आईला माझी नेहमी काळजी वाटायची मी इतर मुलांपेक्षा वेगळा आहे अस ती म्हणायची. तिची काळजी अगदी अपरिचितांना देखील बोलून दाखायची. इतर मुळ किती दंगामस्ती करतात. हा गप्प गप्प पाय-यांवर बसून रहातो आणि त्या पक्षांबरोबर गात असतो. कुणाची तरी वाट पहात असलयासारखा
! कधी तिला वाटे याला कुण्या पिशाच्चाने धरल - बिरल की कांय? म्हणून का मी असा पोक्तपणे वागत होतो? मोठी माणस अबोल, गंभीर, पोक्त असली की ठीक असत, पण लहान मुळ खोडकर, आनंदी, आरडा - ओरडा करणारी असली पाहिजेत. शिवाय मी सारखे प्रश्न करतो. मी प्रश्न विचारण्याबद्दल तिला काळजी नव्हती. उलट मी प्रश्न विचारावे म्हणून ती प्रोत्साहन द्यायची. विचार, प्रश्न विचार, लहान मुलांनी खूप प्रश्न विचारावेत. त्यातूनच आपल्याला ज्ञान मिळत. मी प्रश्न विचारण्याचा तिला त्रास नव्हता, मी प्रश्न करतो याचा होता. प्रश्न विचारण वेगळ आणि प्रश्न करण वेगळ. हे कांय किंवा कस आहे विचारण वेगळ आणि कांय म्हणून आहे हे विचारणं वेगळ. पिठयान् पिढया चालत आलेल्या रीतींना मी 'कांय म्हणून' अस विचारलेल तिला आवडत नसे. तिने स्वतः त्याबद्दल कधी प्रश्न काढले नव्हते.
कुणाही समजूतदान माणूस असे प्रश्न काढू शकेल हे तिला परत
नव्हत. कुणी काढत असेल तर तो समाजामधे बेशिस्त आणि गोंधळ निर्माण करेल. नवीन गोष्टी शिका, नविन कांही निर्मिती करा, शोध लावा, पण जुन्या - पुराण्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह लावू नका. कदाचित ती ईमानदार होती. तिने वर्षानुवर्ष ज्या श्रध्दा बाळगल्या त्यांच ती पुढल्या पिढीला देत होती. इतरही तेच करत होते. ते श्रध्दा हेऊन होते. पण मला आता श्रध्दा आणि विश्र्वास चालणार नव्हते. आता मला माहित करुन घ्यायच होत. तोच घ्यास मला लागला होता. दिवसेन् दिवस ! जास्त तीव्रतेने !
-------------------------------------------
'आपण बंदिस्त स्वरांचय दरीतील प्रवासाची गोष्ट पटकन संपवू शकतो. तुम्ही जेवढे जास्त स्वर पकडून ओवून घ्याल, तितक्या पटकन तुमच्या विचारांची जागा त्या निर्जीव स्वरांनी भरुन जाते. मग तुमजी वाट पटकन् सरते. तुम्ही लौकरच खिंड ओलांडता आणि बेगल्या दरीत येता - बल्यांच्या दरीत ! अर्थात तो सापळा तुमच्या खांद्यावर अजूनही असतो. पुढे शेवटची खिंड ओलांडपर्यंतत तो तुमच्या खांद्यावरच रहाणार असतो. पंचांनीच तस सांगितलेल असत !
पण त्या येडपट पंचांच आपण नाही ऐकल तर कांय होत ?मला तरी वाटत की दिसेल त्या पहिल्याच कचरा कुडीत हा सापळा टाकून दिला पाहिजे.
आपण तस करु शकतो. पण मग पंच आपल्याला कर्मकांडांचा खेळ खेळू देणार नाहीत. इतर सगळे प्रवासी त्या खेळांत मग्न असतील. आपण एकटे पडू. लाखात एखादाचे प्रवासी म्हणतो की मी स्वरांची शिकार करणार नाही, त्यांना बंदिस्त करणार नाही किंवा पंच म्हणतात त्याला फुटक्या कवडीइतकीही किंमत देणार नाही. असा एखादा प्रवासी भेटला तर मात्र आपण एकटे उरत नाही. जरी असा प्रवासी अगदी धोडा काळ आपल्याबरोबर चालला तरी आपल्याला एकट वाटत नाही . पुढे वेगळे चाललो तरी आपलयाला माहित असत की तो आपला प्रिय सहप्रवासी या प्रवासात कुठेतरी आहेच. म्हणून जर तुला पंचांच्या म्हणण्याल विशेष किंमत द्यायची नसेल तर खांद्यावर सापळा नसलैलया आणि र्ककांडातले खेळ धुडकावून लावणा-या प्रवाशाच्या शोधात रहा. हे थोड कठिण आहे, पण अशक्य नाही. कारण तो प्रवासी पण आपल्या शोधात असणार, नाही कां? आणि आता मला पुढची गोष्ट सांगू दे.
