर शहाणे होऊन सापळा टाकून एकमेकांचे सोबती झालेले असतात. त्यांना सापळयाशिवाय होणा-या प्रवासाचा आनंद कळलेला असतो. तुम्ही कन्मुक्त पक्षासारख आनंदी राहू शकता आणि शिवाय तुमचा कोणी सोबती असतो. सापळयाच ओझ वहाणा-या प्रवाशांना निवडीचा पर्याय उरत नाही म्हणून त्यांची आपल्या सोबत्या बद्दल तक्रार असते.
पण सापळा टाकून एकत्र चालणा-या प्रवाशांचा निवडीचा पर्याय संपत नाही ते तो वेगळया त-हेने वापरातात. त्यांना एकमेकांची सोबत हवी असते पण सोतत्याच्या इच्छेप्रमाणे मला पर्याय निवडावा लागला असा किंतु मनांत सहायला नको असतो. म्हणून ते एक गंमत करतात. फाटा जवळ आला की ते एकमेकांचा हात हातात घेतात, डोळे मिटतात आणि एकत्र चालत जातात. नविन पाऊलवाटेवर पोचले की मगच डोळे उघडतात, आणि आपण एकत्र राहू शकलो म्हणून जीवनाबद्दल कृनज्ञता बाळगतात. खरच, तुम्ही ही पाऊवाट विनडली किंवा ती निवडली म्हणून कांय बिघडणार असत ? म्हणून मिटल्या डोळंयाची निवड कदाचित जास्तंच चांगली असेल. नाही तरी मिटल्या डोळयांनाच गोष्टी जास्त स्पष्ट दिसतात.
या मुक्त प्रवाशांमुळे सवंध प्रवासाचा आणि दरीचा नूरच पालटून जातो. ते पंचांकडे विशेष लक्ष देत नाहीत. त्यांची गोल रस्त्यांवर चालयला हरकत नसते किंवा तिथून बाहेर पडायलाही नसते. आता मुख्य असते ती आपल्या भिडूची सोबत.
इतर प्रवासी त्यांचेकडे असूयेने पहातात. पण ते अजूनही पंचांना घाबरतच असतात. तरी त्यातले कांही पंचांबद्दल आक्षेप घेऊ लागतात - हे पंच फक्त स्वतःपुरते बिल्ले जमवायच्या मागे आहेत, यांना प्रवाशांची काळजी नाही, मी त्यांना मला गोल रस्त्यातून बाहेर काढायची विंनती केली होती, पण ते फक्त स्मित करुन निधून गेले वगैरे मग इतर म्हणतात - अरे, अस म्हणू नका हे पंच आपल्यापेक्षा किती तरी हुषार आहेत. ते जे कांय करतात ते आपल्या भल्यासाठीच असेल. त्याच्यावर विश्र्वास ठेऊ या इतके दिवस आपण त्यांनी शिकवलेले खेळ आनंदाने खेळलोच की नाही ? त्यांनी आपल्याला सागंगून ठेवालेल आहे ना की खूप प्रवासी आधीच या रस्त्यांवरुन गेलेले आहेत. हेच खेळ खेळले आहेत. हाच एकमेव मार्ग असणार !
तरी पण पंचांचा एकूण मान आणि आदर कमी झालेले असतात. आता जेंवहा एखाद्या पंचाला ठराविक वेळा गोल रस्त्याची चक्कर मारल्याबद्दल बिल्ला मिळतो तेंव्हा फारसे प्रवासी त्यांच कौतुक करीत नाहीत. फक्त ज्यांना अजूनही पंच व्हायची इच्छा असते ते आणि इतर पंच टाळया वाजवतात.
पण पंच सुध्दा या रस्त्यांवर अनंत काळ राहू शकत नाहीत. कधीतरी चुकून ते दुस-या पाऊलवाटेर पोचतात. आपला जुना गोलाकार रस्ता मागे राहिला हे लक्षांत येईपर्यंत कितीतरी पाऊलवाटा पुढ गेलेले असतात. मागे परत येण शक्य नसत.
पुढच्या पाऊलवाटेने हे पंच दुस-या गोल रस्त्यावर पोचले तर पुनःखूप हातोत, आणि पुनःबिल्ले मिळवायच्या मागे लागतात. त्यांना वाटत, संबंध प्रवास असा गोल रस्त्यांचाच असता तर किती मजा आली असती. सगळा प्रवासच एक कर्मकांडच बनून गेला असता. कर्मकांडाच्या पंचांनी या परते दुसरे काय मागावे ?
आज खूप गप्पा केल्या. म्हातारा बाबा उठता - उठता म्हणाला आता एकदा तू मला एखदी गोष्ट ऐकव. मी ढगांची दरी ओलांडल्याला किती तरी वेळ झाला. पण मी डोळे मिटले की तू मला सवंगाडी ढगासारखाच दिसतोस.
----------------------------------- ---पुढील ब्लॉग पान पहा
No comments:
Post a Comment