Sunday, April 8, 2012

अवचित पाहुणा 1-6 -- On C2 to upload


अवचित पाहुणा    { अपूर्ण }


     अवचित पाहुणा

        मी नाशिकला विभागीय आयुक्त म्हणून काम करीत असताना आमच्या घरात अवचित एक विचित्र पाहूणा आलात्यावेळी आमच्या घरातली परिस्थिती धामधुमीची होतीमाझी बदली पुणे येथे जमाबंदी आयुक्त पदावर होणार असे निश्चित ठरले होतेमात्र नाशिकच पद सोडण्यास काही अवकाश होतामोठा मुलगा आदित्य याची इंजिनियरींगची  तिसऱ्या सत्राची परीक्षा दोन  दिवसावर आली होतीत्यामुळे तो व मी असे दोघेच घरात होतो. बरेचसे सामान देखील पुण्याला पाठवून झाले होते

      अशावेळी पेपरात एक बातमी वाचली. मालेगाव मध्ये एका माणसाला एक खूप मोठा मुंगुसासारखा दिसणारा पण बुटक्या पायांचा  प्राणी  मंद चालीने रस्त्यावरुन जाताना दिसला त्याच्याशी बरीच झटापट करुन  त्या माणसाने हा प्राणी पकडलात्याचा हेतू चांगला होता कारण हमरस्यावर वाहनांची रेलचाल असल्यामुळे कुठेतरी अपघातात हा प्राणी सापडून मरेल या भितीनेच त्याने पकडला होतापरंतू हा सुमारे आठ ते दहा फूट लांबीचा प्राणी पकडल्यानतर त्याचे काय करावे हे त्या माणसाला सुचेना म्हणून त्याने सदर प्राणी पोलिस चाैकीत नेऊन जमा केलापोलिसांनी वन खात्याशी संपर्क साधला व हा प्राणी ताब्यात घेण्याबद्दल त्यांना विनंती केलीत्या दिवशी या प्राण्याचा मुक्काम पोलिस चौकीतच होता व दुसऱ्या दिवशीच पेपराला बातमी होती. बहूधा त्याचदिवशी वन खात्यामार्फत हा प्राणी हालवून नाशिकला नेला जाईल असेही पेपरातल्या बातमीत म्हटले होते

माझ्या नजरेसमोर असा प्रश्न उभा राहfला की नाशिकला तरी हा प्राणी कुठे आणून ठेवतील?  म्हणून मी वन खात्याच्या नाशिकच्या कन्झरव्हेटर यांच्याशी फोनवर बोलले.  श्री.शेख नावाचे अधिकारी कार्यालयात होते.  प्राण्याचा फोटो पेपरात होता त्यावरून तो प्राणी पेंगोलिन असावा असे आदित्यने सांगितले होते. मी शेखना विचारले हा प्राणी कोणता आहे? त्याला तुम्ही मालेगावहूनकधी व कसे आणणार ? ते म्हणाले दुपारी त्याला एखाद्या लाकडाच्या मोठया खोक्यात कोंबून घेऊन येणार व सायंकाळी सहा वाजेपर्यत तो नाशिकात दाखल होईलपण सहा वाजता सर्व कार्यालये बंद होतात, तर त्याला कुठे ठेवणार? यावर श्री शेख यांनी अद्याप तसे काही ठरवले नाही असे सांगितलेमला पूर्वीच्या सिंहमोर इत्यादी प्राण्यांना हाताळून झाल्याच्या अनुभवामुळे असे प्राणी ठेवण्याचा थोडाफार अनुभव होताशिवाय वन्य प्राण्याच्या संरक्षण कमिटिवर आयुक्तच अध्यक्ष देखील असतात. म्हणून मी त्यांना सुचवले कीहा प्राणी तीन चार दिवस तुम्ही माझ्या घरात ठेऊ शकता. नंतर त्याची कुठेकशी सोय लावायची ते ठरवून मग तुम्ही त्याला नेऊ शकता. एकंदरीत माझ्या बोलण्यावरून शेख यांनी सुटकेचा श्वास टाकला असावा असे मला वाटले. या पेंगोलिनच पुढे काय करायचे याबद्दल काही कार्यक्रम आखणे वन खात्याला सहज शक्य होते. फक्त त्या साठी तीन चार दिवस लागले असते व त्या काळात पेंगोलिनच काय करावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहणार होता.  त्या ऐवजी नाशिक आयुक्तांच्या भल्या मोठ्या घरात या पेंगोलिनची सोय होऊ शकते म्हटल्यावर त्यांना बरे वाटले असावे. अशा तऱ्हेने त्यादिवशी संध्याकाळी सहाच्या सुमारास हा पेंगोलिन आमच्या घरी आला