बिळयांच्या दरीतल मुख्य काम म्हणजे बिल्ले शोधणं, बिल्ले ओळखणं आणि बिल्ले मिळवण, जर तुम्हाला ही तीन काम नीट करता आली नाहीत तर लगेच सहप्रवाशांना तुमची शंका येते की तुम्हीं सापळा टाकून दिलाय्. तुम्ही तुमच्याजवळ उन्मुक्त स्वर आणि स्पतंत्र विचारांसाठी जागा बाळगताय्. मग तुमच्याभोवत घोळका जमाते. कित्येक पंच तुम्हाला घेरुन एवढी कर्मकांड करायला लावतात की तुमच्या कनांत नवीन विचार निर्माण होतो न होतो तोच एखादं कर्मकांड त्याचा ताबा घेते अशा वेळी विचारांना हवा असतो एखादा अंधारा आश्र्वासक कोपरा जिये ते या भयंकर कर्मकांडापासून लपून राहू शकतील. पण पंचांना तेही माहित असत.
ते तुमच्यावर त्यांच्या श्रध्देच्या झगझगी प्रकाशझोत टाकतात. जे विचार त्या क्षणिक उजेडों दिपतात त्यांचा लगेच ताळा घेऊन त्यांना कर्मकांडात बदलल जात. 'म्हणजे परिकथेतला जादूगार जस त्याच्या राज्यांत येणा-या राजकुमारांना दगडी पुतके बनवतो तसा?'
'पुनःछान उदाहरण दिलेस बघ ! तसाच. त्याचवेळी इतर प्रवासी आपल्या सभोवतींली स्वर पकडून त्यांच्या माळा ओवन असतात हेतू हा की एकही मुक्त स्वर शिल्लक राहू नसे आणि तयाच्या स्पर्शाने जे विचार निर्माण झाले असते ते होऊ नसेत. मग तुमच्याकडे वचार शिल्लक रहात नाहीत. तुम्ही पंचांकडे दयेची याचना करता आणि त्यांचे खेळ खेळू द्यायची विनंती करता . म्हणून तुला पुनः सांगतो. तुला जर स्वरांचे सायके टाकून द्यायचे असतील तर पंच आणि इतर प्रवशांपासून लांबच हरा - फक्त तुझ्यासारखा कोणी दुसरा प्रवासी आहे का
त्याचचच शोध घे.
तू मला वबल्लयांच्या दरीची गोष्ट पुढे सांग ना ! कसे असतात ते बिल्ले ?
'
त-हेत-हेचे बिल्ले असतात. तुला माहित आहे ना बिल्ले कशासाठी असतात ते?
मी बिल्ले रोजच बधत होतो. डबे, बाटल्या, पेटया, सगळी बर बिल्ले लावलेले असतात. त्यार वर आतल्या वस्तुंची माहिती असते. त्या काय आहेत, कशा वापराचा वगैरे कधी ही लेबलं कागदांर असतात आणि कागद वस्तूंवर चिकटवतात कधी ही लेबलं सरळ वस्तूवरच छापलेली असतात.
हे तू डबे, खोके यांच्याबद्दल सांगतोयस्. पण जेंव्हा प्रवाशांना हे बिल्ले लावतात त्यांचा अर्थ कायं असतो?
मी थोडा विचार केला - बिल्लयांवर त्यांची नांव असू शकतात - ते कुठून आलेत - कुठे चाललेत, वगैरे
पण तुझ्या शेवटच्या दोन प्रश्नांची उत्तर सगळयांना सारखीच आहेत सगळे एकाच ठिकाणाहून येतात आणि सारख्याच ठिकाणी पोचणार असतात. तरी त्यांना तू बिल्ले लावशील कां?
