सोनं
देणारे पक्षी
शाळेत
असताना एकदा मराठीचे मास्तर
अतिलोभी माणसाचा धडा शिकवत
होते.
एका
माणसाला सोन्याची अंडी देणारी
कोंबडी मिळाली.
दर
तीन – चार दिवसांनी ती कोबडी
सोन्याचं अंड द्यायची.
लोभी
माणसाला राहवेना.
त्याचा
धीर सुटला.
हिच्या
पोटामधली सगळीच सोन्याची
अंडी एकदम काढून घेतली तर आपण
खूप श्रीमंत होऊ,
या
कल्पनेने त्याने कोंबडीचे
पोट कापले आणि हाय। आत एकही
अंडे तर मिळाले नाही,
कोंबडी
मेली ती मेलीच। तर मुलांनो,
या
गोष्टातून आपण काय बोध घेतला
?
आमच्यापैकी
बऱ्याच हुशार (?)
मुलांनी
धडा आधीच वाचलेला.
त्यामुळे
आम्ही एका आवाजात उत्तर दिले
-
अतिलोभ
करू नये.
पण
एका मुलाने म्हटले -
पक्ष्यांना
ठार मारू नये.
तेव्हा
आम्ही त्याला खूप हसलो होतो.
आता
वाटतं आम्ही हुशार असू (
कदाचित
)
पण
तो नक्कीच आमच्याहून जास्त
शहाणा होता। आणि असंही लक्षात
येतं की एकदा आपण एक चौकट
स्वीकारली,
की
आपल्या कल्पनाशक्तीला कशी खीळ
बसते.
नोकरशाहीची
सदा अशी अवस्था असते.
असो.
पण
त्या उत्तरामुळे ही गोष्ट
आणि सोनं देणारे पशू– पक्षी
असू शकतात अशी एक भोळी कल्पना
मनात रुजून बसली.
पुढे
एकदा कोणीतरी मला एका छोट्याशा
प्राण्याची ओळख करून दिली.
हा
प्राणी म्हणजे सापसोळी.
शाळेच्या
मैदानात कधीतरी सुळकन् इकडून
तिकडे सरपटत जाणारा,
लांबीने
पालीएवढा पण पेनच्या जाडीचा
हा प्राणी.
त्याची
कातडी अगदी नितळ,
तुकतुकीत
व काँफी रंगाची असते.
जणू
काही नुकतीच पॉलिश मारून
चकचकीत केली असावी.
पाठीवर
उठून दिसतील अशा दोन पांढूरक्या
रेघा असतात.
उन्हात
सळसळत जाणारी सापसोळी पटकन
मनाला भुरळ पाडायची.
कुणी
म्हटले,
ही
असेल तिथे साप निघत नाही.
पण
त्याहून चांगली माहिती
सवंगड्यांनी दिली की ज्याला
सापसोळी दिसेल त्याला सोनं
किंवा पैसे मिळतात.
मग
आम्ही शाळेत सापसोळी दिसण्याची
व दिसेल त्याला त्या दिवशी
रस्त्यात काही पैसे सापडतात
का,
याची
वाट बघायचो पुढे खूप खूप वेळा
सिद्ध झालं की सापसोळी दिसण्याचा
आणि पैसे मिळण्याचा काही संबंध
नाही.
तरीही
माझं सापसोळी बद्दलच आकर्षण
कमी झालं नाही.
आतातर
आमच्या पुण्याच्या घरात बऱ्याच
सापसोळी रहात आहेत.
त्या
आपली जागा सहसा बदलत नाहीत
ही आमच्या दृष्टीने पर्वणीचे
आहे.
त्यांच्या
दिसण्याच्या जागा आणि वेळासुध्दा
आमच्या माहितीच्या झाल्या
आहेत.
संबंध
देशात म्हणजे अगदी बंगाल–
बिहारपासून तर केरळपर्यंत
ज्याचं दर्शन शुभशकुनाचं आणि
पैसे देणारं मानतात असा एक
पक्षी आहे धनेश किंवा हॉर्नबिल.
खेडोपाडी
याला धनचिरैय्या,
स्वर्णेश
अशी नावं आहेत,
म्हणजे
याच्या नावातच पैसा व सोन
आहेत.
पक्षीतज्ञ
सलीम अलींना याने इतकं भारून
टाकलं,
की
त्यांनी मुंबईत पक्षीमित्रांसाठी
जी बॉम्बे नँचरल हिस्टरी
सोसायटी काढली तिचे बोधचिह्न
धनेश पक्षी आहे.
त्यांच्या
मासिकाचे नावही हॉर्नबिल
आहे.