शेख यांनी सांगितल्याप्रमाणेच  त्याला लाकडाच्या एका जंगी खोक्यात दाबून बसवले होते व त्यावर तारेची जाळी टाकून दोरखंडाने खोक्याला पक्के बांधून ठेवलेले होतेखोक्याच्या जवळ जाऊन दोरी सोडण्यासाठी देखील सोबत आणलेले कर्मचारी घाबरत होतेकारण हा प्राणी दिसायला विचित्र व भयानक दिसत होतात्याच्या पाठीवर भरपूर मोठे खवले खवले होतेत्यामुळे त्याची भिती वाटायचीपरंतु आदित्यने पुढाकार घेऊन त्या खोक्याचे दोरखंड सोडले व तारेची जाळी काढून टाकलीत्यानंतर पेंगोलिन हळूहळू आपण होऊन बाहेर आलामाझ्या मुलाच्या लक्षात आले की हा प्राणी तसा घाबरट आणि माणसाला कुठलीही इजा न करणारा आहेत्याच्या जवळ जाऊन त्याला हात लावायचा किंवा धरण्याचा प्रयत्न केला तर तो चटकन आपले तोंड मानेत खुपसुन संपूर्ण शरीराचे वेटोळे करून घेत असे जसा पावसाळ्यात निघणारा पैसा किडा हात लावल्यावर शरीराचे वेटोळे करतो त्याचप्रमाणेएकदा त्याने अशाप्रकारे स्वतःला तोंडाभोवती गुंडाळून घेतले की ती गुंडाळी सोडविणे सहज शक्य होत नाहीवजनाला तो खूपच जड होतातरीही त्याने स्वतःची गुंडाळी केली असेल तेंव्हा त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर उचलून नेणे सोपे आहे असे आदित्यच्या लक्षात आलेवन खात्याचे कर्मचारी निघून गेलेपण माझ्या घरातल्या शिपायांनाही सुरवातीला या प्राण्याची भिती वाटायचीआदित्यने मात्र त्याला उचलून मांडीवरकडेवर घेतलेमीही घेतलेपण शिपाई मात्र लांबच थांबले.

