Wednesday, June 5, 2013

खिंडीच्या पलीकडे बंदिस्त स्वरांची दरी

खिंडीच्या पलीकडे

ही होती बंदिस्त स्वरांची दरी ढगांच्या दरीतले स्वर तुझ्या त्या फांदीवरच्या पक्ष्याप्रमाणे होते - उन्युक्त, स्वच्छंदी कानावर पडल्या पडल्या तुम्हाला त्याच्या बद्दल सर्व कळायच - समजत नसल तरी. अगदी थेट पक्ष्याच्या गाण्यासारखच. ते गाण पण पक्ष्या - सारखच उन्मुक्त असत की नाही ! तसेच ढगांच्या दरीतले स्वर पण होते. मला वाटत की पक्षी पण ढगांच्या दरीतूनच येत असावेत.
    ढगांच्या दीतले उन्मुक्त स्वर तुम्हाला समजत नाहीत. त्यामुहे गैरसमजही होत नाहीत. तुम्हीही त्यांच्याशी कुठला भावबंद जुळवायचा प्रयत्न करीत नाही कारण तुम्हाला त्यांचं उन्मुक्त - असण माहीत असत. ते त्यांच्या लयीने जात असतात. वाटेत तुम्ही भेटलात तर हलकासा स्पर्श - करुन पुढे होतात. ते कानांत क्षण दोन क्षण मंजुळ विनादत रहातात तोपर्यंत दुसरे स्वर तुमच्यापर्यंत येऊन ठेपतात - मग तुम्ही त्यांची मजा करण्यांत गुंगून जाता.
    स्वच्छंदी स्वर कायम ढगांच्या दरीतच रहातात. निधल्या लहान माठया सर्व प्रवाशांच्या ओळखीचे होतात. पण त्यांना बंदिस्त स्वरांच्या दरीत यायला आवडत नाही. प्रवासी या दरीत येतात तेंव्हा त्यांना इथे एक विचित्र वस्तु दिसते खर तर प्रवाशांनी हिच्याकडे दुर्लक्ष केल असत आणि तसेच पुढे गेले असते तर भागच्या दरीसारखे इथेही स्वर उन्मुक्तच राहिले असते.
    पण तस होत नाही. गांत कांही लोकांना नुसत माहित असून पुरत नाही - त्यांना समजून घ्यायच असत नव्हे, ते त्यांना अत्यावश्यक वाटत मग असा एखादा माणूस येतो तो त्याच्या लांब नाकाने वास घेत घेत प्रत्येक वस्तु हुडकतो प्रवासात पुढे जाण्याऐवजी ही विचित्र वस्तु समजून घेण्यासाठी कितीही वेळ द्यायची त्याची तयारी असते. म्हणून तो थांबतो आणि या भ्रमविणा-या तस्तुकडे लक्ष देतो.
    आणि त्याला समजत की हा सापळा आहे - उन्मुक्त स्वरांना बंदी बनवण्याचा सापळा. यात अडकले की त्यांना पूर्वीसारख स्वच्छंदी वावरता येणार नसत. या लांबनाक्या प्रवाशाला सापळा भारी आवडतो. तो सापळा हातात घेऊन सापडतील त्या स्वरांना कैद करत सुटता. दरीतले जवळ जवळ सगळे स्वर तो अडकवतो. स्वर खूप दुःखी झालेले असतात. स्वच्छंदी वावरणं हेच त्यांच जीवन असतं सापळयांत अडकून ते निर्जीव, निक्षैतन्य होतात, जणू कांही निर्जीव सांगाडया सारखे. ते रापुडवाणे मलूल होऊन पिंज-यात पडून रहातात. मग हा लांबनाक्या प्रवासी त्यांना एकेक करुन ओवतो - भाळेत फुळं ओवावीत तशी असे ओवलेले स्वर डबांबंद करता येतात उलट - सुलट फिरवता येतात, नष्टही करता येतात. ते इतरांवर फेकून मारता येतात आणि त्यांना हमखास इजा करु शकतात. त्यांना एखाद्या छानशा वेष्टनात गुंडाळून अहेर म्हणूनही देता येते. लांबनाक्या प्रवाशाने विचार केला तसे त्याला सुचले की हजारो प्रकारांनी हे बदिस्त सूर वापरता येतील.
    मग त्याने पंचाचे कपडे चढवले आणि दरीच्या तोंडाशी जाऊन बसला. दरीत येणा-या प्रत्येक प्रवाशाला तो एकेक सापळा देऊन त्यांत स्वर कसे अडकवायचे ते सांगू लागला. तो म्हणाला हे ही एक कर्मकांड आहे आणि सगळयांनी ते प्रवासभर निभावलच पाहिजे. प्रवासभर त्यांनी 'पकडा आण ओना' हा खेळ खेळलाच पाहिजे. त्याने पंचाचे कपडे घातले हाते त्यामुळे इतर प्रवाशांना त्याची भिती वाटली. तो म्हणाला ते सर्वांनी कबूल केल. अशा त-हेने या दरीत आणि पुढचा प्रवासभर सगळे स्वर बंदिस्तच राहिले.
    हे सगळ मला त्या ज्ञानी माणसाने सांगितल. हे जस जस घडल तस्साच्या तस्स त्याला माहित होत. पण त्या लांबनाक्या प्रवाशाने असं कां केल हे मात्र त्याला समजल नाही. जर त्याने समजून घ्याव म्हटल असत तर त्याला नक्की समजल असत. पण बहुधा त्याला माहित असाव की हे जर त्याला समजल तर तो पण स्वरांचा शिकारी होईल. हे त्याला आवडल नसणार. म्हणून त्याने कधीच समजून घ्यायचा विचार मनांत येऊन दिला नाही. तुझ्या लक्षांत आल कां? या दरीत सुध्दा विचारांचा पर्याय त्याने स्वतःकडेच ठेवलाऋ आपल्याला पण ठेवता येतो.
    स्वर उन्‌ुक्त असतात तेंव्हा आपल्याला हलकेच स्पर्श करुन निघून जातात. दुस-या क्षणी तुम्हीं एखादा नवा स्वर ऐकत असता. पण एकदा का स्वराला बंदिस्त केल की संपूर्ण प्रवासात तो सतत तुमच्या कानात धुमत रहातो. अगदी शेवटची खिंड येईपर्यंत - किंवा कदाचित तिच्या पलकडेही.
    स्वर कानात घुमत राहिले की ते तुमच्या विचारांची जागा अडवतात.
    स्वर नसतील त्याच जागेच विचार जन्माला येऊ शकतो. ढगांच्या दरीत उन्मुक्त स्वर यायचे आणि क्षणभरांत विसरुन जायचे. त्यामुळे नवे विचार जन्माला येण्यासाठी खूप जागा असायची ते पंचांना नको असायच त्यांना हव असत की तुमचे विचार कर्मकांडात विरुन जावेत आणि तुमच्याकडे विचार करण्याचा पर्याय शिल्लक राहू नसे. मला तरी अस वाटत की ते स्वरांचे शिकारी असेच आले नाहीत - ते सुध्दा पंच मंडळींनी ठरवून आणले असावेत.
    बंदिस्त स्वर उडून जाऊ शकत नाहीत एकदा का ते विचारांच्या जागेत घुसले की तिथेच ठिच्या मांडून बसणार अशा त-हेने बंदिस्त स्वरांच्या दरीतून जातांना तुमच्या विचारांची जागा हळूहळू कमी होत जाते. मग अजिबात जागा उतर नाही. मग पुढच्या प्रवासभर तुम्ही 'विचारशून्य काम'हा खेळ खेळू शकता.
    बंदिस्त स्वरांचं सगळच संपून गेलेल असतं त्यांचा आकार, त्यांचा परिणाम, त्यांच उन्मुक्त विहरणं ! हळूहळू तही सापळण्याच्या आकाराचे होतात. सापळयांचा आकार पण स्थळा - काळाप्रमाणे बदलत असतो तसाच स्वरांचा आकार पण बदलतो काहीच त्या पक्ष्याच्या गाण्यासारख उरत नाही उन्मुक्त स्वरांना सापळा नसतो म्हणून बंदिस्त आकार पण नसतो. म्हणून ते आपल्याला स्पर्श करुन गेले की आपल्याला कळतात - समजले नाहीत तरीही.
    बंदिस्त, ओवलेल्या स्वरांच्या आकार कुणालाही सांगता येणार नाही. आपण फक्त ते बंदिवान स्वर बघायचे सापळा बघायचा आणि म्हणायच की हा सापळयाचा आकार म्हणजेच त्या स्वरांचा आकार. पण ते कांही खर नाही खरं हेच की बंदिस्त स्वर निर्जीव खोळीसारखे असतात. पंच सांगतात की हेच खरे स्वर आणि हाच त्यांचा खरा आकार. आपण ते मान्य करतो कारण आपल्या विचारांची जागा बंदिस्त स्वरांनी भरुन गेल्या मुळे आपल्याला 'विचारशून्य कामांचा' खेळ खेळण्याशिवाय गत्यंतर नसते. त्यासाठी आपल्याला कर्मकांडं हवी असतात - ती पंच पुरवत असतात. म्हणून पंच सांगतील ते आपण मान्य करतो.
    'पण एकाही स्वराला पकडता आणि ओवता आपण या दरीतून जाऊच शकत नाही कां? तस केल तर आपल्या जवळपास कांही मुक्त स्वरही शिल्लक रहातील आणि विचारही शिल्लक रहातील.'
    'तुला जर विचार करण्याच स्वातंत्र्य हवच असेल तर एकच उपाय आहे - पंचांपासून लांब रहाणे' - अस म्हणत म्हातारा बाब उठला, आणि चालू लागला. एकदा का त्याने जायच ठरवल की तो अगदी एखाद्या छोटयाशा प्रश्नाच उत्तर द्यायला पण यांबत नसे !

-------------------ज््र------------------पुढील ब्लॉग पान पहा

No comments:

Post a Comment