नाही, तू ज्या त-हेने हे मांडलस त्यावरुन तरी बिल्लयांची गरज नाही. कुठुन आले आणि कुठे चालले हे इतक स्पष्ट आहे की बिल्ले नसले तरी सगळयांना माहीत आहे.
बरोबर, ज्या गोष्टी स्वयंस्पष्ट असतात, त्यांना बिल्लयांची गरज नसते जे स्वयंस्पष्ट नसत त्याला बिल्ले लागतात. जे अजिबात स्पष्ट नसत त्याला बिल्ले हवेतच. थोडक्यांत जे आपल्यात नसत ते आहेसं दाखवण्यासाठी बिल्ले लागतात. जे आपल्याला माहित असत त्यासाठी बिल्ले लागत नाहीत.
समज तुझ्यासमोर एक सैनिकांची तुकडी आहे. सगळयांनी सारखाच गणवेष घातला आहे सजम त्यांचा तुकडी - प्रमुख एक खरा चांगला नेता आहे. मग तो कुठंही असला तरी उठून दिसेल. तू त्याला कुठेही ओळखू शकशील. पण समज तो चांगला नेता नाही, तर मग तो तुकडी प्रमुख आहे हे ओळखायला कांही तरी कराव लागेल सगळयांत सोपी गोष्ट म्हणजे त्याच्या शर्टावर एक बिल्ला लावणं मग तो जरी नेता नसला तरी त्याला नेता म्हणून मान्य केल जात. तुला कळल ना? बिल्ला असला की कुणाही त्याला प्रश्न करत नाही. कारण ज्याच्यावर बिल्ला आहे त्याला उघडून त्याच्या आंत खरोखर बिल्लयातील वर्णनाप्रमाणे गुण किंवा वस्तु आहेत की नाही हे तपासण खूप कठिण असत. कुणाजवळ तेवढा वेळही नसतो आणि उत्साहही नसतो.
या प्रवासात पहिल्या दोन द-या ओळांडतांना प्रवाशांची एकमेकांशी बरीच ओळख झालेली असते ओळख ही पण एक अजब वस्तु आहे. साधारणपणे आपल्याला फार कोणाची नीट ओळख नसते. स्वतःची पण नसते ओळखीसाठी आपल्याकडे वेळ असावा लागतो, झालच तर ज्याची ओळख करुन घ्यायची त्याला आतून - बाहेरुन तपासून घेता यायला हब तस बरोबरच्या प्रवाशांना तपासत असतानाच त्याच पध्दतीने आपण स्वतःला पण तपासायला शिकतो. अशा वेळी आपल्या मनाच्या अंधा-या, सुखकर कोप-यांत दडून बसलेले विचार समोर येतात. त्यांच्यामुळे जीवन आणि चैतन्य निर्माण होत. बहूधा त्यांच्यामुळे मुक्त स्वर पण निर्माण होतात. मग पंचांच काम आणि अस्तित्व धोक्यात येत.
पण पंच हुषार असतात. म्हणून तर त्यांनी त-हे त-हेच्या बिल्लयांचा शोध लावला. प्रवाशांना बिल्ले लावले की ते एकमेकांना ओळखायला शिकत नाहीत - ते फक्त बिल्ले ओळखायला शिकतात, हे बिल्ले सुध्दा सापळयांत अडकलेल्या आणि ओवलेल्या बंदिस्त स्वरांसारखेच असतात. चैतन्य नसलेले आकार. त्यांच्या आत विचार दडलेले नसतात. त्यांच्या आत काहीच नसत - फक्त एक भकास पोकळी असते. तरी पण आपण त्यांनाच ओळखायला शिकतो आणि प्रवाशांची नीट ओळख करुन घ्यायला विसरतो पंच पुरती काळजी घेणारे असतात. ते खूपसे बिल्ले बनवतात आणि एकेका प्रवाशाला अनेक बिल्ले अडकवतात. कांही तरी किरकोळ फरक सोडला तर सगळे बिल्ले सारखेच असतात.
'पण सगळयांना सारखेच बिल्ले लावायचे तर त्यांना अर्थ कांय उरणार?' मी विचारल.
'बरोबर आहे - पण इथेच तर पंचांची हुषारी दिसून येते. ते सांगतात - प्रवाशांच्या बिल्लयांची क्रमवारी आणि जोडया पण ओळखा. ते महत्वाचे ! त्यामुळे सगळे बिल्ले सारखे असले तरी क्रमाप्रमाणे त्यांच्या जोडया बेगळया वाटतात. मग प्रवाशांना हा खेळ आवडू लागतो 'बिल्ले शोधा, बिल्ले ओळखा आणि बिल्ले मिळवा' हा तो खेळ. प्रवाशांना वाटत त्यांना नवे बिल्ले सोधायचे आहेत, नवे बिल्ले ओळखायचे आहेत आणि नवे बिल्ले मिळवायचे आहेत. प्रत्यक्षांत ते फक्त नवे नवे क्रम शोधून ओळखून नवे बिल्ले मिळवत असतात.
पण असे किती नवे क्रम करता येतील ? हा खेळ खूप काळ चालत राहिला तर लोकांना क्रमांचं काही नाविन्य रहाणार नाही.
अस तुला वाटत. आपण एक उदाहरण बघू या मगाचच्या सैनिकांचच घे. समज एका तुकडीत दहा सैनिक आहेत. प्रत्येकाची पदवी निराळी आहे. म्हणजे एका सैनिकाला दहा वेगवेगळे बिल्ले लावता येतील पण अशा दहा तुकडया असल्या आणि पदवीचा एक असे दोन बिल्ले दिले तर अशा शंभर जोडया होतील. पण समज एक हजार तुकडया आणि एक हजार पदव्या असल्या तर दहा लाख जोडया होतील. आणि मी तुला अजून सांगितलेलच नाही की बिल्ले सतत बदलत असतात. समज दहा सैनिकांच्या पदव्या सारख्या बदलत असल्या तर कांय होईल? बिल्लयांवरुन त्यांना ओळखणारा माणूस कधीच तयांची खरी ओळख समजून घेऊ शकणार नाही. त्याला एवढच कळेल की सगळयांना सारखेच बिल्ले लावतेत पण ते वेगळे दिसतात.
प्रवाशांचा एकच बिल्ला त्यांचा खरा खुरा बिल्ला असतो - त्यांच्या नांवाचा बिल्ला. तो बदलत नाही आणि तो काढूनही टाकता येत नाही. हा प्रवास खूप दीर्घ असतो. प्रवाशाला आपलया लांबाच्या बिल्लयाची इतकी सवय होते की आपण नावाशिवायही इतर कुणी आहोत हे तो विसरुनच जातो. आपल्या नांवात तो इतका गुरफटून जातो की त्याचा विश्र्वास, त्याचा धर्म, त्याचं ईमान, सगळया त्या नांवात समावून जात. तो आपल्या नांवाच्या बिल्लयासाठी जगतो, नांवासाठी मरायलाही तयार होतो, पण नांवाचा बिल्ला गमवायला तयार होत नाही.
'पण जर नांवाचे बिल्ले बदलत नसतील तर प्रत्येक प्रवाश्याला स्वतःच्या नांवाबरोबरच इतरांच्याही नावाची ओळख होत असेल. मग बिल्लयाची गरज कांय?'
'खरं आहे. आपल्याला इतर प्रवाशांच्या नांवाचीही ओळख होते - निदान तयातल्या खूपशा नांवांची. हा पण या प्रवासातला खेळ आहे - किती जास्त नांवांशी तुम्ही ओळख करुन घेऊ शकता. एकेका प्रवाशाकडे कित्येक बिल्ले असतात, पण त्यांच्यावर वेळ घालवण्यांत अर्थ नसतो. म्हणून आपण फक्त प्रत्येक प्रवाशाच्या नांवाच्या बिल्लयाकडे लक्ष घायचे. इतर सर्व सोडून द्यायचे - त्याचे इतर बिल्ले पण आणि त्याची खरी ओळख पण.