थोडया वेळाने प्रश्न पडला की याला खायला काय द्यावेत्याच्यासमोर ताटलीत पाणी घालून ठेवले तर तो थोडेफार पाणी चाटत असेया प्राण्याला खायला काय द्यावे व त्याच्या सवयी काय आहेत यासाठी इंटरनेटवर या प्राण्याची माहिती काढायला आदित्यने त्याच्या पुण्याच्या मित्राला सांगितले होतेत्याप्रमाणे सुमारे दोन तासांनी इंटरनेटवर या प्राण्याची माहिती आलीतसेच आमच्या घरातील एनसायक्लोपीडिया वरून या प्राण्याची बरीच माहिती घेतली होतीम्हणून त्याला पेंगोलिन म्हणतात हे कळलेतसेच याची एक आवडती सवय म्हणजे माती उकरून जमिनीत खड्डा करून बसून रहाणे ही आहेस्वतःचे खाद्य तो स्वतः बागेमध्ये शोधतो व किडेमुंग्या खातो असे वर्णन पुस्तकात होतेआम्ही त्याला खाण्यासाठी गाजरटोमॅटो यासारख्या फळभाज्यापोळ्यांचे तुकडेभात देऊन पाहिलेत्यांना त्याने तोंडही लावले नाहीत्यानंतर आदित्यने बागेत जाऊन कांही गांडूळ पकडून आणले व त्याला खायला देण्याचा प्रयत्न केलाज्याठिकाणी मुंग्यांची भली मोठी रांग होती तिथे त्याला नेऊन सोडलेतरीही तो काही खाईनाबागेतील एका पडक्या झाडाच्या बुंध्यावर वाळव्या होत्यात्या दाखवल्या तरीही खाईनारात्री त्याला फिरायला न्यायचे म्हणून गोल्फक्लब मैदानात आम्ही त्याला घेऊन गेलोतो अतिशय हळू चालत असल्याने त्याला दोरीने वगैरे बांधावे लागत नव्हतेपरंतु त्याला चालवत नेतांना इतर लोकांचे कुतूहूल मात्र जागृत होत असेगोल्फक्लब मैदानात रात्री फिरायला येणाऱ्या लोकांची गर्दी त्याच्या भोवती जमलीत्या गर्दीला तो बिचकू लागलालोक त्याच्याकडे बघत आणि किती भयानक असेलतो काय काय करतो याच्याबद्दल कल्पनेनेच एकमेकांना सांगततो प्रकार फार गमतीदार वाटला.
मग आदित्यने त्याला कडेवर उचलून घरी आणलेत्यावेळेस आमच्या घरात कडब्याच्या भरपूर पेंढया खत म्हणून वापरण्यासाठी आणून ठेवलेल्या होत्याह्या पेंगोलिनला उकराउकरीची सवय आहे हे लक्षांत घेऊन पेंढयांचा एक भरपूर मोठा ढीग आतल्या बंदिस्त अंगणात टाकून ठेवलात्यात मान खूपसून घेऊन व आपल्या अवाढव्य शरीराच्या मदतीने पेंढ्यांचे गठ्ठे इकडून तिकडे उलथे पालथे करून पसरून टाकत त्याने रात्र घालवलीदुसऱ्या दिवसापासून त्याला तरतरी येवून त्याने पळापळीला सुरवात केलीतो भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करीत असेत्यासाठी त्याचे पुढचे दोन पाय फारसे उपयोगी पडत नसत परंतु निमुळते तोंड व दांत यांच्या सहाय्याने तो वस्तू धरत असेतसेच त्याच्या शेपटीत व मागच्या पायांत भरपूर जोर होताशेपटीच्या आधारे तो पकड मजबूत करीत असेआमच्या घरातील सुमारे पंधरा फूट उंच भिंत चढून तो कौलावर जायचा प्रयत्न करू लागलापण भिंत आणि कौल यामध्ये खूप मोकळे अंतर होते. 






















































सोनं देणारे पक्षी -- टंकित + चित्रप्रत.

सोनं देणारे पक्षी
शाळेत असताना एकदा मराठीचे मास्तर अतिलोभी माणसाचा धडा शिकवत होते. एका माणसाला सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळाली. दर तीन – चार दिवसांनी ती कोबडी सोन्याचं अंड द्यायची. लोभी माणसाला राहवेना. त्याचा धीर सुटला. हिच्या पोटामधली सगळीच सोन्याची अंडी एकदम काढून घेतली तर आपण खूप श्रीमंत होऊ, या कल्पनेने त्याने कोंबडीचे पोट कापले आणि हाय। आत एकही अंडे तर मिळाले नाही, कोंबडी मेली ती मेलीच। तर मुलांनो, या गोष्टातून आपण काय बोध घेतला ?
आमच्यापैकी बऱ्याच हुशार (?) मुलांनी धडा आधीच वाचलेला. त्यामुळे आम्ही एका आवाजात उत्तर दिले - अतिलोभ करू नये. पण एका मुलाने म्हटले - पक्ष्यांना ठार मारू नये. तेव्हा आम्ही त्याला खूप हसलो होतो. आता वाटतं आम्ही हुशार असू ( कदाचित ) पण तो नक्कीच आमच्याहून जास्त शहाणा होता। आणि असंही लक्षात येतं की एकदा आपण एक चौकट स्वीकारली, की आपल्या कल्पनाशक्तीला कशी खीळ बसते. नोकरशाहीची सदा अशी अवस्था असते. असो. पण त्या उत्तरामुळे ही गोष्ट आणि सोनं देणारे पशू– पक्षी असू शकतात अशी एक भोळी कल्पना मनात रुजून बसली.
पुढे एकदा कोणीतरी मला एका छोट्याशा प्राण्याची ओळख करून दिली. हा प्राणी म्हणजे सापसोळी. शाळेच्या मैदानात कधीतरी सुळकन् इकडून तिकडे सरपटत जाणारा, लांबीने पालीएवढा पण पेनच्या जाडीचा हा प्राणी. त्याची कातडी अगदी नितळ, तुकतुकीत व काँफी रंगाची असते. जणू काही नुकतीच पॉलिश मारून चकचकीत केली असावी. पाठीवर उठून दिसतील अशा दोन पांढूरक्या रेघा असतात. उन्हात सळसळत जाणारी सापसोळी पटकन मनाला भुरळ पाडायची. कुणी म्हटले, ही असेल तिथे साप निघत नाही. पण त्याहून चांगली माहिती सवंगड्यांनी दिली की ज्याला सापसोळी दिसेल त्याला सोनं किंवा पैसे मिळतात. मग आम्ही शाळेत सापसोळी दिसण्याची व दिसेल त्याला त्या दिवशी रस्त्यात काही पैसे सापडतात का, याची वाट बघायचो पुढे खूप खूप वेळा सिद्ध झालं की सापसोळी दिसण्याचा आणि पैसे मिळण्याचा काही संबंध नाही. तरीही माझं सापसोळी बद्दलच आकर्षण कमी झालं नाही. आतातर आमच्या पुण्याच्या घरात बऱ्याच सापसोळी रहात आहेत. त्या आपली जागा सहसा बदलत नाहीत ही आमच्या दृष्टीने पर्वणीचे आहे. त्यांच्या दिसण्याच्या जागा आणि वेळासुध्दा आमच्या माहितीच्या झाल्या आहेत.
संबंध देशात म्हणजे अगदी बंगाल– बिहारपासून तर केरळपर्यंत ज्याचं दर्शन शुभशकुनाचं आणि पैसे देणारं मानतात असा एक पक्षी आहे धनेश किंवा हॉर्नबिल. खेडोपाडी याला धनचिरैय्या, स्वर्णेश अशी नावं आहेत, म्हणजे याच्या नावातच पैसा व सोन आहेत. पक्षीतज्ञ सलीम अलींना याने इतकं भारून टाकलं, की त्यांनी मुंबईत पक्षीमित्रांसाठी जी बॉम्बे नँचरल हिस्टरी सोसायटी काढली तिचे बोधचिह्न धनेश पक्षी आहे. त्यांच्या मासिकाचे नावही हॉर्नबिल आहे. आकाराने घारीहून मोठा चॉकलेटी रंगाच्या या पक्षाला धम्म पिवळी मोठी चोच असते आणि त्या चोचीवर छोटेखानी बाकदार शिंग असतं. या पिवळ्या मोठ्या चोचीमुळेच त्याचं आणि सोन्याचं नातं जोडलं असावं.
पुणे– मुंबईसारख्या औद्योगिक शहरांमध्ये मला हा पक्षी कुठेच दिसलेले नाही पण सांगलीच्या कलेक्टरच्या बंगल्यात एक शिरीषचं विस्तीर्ण झाड होतं, त्यावर किमान सहा – सात धनेशांची वस्ती असे. वर्षातले चार– सहा महिने राहायला तिथे येत. मी सांगलीला कलेक्टर असताना शिरीषच्या फांद्यांत खोल दडून बसलेले हे धनेश चाऱ्यासाठी कधी उडतात त्याची आम्ही वाट बघत असू. निदान एक तरी धनेश दिसावाच अशी इच्छा असे. नंतर सोनं मिळेल म्हणून नाही। पण खूपदा असा धनेश बघितला की त्या दिवशी कांही तरी चांगली, प्रसन्न करणारी गोष्ट घडायची. हळुहळू लक्षात आलं की हा योगायोग वगैरे नव्हता. तो सगळा प्रकार आनंददायी होता. सकाळी लवकर उठून झाडाजवळ थांबून सूर्योदयाच्या आसपास कधीतरी फडफडत बाहेर निघणारा पक्षी बघणं, त्याचं ते मनोहारी दर्शन, या सगळ्यामुळं मन प्रसन्न असायचं आणि आपण प्रसन्नचित असलो, की आपलं वागणं त्या दिवशी असं असतं, की ज्यातून काही तरी चांगलं घडून जावं.
अशा या धनेशच्या चौपट आकाराचा धनेश कुणाला पाहायचा आहे का? भुवनेश्वरच्या नंदनकानन बागेत मुलांची आगगाडी आहे, त्या स्टेशनवर लाकडाचा मोठा कोरलेला धनेश पक्षी आहे. एरवीसुध्दा नंदनकाननसाठी माझी शिफारस आहे. तिथे मगरी आणि घोरपडींचं पैदास केंद्र आहे, काळे चित्ते आहेत, पांढरे सिंह आहेत. आणखीही खूप पशू – पक्षी आहेत आणि त्यांना छळवाद न वाटेल असे वातावरण आहे.