आकाराने
घारीहून मोठा चॉकलेटी रंगाच्या
या पक्षाला धम्म पिवळी मोठी
चोच असते आणि त्या चोचीवर
छोटेखानी बाकदार शिंग असतं.
या
पिवळ्या मोठ्या चोचीमुळेच
त्याचं आणि सोन्याचं नातं
जोडलं असावं.
पुणे–
मुंबईसारख्या औद्योगिक
शहरांमध्ये मला हा पक्षी कुठेच
दिसलेले नाही पण सांगलीच्या
कलेक्टरच्या बंगल्यात एक
शिरीषचं विस्तीर्ण झाड होतं,
त्यावर
किमान सहा – सात धनेशांची
वस्ती असे.
वर्षातले
चार– सहा महिने राहायला तिथे
येत.
मी
सांगलीला कलेक्टर असताना
शिरीषच्या फांद्यांत खोल
दडून बसलेले हे धनेश चाऱ्यासाठी
कधी उडतात त्याची आम्ही वाट
बघत असू.
निदान
एक तरी धनेश दिसावाच अशी इच्छा
असे.
नंतर
सोनं मिळेल म्हणून नाही। पण
खूपदा असा धनेश बघितला की त्या
दिवशी कांही तरी चांगली,
प्रसन्न
करणारी गोष्ट घडायची.
हळुहळू
लक्षात आलं की हा योगायोग
वगैरे नव्हता.
तो
सगळा प्रकार आनंददायी होता.
सकाळी
लवकर उठून झाडाजवळ थांबून
सूर्योदयाच्या आसपास कधीतरी
फडफडत बाहेर निघणारा पक्षी
बघणं,
त्याचं
ते मनोहारी दर्शन,
या
सगळ्यामुळं मन प्रसन्न असायचं
आणि आपण प्रसन्नचित असलो,
की
आपलं वागणं त्या दिवशी असं
असतं,
की
ज्यातून काही तरी चांगलं घडून
जावं.
अशा
या धनेशच्या चौपट आकाराचा
धनेश कुणाला पाहायचा आहे का?
भुवनेश्वरच्या
नंदनकानन बागेत मुलांची आगगाडी
आहे,
त्या
स्टेशनवर लाकडाचा मोठा कोरलेला
धनेश पक्षी आहे.
एरवीसुध्दा
नंदनकाननसाठी माझी शिफारस
आहे.
तिथे
मगरी आणि घोरपडींचं पैदास
केंद्र आहे,
काळे
चित्ते आहेत,
पांढरे
सिंह आहेत.
आणखीही
खूप पशू – पक्षी आहेत आणि
त्यांना छळवाद न वाटेल असे
वातावरण आहे.
ज्यांच्या
दर्शनानं सोनं मिळतं म्हणतात
असा आणखी एक पक्षी म्हणजे
भारद्वाज किंवा पाणकोंबडी
किंवा कुकुर कोंबडी.
विजेचा
पंप अविरत चालत असताना जसा
कुक् कुक् आवाज येतो तसा खोल
खर्जात कुक् कुक् असा आवाज
काढणारा हा पक्षी अत्यंत लाजरा
बुजरा असतो.
माणसाची
चाहूल लागली तरी उडून जातो.
हा
पक्षी आकाराने कावळ्याहून
मोठा.
कुळकुळीत
काळा रंग,
पण
पाठ चमकणारी.
कॉफीत
सोनेरी रंग मिसळावा तशी.
एकूण
ज्या पक्षी किंवा प्राण्यांकडं
काहीतरी लकाकी,
चकाकी
आहे त्याचा संबंध माणसाने
सोन्याबरोबर जोडला.
भारद्वाजला
उडताना पंख विशेष हलवता येत
नाहीत.
म्हणूनच
फार लांब पल्ला मारता येत
नाही.
मात्र
त्याची पहिली झेपच इतक्या
शक्तीने घेतलेली असते,
की
त्यातच तो बरेच अंतर पार करतो.
त्यावेळी
दोन्ही पंख पसरून तो जी झेप
घेतो ती पाहातच राहावसं वाटतं.
हा
झाडात जाऊन बसतो ते दृश्य पण
मजेशीर असतं.
खालच्या
फांदीवरुन वरच्या फांदीवर
शिडी चढून गेल्यासारखं चढतो
आणि खोल आत जाऊन बसतो.
आमच्या
पुण्यातल्या घराच्या अंगणात
भारद्वाजाने तळ ठोकायला तब्बल
दोन वर्षे लावली.
पक्षी
नवीन जागा किंवा नवीन झाड
पटकन् स्वीकारीत नाहीत.
