Wednesday, June 5, 2013

खिंडीच्या पलीकडे उन्हाळी शिबिरांपासून पुढे

खिंडीच्या पलीकडे

तो खूप दिवस आला नाही मी एका उन्हाळी शिबिरांत भर्ती झालो होतो. तिथसे चालक आग्रही किंवा कडक शिस्तीचे नव्हते. आम्हाला खूप कांही करता येत असे. सकाळी व्यायाम करता यायचा, किंवा स्मरणशक्ती वाढवायच्या वर्गात जाता यायच, किंवा लांब फिरायला, किंवा डोंगरात भटकून मोराचे पंख आणि सापाची कान शोधता यायची. मला सापाची कात शोधायला आवडायची. एखाद्या गुप्तहेरा प्रमाणे मी तिथल्या तिथे फिरुन फिरुन सापाचा माग काढत असे. सकाळच्या वेळी डोंगरावर वर्दळ होण्यापूर्वी - गेल तर रात्री बसलेल्या पातळशा धुळीच्या आवरणांतून साप गेल्याची रेघ स्पष्ट दिसायची कांही दिवसांनी मी रेघेच्या ठळक पणावरुन सापाची जाडी ओळखायला शिकलो मी एक दिवस एका रस्त्याच्या मागावर जायचो - दुस-या दिवशी दुस-या.  काही वेळा साप
गवतातून गेलेला असायचा. तरी पण दवबिंदूंवर साप गेल्याची रेद्य ओळखू येत असे. पण दिवस चढला की ती रेघ विरुन जायची मग मी पुनःगोल गोल भटकायचो आणिसाप गेलेला रस्ता शोधून काढायचो किंवा शिबिरांत परत जायची वेळ झालेली असायची.
    शिबिरात परत गेल की नत्यासाठी खूप गोष्टी असायचा. वर्गर पण असायचा आधी सगळी जण फक्त वर्गर खायची हळू हळू आम्ही इतर पदार्थही आवडीने खायला शिकलो.
    मोरपंखांची आपली गंमत असते काही पंखांचा डोळा पूर्ण झालेला असतो. त्यांच्यावर झळझळणारा निहा रंग असतो. कांहीच्या वरची बाजू चंद्रकोरीच्या आकाराची असते आणि डोळा अपूर्णच असतो. कांही परंतु एवढे निस्तेज रंगांचे असतात की ते मोराचे पंख वाटतच नाहीत. खरतर, ते त्याच्या पिसा-याचे पंख नसतातच मुळी ते त्याच्या छोटया - छोटया - उडायच्या पंखांपैकी असतात काही अगदी इवलू - इवलूसे पण पूर्ण पंख असतात - छोटेसे निळे - निळे डोळे असलेले कांही पिस अगदी बारकुली - निळया रंगाची असतात ती मोराच्या मानेजवळची असतात ओली केली की त्यांचा रंग हिरवा होतो कोरडी झाली की पुनःनिळा होतो.
    पण कुठल्याही पंखाची शान सापाच्या कातेची बरोबरी करुन शकत नाही सगळया अंगांनी सापासारखीच वाटणारी, झळाळणारी, साप कुठून बाहेर पडला असेल असा विचार करायला लावणारी ! म्हातारा बाबा असता तर म्हणाला असता - बघ बघ, हाच तो चैतन्यशून्य आकार अशी ही प्राण नसलेली कान हातात घरली की केविलवाणी लोळागोळा होऊन जायची तरी पण विच्यात अद्भुत आकर्षण होत. डोळयांच्या खाचाच असायच्या, पण अंगावरचे खवले मात्र उठावदार होते मी हातात घेऊन डोळे मिटले की त्यात चैतन्य सळसळू लागायच हळूहळू साप फणा काढून उठून बसायचा आणि माझ्याकडे टक लावून बघायचा. अर्थात्‌ डोळे मिटलेले असले की सापाच्या फण्याची किंवा टक लावून बघण्याची भिती नाही वाटत.
    उन्हाळी शिबीराचे असे मंत्र भारले दिवस टचकन्‌ संपूरही गेले.
------------------ज््र----------------
    शळा उघडली आणि नेहमीच वेळापत्रक सुरु झाल मी पुनः एकदा दर रविवारी म्हाता-या बाबाच्या येणाचा कानोसा घेऊ लागलो. आणि एक दिवस अगदी अस्पष्टसा तो खट्-खट्-ठक्‌- चा आवाज कानांवर येऊ ठेपला तो येत असे त्या वळणाच्या दिशेने मी पळत गेलो. तिथे नेहमीची गर्दी होती. पण म्हातारा बाबा नव्हता तो चिरपरिचित आवाजही जवळ येत नव्हता. मी एकदम भांबावलो तेवढयांत खट्-खट् आवाज ऐकून मी वळालो, आणि शल्लीच्या दुस-या टोकाकडून तो येतांना दिसला नेहमी यायचा, त्याच्या विरुध्द दिशेकडून त्याच्या परतीच्या दिशेकडून - मी असा सुसाट धावत गेलो की त्याला जवळ जवळ घडकलोच. 'तू कुठे होतास इतके दिवस? मागण्च्या महिन्यांत पण आला होतोस कां? तेंव्हा मी उन्हाळी शिबिरासाठी गेलो होतो. आणि तू शाळेच्या दिवसांत आला होतास कां? आता मी नेमाने शाळेत जायला लागलोय्‌. तुला बर वाटत नाही कां? तू असा आजारी कां दिसतोस?' माझे प्रश्न संपत नव्हते, पण मला धाप लागली होती.
    त्याने दृष्टि वळवली आणि डोळा भरुन माझ्याकडे पाहिल. 'मी प्रवासात होतो.' तो म्हाणाला.
----------------ज््र---------------
    'या वेळी मी एका कठिण खो-यांत होतो. त्याबद्दल नंतर सांगेन मागे आपण बोललो तेंव्हा मी तुला ढगांच्या दरीबद्दल सांगत होतो. पण त्यांत आता सांगायसारख फारस उरल नाही दरीचा प्रवास पुढे पुढे कठिण होत जातो. आधीच्या प्रवासात आपण सुखाने फिरतो. जणू कांही ढगांबरोबर तरंगतच पण आता अधून मधून हाता-पायांवर सरपटत जाव लागतं ! पाऊल वाटा अरुंद होत जातात, आणि तिथे खूप कांही कांही असत. विचित्र प्राणी असतात, मैत्री करणारे पक्षी असतात. आधीचे भिजवणारे आणि उजेडाची तिरिप टाकणारे ढग इथे पण असतात पण आता ते नुसता वैताग नाही आणत ते इतके जवळ येतात आणि इतके रागीट दिसतात म्हणून सांगू ! वाटत, ते सांगताहेत
- आमचा कर्मकांडांचा खेळ खेळ नाहीतर तुझी काळजी घेणार नाही. अर्थात्‌ त्यांच 'काळजी घेण' कांही आपल्याला आवश्यक नसत तरी पण अशा धमक्या केंव्हाही वाईटच मग आपल्याला सवंगडी ढग आठवतात. दरीच्या सुरवातीला ते किती दारीवाटीने आपल्या बरोबर असायचे. पण इथे ते नसतात आपल्याला वाटत - मागे नावं आणि त्यांच्यात खेळावं पण कळत की मागे जाता येणार नाही. या प्रवासात मागे जाता येत नाही.
    आणि तेंव्हा कुठे लक्षांत येत की आपण एक खिंड ओलांडून दुस-या दरीत आलो आहोत.
---------------------------पुढील ब्लॉग पान पहा

No comments:

Post a Comment