ज्यांच्या दर्शनानं सोनं मिळतं म्हणतात असा आणखी एक पक्षी म्हणजे भारद्वाज किंवा पाणकोंबडी किंवा कुकुर कोंबडी. विजेचा पंप अविरत चालत असताना जसा कुक् कुक् आवाज येतो तसा खोल खर्जात कुक् कुक् असा आवाज काढणारा हा पक्षी अत्यंत लाजरा बुजरा असतो. माणसाची चाहूल लागली तरी उडून जातो.
हा पक्षी आकाराने कावळ्याहून मोठा. कुळकुळीत काळा रंग, पण पाठ चमकणारी. कॉफीत सोनेरी रंग मिसळावा तशी. एकूण ज्या पक्षी किंवा प्राण्यांकडं काहीतरी लकाकी, चकाकी आहे त्याचा संबंध माणसाने सोन्याबरोबर जोडला.
भारद्वाजला उडताना पंख विशेष हलवता येत नाहीत. म्हणूनच फार लांब पल्ला मारता येत नाही. मात्र त्याची पहिली झेपच इतक्या शक्तीने घेतलेली असते, की त्यातच तो बरेच अंतर पार करतो. त्यावेळी दोन्ही पंख पसरून तो जी झेप घेतो ती पाहातच राहावसं वाटतं. हा झाडात जाऊन बसतो ते दृश्य पण मजेशीर असतं. खालच्या फांदीवरुन वरच्या फांदीवर शिडी चढून गेल्यासारखं चढतो आणि खोल आत जाऊन बसतो.
आमच्या पुण्यातल्या घराच्या अंगणात भारद्वाजाने तळ ठोकायला तब्बल दोन वर्षे लावली. पक्षी नवीन जागा किंवा नवीन झाड पटकन् स्वीकारीत नाहीत. पारखून, खात्री करुन मगच आमच्या अंगणात दोन भारद्वाज राहू लागले. जमिनिवर उतरुन संथ पावले टाकत ते किडे टिपत असतात. एकदा एका भारद्वाजाने सरडा पकडला आणि बांबूच्या झाडावर बसून खाऊ लागला. ते एका कावळ्याने पाहिले. तो जवळ येऊन आरडाओरडा करुन भारद्वाजाला त्रास देऊ लागला. एरव्ही भारद्वाज झाडाच्या अगदी आत शिरला तर कावळ्याला तेवढे आत जाता येत नाही. पण पंजात धरलेला सरडा फांद्यांना अडकून खाली पडेल, या भीतीने त्याला जास्त आत जाता येत नव्हते. बाहेर राहिला तर कावळ्याचा त्रास. थोड्या वेळाने तर अजून एक कावळा आला. एव्हाना भारद्वाज कातावला होत. शेवटी निम्मा सरडा त्याच्या तोंडातून खाली पडलाचं. दोन्ही कावळे झडप घालून तो उचलून घेऊन गेले व भांडत बसले. भारद्वाजाला निम्म्या सरड्यावरच समाधान मानावे लागले.
माझ्या नाशिकच्या कमिशनरच्या बंगल्यात वडाच्या अति विस्तीर्ण झाडावर भारद्वाज राहात असत आणि बंगल्याच्या आवारात फिरत असतं त्यांच्या वेळापत्रकावर पाळत ठेवून त्यांना पाहिलं असं करावचं लागल नाही. सहजगत्या खिडकीतून बाहेर पाहिल तरी ते दिसत.
साहजिकच सांगली कलेक्टर आणि नाशिकच्या विभागीय आयुक्ताचा बंगला यांना उंदड यश आहे, असे मला वाटले. ते धनेश आणि भारद्वाज, त्यांना हक्काचे सुरक्षित घरटे देणारी शिरीषची वडाची झाडं आणि त्या झांडाना आश्रय देणाऱ्या या दोन वास्तू. यांना देव उदंड आयुष्य देवो असच मी म्हणणार।
सोन्याचीच चर्चा चालू आहे तर झाडांना तरी कां मागे ठेवा ? सोन्याचा संबंध सांगणारे दसऱ्यातले सर्वांच्या परिचयाचे शमीचे झाड आपल्याला माहीत आहे. पण कांचन म्हणजे सोनं या नावाचेच एक झाड असते. शमी– आपटा याच जातकुळीले, आणि तशीच जोडपाने असणारे. साताठ फूट उंचीचा छोटासा डौलदार घेरा असलेल्या या झाडाला निखळ सोन्याच्या पिवळ्या रंगाची फुलं येतात. पिवळाधमक सोनचाफा, घोसाघोसांनी लटकणारा पिवळा बहावा, हळदीसारख्या पिवळ्या फुलांवर चेस्टनट रंगाचे तुरे मिरवणारा काशिद, या सर्वांना मागे टाकणारं आणि कांचन हे नाव सार्थक करणारं हे फूल असतं.
याच्याहून थक्क करणारं सोन्या– चांदीचं मिश्रण मी बघितली आहे. गगनजाई ऊर्फ बुचाच्या उंच उंच झाडांच्या शेंड्यांना दसऱ्याच्या सुमारास लांब लांब हस्तिदंती रंगाच्या दांडीची पांढरी फुलं येतात. पुण्यात आमच्या घरी तसाच लॉ कांलेज रोडवर, तर नाशिकच्या रमाबाई आंबेडकर वसतिगृहाच्या दारातच ही झाडं आहेत. एक दोन महिने या फुलांच्या सीझन टिकतो तेव्हा फुलांनी मढलेला झाडांचा शेंडा चांदण्या रात्री जणू सोन्याचे जरतारी काम केल्यासारखा चमकतो. ज्याला चांदण्यातल्या ताजमहालची प्रचीती हवी असेल त्याने हे दृश्य बघून घ्यावं असं मी बिनदिक्कत म्हणेन. ताजमहाल पेक्षा थोडेसे सरसच, कारण हवेत हे सोनेरी चंदेरी गुंबद डोलत असतात. ताजमहालच्या गुंबदांना कुठे डोलता येतं ?
-----------------------------------------------------------------------------------------











