पारखून,
खात्री
करुन मगच आमच्या अंगणात दोन
भारद्वाज राहू लागले.
जमिनिवर
उतरुन संथ पावले टाकत ते किडे
टिपत असतात.
एकदा
एका भारद्वाजाने सरडा पकडला
आणि बांबूच्या झाडावर बसून
खाऊ लागला.
ते
एका कावळ्याने पाहिले.
तो
जवळ येऊन आरडाओरडा करुन
भारद्वाजाला त्रास देऊ लागला.
एरव्ही
भारद्वाज झाडाच्या अगदी आत
शिरला तर कावळ्याला तेवढे आत
जाता येत नाही.
पण
पंजात धरलेला सरडा फांद्यांना
अडकून खाली पडेल,
या
भीतीने त्याला जास्त आत जाता
येत नव्हते.
बाहेर
राहिला तर कावळ्याचा त्रास.
थोड्या
वेळाने तर अजून एक कावळा आला.
एव्हाना
भारद्वाज कातावला होत.
शेवटी
निम्मा सरडा त्याच्या तोंडातून
खाली पडलाचं.
दोन्ही
कावळे झडप घालून तो उचलून घेऊन
गेले व भांडत बसले.
भारद्वाजाला
निम्म्या सरड्यावरच समाधान
मानावे लागले.
माझ्या
नाशिकच्या कमिशनरच्या बंगल्यात
वडाच्या अति विस्तीर्ण झाडावर
भारद्वाज राहात असत आणि
बंगल्याच्या आवारात फिरत
असतं त्यांच्या वेळापत्रकावर
पाळत ठेवून त्यांना पाहिलं
असं करावचं लागल नाही.
सहजगत्या
खिडकीतून बाहेर पाहिल तरी ते
दिसत.
साहजिकच
सांगली कलेक्टर आणि नाशिकच्या
विभागीय आयुक्ताचा बंगला
यांना उंदड यश आहे,
असे
मला वाटले.
ते
धनेश आणि भारद्वाज,
त्यांना
हक्काचे सुरक्षित घरटे देणारी
शिरीषची वडाची झाडं आणि त्या
झांडाना आश्रय देणाऱ्या या
दोन वास्तू.
यांना
देव उदंड आयुष्य देवो असच मी
म्हणणार।
सोन्याचीच
चर्चा चालू आहे तर झाडांना
तरी कां मागे ठेवा ?
सोन्याचा
संबंध सांगणारे दसऱ्यातले
सर्वांच्या परिचयाचे शमीचे
झाड आपल्याला माहीत आहे.
पण
कांचन म्हणजे सोनं या नावाचेच
एक झाड असते.
शमी–
आपटा याच जातकुळीले,
आणि
तशीच जोडपाने असणारे.
साताठ
फूट उंचीचा छोटासा डौलदार
घेरा असलेल्या या झाडाला निखळ
सोन्याच्या पिवळ्या रंगाची
फुलं येतात.
पिवळाधमक
सोनचाफा,
घोसाघोसांनी
लटकणारा पिवळा बहावा,
हळदीसारख्या
पिवळ्या फुलांवर चेस्टनट
रंगाचे तुरे मिरवणारा काशिद,
या
सर्वांना मागे टाकणारं आणि
कांचन हे नाव सार्थक करणारं
हे फूल असतं.
याच्याहून
थक्क करणारं सोन्या– चांदीचं
मिश्रण मी बघितली आहे.
गगनजाई
ऊर्फ बुचाच्या उंच उंच झाडांच्या
शेंड्यांना दसऱ्याच्या सुमारास
लांब लांब हस्तिदंती रंगाच्या
दांडीची पांढरी फुलं येतात.
पुण्यात
आमच्या घरी तसाच लॉ कांलेज
रोडवर,
तर
नाशिकच्या रमाबाई आंबेडकर
वसतिगृहाच्या दारातच ही झाडं
आहेत.
एक
दोन महिने या फुलांच्या सीझन
टिकतो तेव्हा फुलांनी मढलेला
झाडांचा शेंडा चांदण्या रात्री
जणू सोन्याचे जरतारी काम
केल्यासारखा चमकतो.
ज्याला
चांदण्यातल्या ताजमहालची
प्रचीती हवी असेल त्याने हे
दृश्य बघून घ्यावं असं मी
बिनदिक्कत म्हणेन.
ताजमहाल
पेक्षा थोडेसे सरसच,
कारण
हवेत हे सोनेरी चंदेरी गुंबद
डोलत असतात.
ताजमहालच्या
गुंबदांना कुठे डोलता येतं
?
-----------------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment