Wednesday, June 5, 2013

खिंडीच्या पलीकडे माझी भूमिका आणि अनुवादाविषयी थोडेसे

खिंडीच्या पलीकडे

The Last Pass या मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक आहेत श्री रविंद्र नाथ पराशर (चंडीगढ) यांनी आधी भौतिक शास्त्रात एम एस्सी ही पदवी घेतली. मग खूप वर्षानी लंडन स्कूल ऑफ एकॉनॉमिक्स येथून अर्थशास्त्रात एम.ए.ची पदवी घेतली त्यांनतर लॉ ची डिग्री देखील घेतली या सर्वांच्या दरम्यान भारतीय प्रशासनिक सेवेत  असल्यामुळे हरियाणा भारत सरकारची चाकरी पण कार्यक्षमतेने करीत आहेत.
    त्यांचे षौक आहेत - हिमालयांत मनमुराद भटकणे (नुकतीच त्यांनी कैलास - मानसरोवर यात्रा केली), कविता लिखाण करणे, आणि काष्ठशिल्प बनवणे.
    दि लास्ट पास हे त्यांचे पहिल पुस्तक कळकच्याहून रायटर्स वर्कशॉप या इंग्रजीतील अत्यंत चोखंदळ समजल्या जाणा-या प्रकाशनामार्फत १९       मध्ये प्रकाशित झाल. आता ते या त्यांच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे.
---------------------------------------
    माझ्या अनुवादाविषयी थोडेसे - रविंद्रनाथ पराशर यांची माझी समव्यवसायिक असल्यामुळे ओळख तर होतीच, त्यांच्या हिंदी इंग्रजी कविताही वाचल्या होत्या - ते सर्व फार पूर्वी.
    एकदा अतिशय संकोचाने त्यांनी मला त्यांची दि लास्ट पास ही कादंबरी वाचायला दिली. संकोचाने या साठी की सामान्यपणे त्यांना नोकरीशिवाय इतर कांही बोलायला विशेष आवडत नाही.
    ही कादंबरी मराठी वाचकापर्यंत जावी अस मला कां वाटल? तर एका अगदी वेगळया चष्म्यातून जीवनाकडे बधण्यासाठी ही कादंबरी आहे. जगाच्या कृत्रिमतेमध्ये जगण्याचा अर्थ हरवतोय्‌ अशी पुसट - कल्पना असलेला आणि तो अर्थ शोधण्यासाठी व्याकलुळलेला एक लहान मुलगा - तो व्याकुळही नाही कारण व्याकुळतेला विसरुन बागडत रहाण्याइतक त्याच लहान वय आहे. पण कुठल्या तरी आजोबांच्या गोष्टीमध्ये हा जीवनाचा अर्थ उलगडतोय्‌ अस वाटल्या बरोबर तो त्या गोष्टीचा पिच्छा पुरवतो - त्यासाठी आईने दिलेले खाऊचे पैसे जपून ठेवतो.
    त्याचं आणि आजोबांच ठरलेल आहे की, ज्या कुठल्या दिवशी आजोबा त्याच्या गावी येतील त्या दिवशी त्याला गोष्टीचा पुढचा भाग सांगतील. पण आधी त्याने आजोबांना गोष्टसाठी पैसे द्यायचे. त्या दिलेल्या पैशांचा मोबदला असेल तेवढीच गोष्ट आजोबा सांगणार. एकदा ते उठले की, त्यांना थांबवायचे नाही.
    म्हाता-या आजोबांची गोष्ट अत्यंत संवेदनशीलतेने चाको-या तोडत जाणारी गोष्ट आहे. 'मिटल्या डोळयांना जगातल काहीच अदृश्य नसत !' किंवा 'मी प्रश्न विचारत नव्हतो, मी प्रश्न करत होतो' या सारख्या वाक्यांमध्ये आपल्याला प्रस्थापितांच्या विरुध्द बंडाचे स्फुल्लिंग दिसून येतात. तरीही गोष्टीत कुठेही रक्तबंबाळ करणार बंड नाही - तर स्वतः मुक्तपणे, आनंदाने जीवन जगण्याच आव्हान आहे - कीस काढून, सर्टिफिकेट्स मिळवून, मी हे मिळवल, ते मिळवल (खास करुन इतरांच्या डोळयांतली असूयेची चमक मिळवली) हे महत्वाच नाही. इकडे जाऊ की तिकडे जाऊ हे महत्वाच नाही. याला कैद करु की त्याला हस्तगत करुन हे महत्वाच नाही. ज्या खिंडीच्या पलीकडे प्रवासातील द्वन्द्व संपतील त्या शेवटच्या खिंडीपर्यंत जाण्यासाठी बाहय डोळे मिटून, अंतश्चक्षू वापरुन निर्द्वंद्व होणे हाच उपाय आहे.
    मूळ इंग्लिशवरून या कादंबरीचा मराठी अनुवाद करताना दोन भिन्न भाषांमधिल शब्द वैशिष्ठ्यांचा वेगळेपणा जाणवतो. त्याचबरोबर लेखकाचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व देखील लक्षात येते. त्यांनी चार  इंग्रजी  शब्दांचा जसा चपखल विचार केला आहे तसा तो मराठीत उतरवणे खूप अवघड होते. आम्ही दोघे मिळून या कादंबरीचा अनुवाद करायचे ठरले आहे. त्यासाठी देखील मी त्यांना या शब्दांविषयी बजावून ठेवले आहे. Questioning, game playing, Knowing आणि Nothing हे ते चार शब्द.
    Mother always encouraged me to ask questions. “Children should ask. That is how they learn.”- she said. But  I was not asking a questions. I was questioning their answers.
    यातील पहीले question हे माहिती करून घेण्यासाठी आहे  तर दुसरे विद्रोहाच्या धाटणीवर आहे.
    Understand आणि Know हे असेच दोन समान-अर्थी शब्द. कादंबरीत पराशर यांनी Understand हा शब्द खोलात खोलात शिरत माहिती घेणे या अर्थाने वापरला तर Know हा शब्द खोलात न शिरताच जाणिवेत उतरवणे या अर्थाने वापरला आहे. मला मराठीत Understand साठी समजणे व Know साठी जाणीव किंवा उमजणे अशा दोन वेगळ्या छटा असलेले शब्द योग्य वाटले.
  एखाद्या गोष्टीसाठी आपण कुठलेही प्रयत्न मागे ठेवले नाहीत असा अर्थ हवा असेल तर इग्रजीत आपण म्हणू Did not spare any TIME  to understand किंवा TIME च्या जागी आपण EFFORT, MONEY या सारखे शब्द वापरू. पण पराशर यांनी एक फार सुंदर वाक्य रचना वापरली आहे.-“Naturally, he did not spare SPACE for Understanding things likes time. But he knew when it was time to go. Like the Birds . They do not keep watches and  Calendar. But they know when it is Time to go.”
  पराशर यांनी अशाच प्रकारचे शब्द कौशल्य game बाबत वापरले आहेत.
    Did travelers play any games of their own, now that they did not have to play game of referees? या प्रश्नाला म्हातारा आजोबा उत्तर देतो-
    “Did they! I did not see them. In any case, why would anyone who is happy, play games?”
या शेवटच्या ओळीत play games या शब्दामध्ये छळ कपट, जिकणे, हरणे, असूया इत्यादी भाव समाविष्ट आहेत. याचे मराठी अनुवाद करताना नेमके भाव पकडणे कठिण होते. 
लेखकाने सर्वात जास्त मजा केली आहे Nothing या शब्दाबरोबर.
  “In the valley of peace, people do not play any games. But they play. Some play with water, some play with wind. Some play with Clouds, So, playing is sort of invisible- Like nothing, Travelers become particle of  dust or water or air. They become free sound. They become thoughts. They are on their way to become nothing. ”
    अशा प्रकारे nothing या शब्दाला एक व्यक्तिमत्व बहाल केलेलं आहे.
    मग मुलगा विचारतो-
    "With nothing! How do you play with nothing. What is nothing?"
    "The nothing is the only thing you have everywhere. At all times. But it will be sometime before you know about it. When travelers are playing, no one knows. So playing is sort of invisible- like nothing..... "
  This nothing was turning out to be something mysterious to attain and I would not know yet. But my mother used it  to show disdain. –“You just sit there doing nothing, just brooding all the time- This way you would grow up to do nothing. Look at the boys at your age – They are on way to become something.”
  अशा प्रसंगी मी पुष्कळदा अनुभवले की, पराशर यांचे तत्वज्ञान समजणे एक वेळ सोपे, पण त्यांच्या शब्दांना मराठीत मार्मिक शब्द निवडणे फार कठिण आणि अनुवाद करताना एखादा शब्द किंवा कल्पना फार फैलावुन लिहीण्यात काही मजा नसते. 
       ही कादंबरी विशेष करून तरूण वर्गाकडे यावी असे मला वाटत. कारण त्यांना यातली प्रतीके खुप भावतील. उदाहरणार्थ - मुलाला प्रश्न करण्याचा अधिकार नाही अस मानणारी मोठी माणसत्या च्या कामांना अविचारी मानणारी मोठी माणसत्यांना चाकोरित अडकवू पहाणा-या शाळा कॉलेजेस आणि रॅट रेसेसआणि या सगळयांतून मुक्त होण्याचा मार्ग - 'आईला कुठे माहीत असत - तिला वाटायच मी फिरायला गेलोय्‌पण मी तेंव्हा इंद्रानुष्याचा पाठलाग करीत असायचो !' हे माझ्या बारा वर्षाच्या भाचीच सध्याच आवडत वाक्य बनल आहेतर माझ्या मुलांनी ऐकवल - 'बघबघआमच्या सारखा विचारही जगांत असतो!'
    मात्र ही कादंबरी मुलांची किंवा तरुणांची किंवा प्रौढांची असे बिल्ले मी लावणार नाही
या कादंबरीतील तत्वज्ञानही तसे पाहीले तर तसे सोपेच आहे. माणसाने स्वतःला बिल्ले लाऊन घ्यायची गरज नाही.  काँम्पिटीशन टाळणे  सहज सोपे आहे. नेहमी जय पराजयासाठी खेळायची गरज आहे काय? लहान मुलांनी मोठे होताना काय व्हाव हे ठरवताना त्या मुलाच्या मताला किंमत असावी की नाही? एवढेच मूलभूत प्रश्न ते विचारतात.
पण खरे तर त्यांचे तत्वज्ञान याहूनही सोपे आहे. माणसाने मुक्त असावे, मुक्त बागडावे - आपल्या विचारांना मुक्त ठेवावे बस! आणि अशा प्रकारे आपल्या आयुष्याचा प्रवास वेगवेगळ्या द-या आणि खिंडीतुन होत असताना आपण मुक्त होतो तेव्हा शेवटची खिंड ओलांडतो.
पण प्रवास तिथे संपत नाही. तर मग त्या पुढच्या प्रवासात काय असते? मला ईशावास्योपनिषदामधला एक श्लोक आठवतो.-

विद्यांच अविद्यांच यस्तद्वेदोsभयं सह।
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाsमृतमश्नुते।
याचा मला कळलेला अर्थ असा - अविद्येच्या जोरावर मृत्युला पार केल्यानंतर पुढील प्रवासात विद्येच्या साथीने तुम्हाला
  
 अजून अपूर्ण                     ----- लीना मेहेंदळे

No comments:

Post a Comment