पक्षी सोयरे 1-6











































सोनं देणारे पक्षी -- अनुक्रमणिका

सोनं देणारे पक्षी -- अनुक्रमणिका

पक्षी सोयरे
सोनं देणारे पक्षी
आमचा दोस्त टोटो
अवचित पाहुणा -- अपूर्ण पान ३ ते ६ करावे
नको पिंजरा
ऐसा अंदमान
कीटक छंद
आला वसंत आला
एका असहाय मगरीची मृत्युगाथा


sona-denare-pakshi 4

sona-denare-pakshi 3

sona-denare-pakshi 2

सोनं देणारे पक्षी व नभांगण -- अनुक्रम


सोनं देणारे पक्षी - अनुक्रमणिका













































नभांगण- अनुक्रमणिका



1. 27 नक्षत्रे
2. राहू-केतू म्हणजे काय
3. 360 अंश म्हणजे काय -- वर्ष आणि वर्तुळ
4. भारतीय चंद्र पंचांग व सौर वर्ष -- इंग्रजी वर्ष
5. सूर्याचा नक्षत्र प्रवेश
6. मुहूर्त कसा पहावा
7. ज्योतिष शास्त्र आहे की थोतांड हा वाद थोडा बाजूला ठेऊव
8. ऋतु -- उत्तरायण, दक्षिणायन
9. मृग नक्षत्राची ओळख
10. वृश्चिक
11. धनु
12. सप्तर्षि
13. मघा
14. हंस अभिजित श्रावण
15  दक्षिण हंस
16. स्वाति, चित्रा, हस्त
17. पुनर्वसु
18. आर्द्रा
19. ग्रहण
20. पिधान
21. युती
22. धूमकेतू
23. शर्मिष्ठा
24. देवयानी
25. रोहिणी कृत्तिका
26. पूर्वा व उत्तरा- भाद्रपदा
27. ध्रुव
28. ख- स्वस्तिक
29. अजून 45 पर्यंत लिस्ट आहे)