'ठीक आहे अशा त-हेनी तुम्ही जास्तीत जास्त नावांशी परिचित झालात की तुम्हाला कांय मिळत? अजून एक बिल्ला. या बिल्लयांच्या दरीत आणि पुढच्या सगळया द-यांमधे, तुम्ही कर्मकांडाचे जेवढे खेळ जिंकाल, तेवढे बिल्ले तुम्हाला मिळत जातात, हे बिल्ले बदलत जातात. पण कधीकधी प्रवासात तुम्हाला पदकही मिळून जात जे बदलत नाही. नांवासारखच ते पण तुमच एकटयाच असत. ते तुम्ही तुमच्या नांवाच्या बिल्लयापुढेच लावायच अशा त-हेने तुमच नांवही मोठ होत. प्रवासात कधी कधी तुम्हाला असे प्रवासी दिसतील ज्यांनी कर्मकांडांचे खूप डाव जिंकले आहेत आणि जयांना खूप पदक मिळाली आहेत इतक मोठ नांव आणि इतकी पदकं की ती साभाळत चालणही त्याला अवघड जात. तुला वाटेल की असा प्रवासी आनंदाने आपली पदकं उतरवून फेकून देत असेल, निदान कांही पदक तरी टाकून देईल. पण चुकतोस तू ! त्याला मिळतील तेवढी पदक हवी असतात. त्याला सगळयांपेक्षा जास्त पदकं हवी असतात. तो चांचल्यात चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करतो. मग त्याला अजून एक बिल्ला मिळतो.
फक्त थोडया प्रवाशांच्या लक्षांत ये की पदक म्हणजे नांव नाही. ते क्वाचित बदलू शकत आणि ते टाकूनही
देता येत. साधारणपणे पदक मिळवण्याचे नियम असे आहेत की सामान्य प्रवाशांना ते शक्यतो मिळत नाही. पदक ही जास्त करुन पंचांनाच मिळतात. कस ते तुला नंतर सांगेन.
'पण मुळांत पंचांना या एवढया मोठया प्रवासात सगळीकडे लक्ष ठैवण कस जमत? तू सांगितलस की इथे असंख्या पाऊलवाटा आणि त्यांने असंख्या फाटे आहेत. पंच सगळीकडे उपस्थित राहून, प्रवाशांचे खैह बघून, त्यांना योग्य बिल्ले किंवा पदकं कशी जिंकणा-या प्रवासी कोण ते ठरवून, कांय देऊ शकतात? मी विचारल.
प्रश्न आणि प्रश्न ! तुला पण प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा असा नाद जडलाय की माहित असण खर महत्वाच हे तू विसरतोस. ठीक आहे, तुला सगळ समजून घ्यायचय, पण मी तुका नाही सगळ समजावून देऊ शकत मला एवढच माहित आहे की पंच कुणी खास प्रवासी नसतात. ते फसवेच असतात. फक्त ते पंचांचे कपडे घालतात आणि प्रवाशांना वाटप यांना खरच कुणी पंच केल आहे. प्रवाशांच्या या समजुतीमुळेच पंचांना कर्मकांडांवर प्रभुत्व सांगता येत. पंचामधे असलाच कांही गुण तर एवढाच की इतरांपेक्षा ते खूप चलाख असतात.
पण कितीही चलाख असले तरी त्यांनाही प्रवास टाळता येणारच नसतो. त्यामुळे ते सगळीकडे कसे उपस्थित राहू शकतात ही तुझी शंका खरी आहे. मग ते खेळांवर लक्ष कस ठेवतात आणि कोण हरल किंवा जिंकल त कस ठरवतात? त्याचा एक चलाख उपाय त्यांनी शोधलेला आहे. ते प्रवाशांनच एकमेकांच मूल्यमापन करायला सांगतात ते प्रवाशांना अस भासवतात की प्रवासी हे सर्व त्यांच्या वतीने आणि त्यांनी वेळोवेळी उल्लेख केलेल्या 'मोठया पंचांच्या' वतीने करत आहेत. पण ही सगळी निव्वळ त्यांची चलाखी आहे.
म्हातारा बाबा उठू लागण्याआधीच मला लक्षांत आल होत की त्यांची वेळ संपलीय्. त्याच्या शेतवटच्या वाक्यानंतर तो एक दीर्घ निःश्र्वास टाकीत असे. एखाद मोठ ओझ उतरवून ठेवाव तस ! पण तयाच्याकडे कोणत ओझ होत? मला खात्री आहे की त्याने कधीही पदक मिळवण्यासाठी ते निरर्थक खेळ खेळले नसणार, कारण त्याला ओझं बाळगायची तीब्र नावड होती.
----------------------------------------------------- ---पुढील ब्लॉग पान पहा
No comments:
Post a Comment